उल्हासनगर दि. २२ ( प्रमोद दळवी ) : शिवओमं आर फाऊंडेशन प्रेझेंट्स मुंबई यांच्यावतीने राष्ट्रीय कर्तव्य सन्मान २०२६ कार्यक्रम मोठ्या उत्साहात ठाणे येथे संपन्न झाला. त्या कार्यक्रमाकरिता प्रमुख पाहुणे हिंदी चित्रपट क्षेत्रातील सुप्रसिद्ध अभिनेत्री अमिषा पटेल, श्री.अर्जुन देशपांडे युवा यशस्वी उद्योजक “जेनरिक आधार” व निर्माते हिंदी चित्रपट क्षेत्रातील काही प्रमुख मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये डी लिट.डॉ. व्ही व्ही पोपेरे आदिवासी सेवक (महाराष्ट्र शासन) यांना राष्ट्रीय कर्तव्य सन्मान २०२६ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

खूप अभिनंदनची बाब आहे डॉ. पोपेरे यांच्या उल्लेखनीय समाजकार्याबद्दल दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार ठाणे येथे देण्यात आला. त्या कार्यक्रमाकरिता विविध क्षेत्रातील कला, क्रीडा, समाजसेवा, प्रशासकीय सेवा,इ.मान्यवर उपस्थित होते व कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.





























