मुरबाड दि २७ (सतिशचंद्र घरत ) : मुरबाड तालुक्यातील म्हसा रोड लगत वास्तव्यास असलेल्या जगदीश गोल्हे यांच्या घरावर मध्यरात्री पाच ते सहा दरोडेखोरांनी दरोडा टाकून सुमारे दिड तोळे सोने तर विस हजार रुपये लंपास केले, दरोडेखोरांनी घरातील माणसांना चॉपरचा धाक दाखवून धमकावले परिणामी गोल्हे कुटुंब भितीने हादरुन गेले असुन संबंधित दरोड्याची माहिती मिळताच टोकावडे पोलीसांनी घटनेच्या ठिकाणी जाऊन तपासाची कार्यवाही सुरू केली आहे.

या दरोडेखोरांनी टाकलेल्या दरोड्यामुळे परीसरातील नागरीकानं मध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून रात्रीच्यावेळी धसई परीसरात पोलिसांनी गस्त घालावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.दरम्यान याच परिसरात काही दिवसांपूर्वी रात्रीच्यावेळी एका बंगल्याच्या कंपाऊंड वॉल वरुन चोरट्यांनी आत शिरण्याचा प्रयत्न केला होता. परंतु सुदैवाने चोरट्यांना बंगल्याच्या आत शिरण्यात यश आले नव्हते मात्र संबंधित प्रकार सिसी कॅमॅऱ्यात कैद झाला आहे त्या अनुषंगाने टेहळणी व गस्त वाढविणे गरजेचे आहे आशा प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.





























