उल्हासनगर दि.२८ : जायंटस ग्रुप ऑफ उल्हासनगर सहेली यांच्या वतीने उल्हासनगर-४ येथील आर.के.अभंग,हॅप्पी होम व सरस्वती शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

आर.के.अभंग शाळेच्या प्रांगणात संपन्न झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात सहेली ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा व जायंटस वेल्फेअर फेडरेशन वन सीच्या कौन्सिल सदस्य एनसीएफ सौ.इंदिरा टेम्बेकर, कौन्सिल सदस्य एनसीएफ प्रा.डॉ.प्रकाश माळी,जायंटस ग्रुप ऑफ उल्हासनगर सहेलीच्या अध्यक्षा उषा वसईकर, उपाध्यक्षा माणिक गोरे, खजिनदार विद्या पांतोने आणि सदस्या स्मिता चिखलकर, अलका जाधव व नलिनी भालेराव यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य (नोटबुक व कंपास) वाटप करण्यात आले.

माजी मुख्याध्यापिका अलका जाधव व स्मिता चिखलकर यांच्या सहकार्यातून साकारलेल्या या उपक्रमास मुख्याध्यापिका हजारे मॅडम, वडके मॅडम, किनगे मॅडम यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधू-भगिनींनी मोलाचे सहकार्य केले.या छोटेखानी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भामरे सर यांनी केले.





























