Homeताज्या बातम्यादहीहंडी’द्वारे गोविंदा पथकांचा भारतीय सैन्य दलाच्या शौर्याला सलाम – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दहीहंडी’द्वारे गोविंदा पथकांचा भारतीय सैन्य दलाच्या शौर्याला सलाम – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई दि. 16 : ‘ऑपरेशन सिंदूर’ द्वारे भारतीय सैन्य दलाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निर्धार आणि विचार प्रत्यक्षात उतरवला. पाकिस्तानमधील दहशतवादी ठिकाणे नष्ट करून शत्रूला धडा शिकविला आणि आपल्या शौर्याची जगासमोर प्रचिती दिली आहे. आजच्या या दहीहंडी उत्सवातून गोविंदा पथकांनी सैन्य दलाच्या शौर्याला सलाम करण्याचे सुंदर काम केले आहे,” असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने शहर व उपनगरातील विविध कार्यक्रमांना भेट देऊन नागरिकांना शुभेच्छा दिल्या. घाटकोपर येथील लालबहादूर शास्त्री मार्गावर आयोजित दहीहंडी उत्सव प्रसंगी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी उपस्थित सैन्य दलातील जवानांना भेटून संवाद साधला. कार्यक्रमास सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, आमदार प्रवीण दरेकर,  आ. राम कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,“दहीहंडी उत्सवाला उपस्थित असलेल्या सैन्य दलातील जवानांना व त्यांच्या शौर्याला मी मनःपूर्वक सलाम करतो. सामाजिक उपक्रम व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून घाटकोपर येथील उत्सवाने जे कार्य केले आहे ते उल्लेखनीय आहे. गोविंदा पथकांनी उभारलेले थर सैन्य दलाच्या शौर्यासाठी अर्पण केले आहेत, ही एक प्रेरणादायी बाब आहे.”त्यांच्या हस्ते माजी सैन्य अधिकारी आनंद तिवारी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सामाजिक कार्याबद्दल चेतन शाह व  राजेश भीमसरे यांचा देखील गौरव करण्यात आला.

मुंबई शहर व उपनगरातील विविध दहीहंडी उत्सव कार्यक्रमांना मुख्यमंत्र्यांची उपस्थिती

विक्रोळी येथील टागोर नगरमध्ये आरंभ दहीहंडी कार्यक्रमास उपस्थित राहून मुख्यमंत्री म्हणाले, “दहीहंडी उत्सवात एकावर एक थर लावला जातो, तेव्हा हा संपूर्ण समाज एकत्रित असल्याचा महत्त्वपूर्ण संदेश दिला जातो. सर्वांनी एकसंघ राहून पुढे जाण्याचे हे प्रतीक आहे,” असे ते म्हणाले.

यावेळी श्रुती विनोद घोगळे व सुहास माटे यांची उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देऊन मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यात आले.वरळी जांबोरी मैदानावर आयोजित परिवर्तन दहीहंडी उत्सवात छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंगांचे सादरीकरण कलाकारांनी केले. उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते कलाकारांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा आणि आमदार प्रवीण दरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.तसेच, भोईवाडा येथील स्वातंत्र्यसैनिक सदाकांत ढवन उद्यान येथे साजऱ्या होत असलेल्या दहीहंडी उत्सवाला उपस्थित राहून मुख्यमंत्री फडणवीस यांनी गोविंदा व नागरिकांना शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उल्हासनगर गारमेंट फेअर 3.0 च्या समारोपाला उद्योगमंत्री संजय सावकारे यांची भेट : आयोजकांच्या प्रयत्नांचे...

उल्हासनगर दि. १४ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगरच्या वस्त्रोद्योगाला नवी दिशा देणाऱ्या उल्हासनगर गारमेंट फेअर (UGF) 3.0 च्या समारोपाच्या दिवशी महाराष्ट्राचे उद्योगमंत्री संजय...

स्वत:हून सूचनेनंतर एनजीटीने मोशी दुर्घटनेवर नागरी संस्था, प्रदूषण मंडळाकडून उत्तर मागवले

पिंपरी चिंचवड महानगरपालिका संचालित वेस्ट-टू-एनर्जी (डब्ल्यूटीई) प्लांटची तीन मजली प्रशासकीय इमारत मोशी येथील कचऱ्याचा ढिगारा कोसळल्याने घटनास्थळावरील ढिगारा हटवत आहे. पुणे : नॅशनल...

ज्ञानदा विद्या मंदिरात माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याने उजळल्या जुन्या आठवणी

उल्हासनगर दि. १४ ( प्रमोद दळवी ) :- शाळेच्या प्रांगणात रंगलेला माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा हा एक अत्यंत भावुक आणि आनंददायी सोहळा असतो.वर्षानुवर्षानंतर जुन्या...

कबाला की फिफाचे नियम? मेस्सीचा अर्जेंटिना इंग्लंड विरुद्ध उपांत्य फेरीसाठी ‘लकी’ नेव्ही ब्लू जर्सी...

जॉर्डन विरुद्ध नेव्ही ब्लू जर्सीमध्ये लिओनेल मेस्सी (प्रतिमा: एक्स) गतविजेता अर्जेंटिना FIFA विश्वचषक 2026 च्या उपांत्य फेरीत इंग्लंडबरोबर आणखी एक ब्लॉकबस्टर शत्रुत्वासाठी सज्ज...

व्हिएतनाम स्पीडबोट दुर्घटना: 15 भारतीय पर्यटकांचे पार्थिव आज मायदेशी रवाना

मुंबई: व्हिएतनामच्या फु क्वोक बेटावर गेल्या आठवड्यात झालेल्या स्पीडबोट दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या १५ भारतीय नागरिकांचे पार्थिव मंगळवारी सहा देशांतर्गत उड्डाणांनी मुंबईहून त्यांच्या...

error: Content is protected !!