उल्हासनगर दि २२ : उल्हासनगर महापालिका मुख्यालय येथे शुक्रवारी दुपारी एक वाजता मान्सून पुर्व तयारी व त्या निमित्ताने करावयाच्या उपयोजना याबाबत मिटिंग बोलण्यात आली होती.

सदर बैठकीस अजय साबळे, सहाय्यक आयुक्त -१ व विशाल कदम सहाय्यक आयुक्त -२ तसेच महानगर गॅस लिमिटेड तर्फे मयूर बोराडे मॅनेजर , स्वप्निल मुंडे, डेप्युटी मॅनेजर, नितीन पाटील असिस्टंट मॅनेजर आणि महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ उल्हासनगर -१ व उल्हासनगर -२ तर्फे प्रविण चकोळे कार्यकारी अभियंता, प्रितम खेडकर अति कार्य अभियंता, राजेश स्वामी अति कार्य. अभियंता, दिलीप कुंभार अति कार्य. अभियंता हे अधिकारी उपस्थित होते.
सर्व अधिकारी कर्मचारी यांना मान्सून पुर्व तयारी व त्या निमित्ताने करावयाच्या उपयोजना करणेबाबत सूचना देण्यात आल्या. सर्व उपस्थित अधिकाऱ्यांनी त्यांची देखभाल दुरुस्ती व सुरक्षा प्रावधान विषयक कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणेबाबत मा. आयुक्त यांनी निर्देश दिले असल्याबाबत सूचित करण्यात आले. तसेच मान्सून पूर्व व मान्सून दरम्यान कामे करताना आणि सेवा देताना नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेणेबाबत निर्देशित करण्यात आले.





























