जम्मू काश्मीर दि. ९ ( प्रमोद दळवी ) : स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय संघटन नवी दिल्ली भारत यांच्यावतीने स्वामी विवेकानंद ग्लोबल स्पीच्युअल इंटरनॅशनल पुरस्कार २०२६ हा महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरात राहणाऱ्या आदिवासी सेवक डॉ/ व्ही. व्ही पोपेरे यांना प्रदान करण्यात आला. डॉ. व्ही व्ही पोपेरे यांचे समाजकार्य पाहून त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. पोपेरे यांना आजवर अनेक पुरस्कार पुरस्कार प्राप्त झाले आहेत. याशिवाय आदिवासी सेवक म्हणून ते पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. त्यांना जम्मू काश्मीर येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आल्याने त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

जम्मू काश्मीर वक्त बोर्ड (अध्यक्ष) श्रीम.अंदरबी मॅडम (मंत्री) जम्मू-काश्मीर सरकार व मा. श्री.डॉ.हरेंद्रराय यादव भारत नेपाळ मैत्री फोरम (केंद्रीय अध्यक्ष) नेपाळ काठमांडू, डॉ.राजू पाल सर (अध्यक्ष) झिट बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्य प्रदेश भारत मा.श्री.अनिल चव्हाण भारत नेपाळ मैत्री फोरम (कार्याध्यक्ष) मा. शारदा पोखरेल मॅडम भारत नेपाळ मैत्री फोरम (नेपाळ अध्यक्षा),या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये मा.डॉ.व्ही व्ही.पोपेरे (आदिवासी सेवक) तथा उपाध्यक्ष भारत नेपाळ मैत्री फोरम नवी दिल्ली. यांना एस.के.आय.सी जम्मू काश्मीर येथे आंतरराष्ट्रीय स्वामी विवेकानंद ग्लोबल स्प्रेचुअल पुरस्कार-२०२६ प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाकरिता देश विदेशातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते व कार्यकर मोठ्या उत्साहात जम्मू-काश्मीर येथे संपन्न झाला.





























