उल्हासनगर दि. २८ ( प्रमोद दळवी ) : नगरपालिका निवडणुकीतील प्रचंड विजयानंतर, टाऊन हॉलमध्ये भाजपचे उमेदवार, नगरसेवक आणि अनुलोम संघटनेची एक बैठक व स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी आमदार कुमार आयलानी यांनी मार्गदर्शन केले.

अनुलोम संघटनेने निवडणुकीदरम्यान केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांच्या टीमचा सत्कारही केला. निवडणुकीदरम्यान अनुलोम संघटनेने सर्व प्रभागांचा केलेला अभ्यास भाजपचे उमेदवार आणि नगरसेवकांसोबत सामायिक करण्यात आला. आमदार कुमार आयलानी यांनी सर्व अधिकारी आणि नगरसेवकांना नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी, परिसराचा विकास करण्यासाठी आणि यासाठी प्रयत्न करत राहण्याचे मार्गदर्शन केले.

यावेळी अनुलोम संस्थेने निवडणुकीदरम्यान केलेले सर्वेक्षण, रणनीती आदींचे कौतुक करण्यात आले तसेच युवा प्रेरणा प्रमुख प्रेरणाताई पवार, रवींद्र बुवाड, युगंधर नारकर, अरुण गुजराथी व अनुलोम संघाच्या इतर सदस्यांचा आमदार कुमार आयलानी, जिल्हाध्यक्ष राजेश वधारीया, उपमहापौर अमर लुंड, माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी आदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी राजेश वधारीया, अमर लुंड, धनंजय बोडारे, चंद्रकांत बोडारे, प्रशांत पाटील आदींनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन मंगला चांडा यांनी केले. या कार्यक्रमाला नगरसेविका मीना आयलानी, लाल पंजाबी, लकी नाथानी आदींसह अनेकांची उपस्थिती होती.






























