नाशिक दि.९ : घर अंगण संस्था नेहमीच आपल्या कामात अग्रेसीव असते. नुकताच आज दिनांक ९ डिसेंबर २०२५ या दिवशी एक कार्यक्रम हुतात्मा स्मारक या ठिकाणी पार पडला. हया कार्यक्रमाची सुरुवात मान्य वरांच्या स्वागताने झाली संस्थेच्या सचिव अनिता पाटील यांनी पाहुण्यांचे स्वागत केले..आणि संस्थे बद्दल माहिती दिली. आणि संस्थेच्या नाशिक जिल्हा अध्यक्ष आणि ब्रॅण्ड ॲम्बेसिटर रुपाली पवार यांनी पाहुण्याच्या कारकिर्दीच्या कामाची माहिती दिली.
संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा आशा भोईर यांनी संस्थेचे कार्य कशा प्रकारे चालते आणि कामाची पद्धत या वर चर्चा केली. संस्थेचे पदाधिकारी कसे एक मताने काम करतात त्याचा ही आनंद त्यांनी व्यक्त केला. उपाध्यक्ष ज्योतीताई काजळे यांनी महिलांनी स्वावलंबी कस बनायचं आणि कामातुन दोन पैसे कसे कमवता येईल याच मार्गदर्शन केल. सत्कारार्थी लाभलेल्या कलावंत मनीषा भुजबळ यांनी ही आपल्या मोजक्या शब्दात महिला बाहेर पडल्यानंतर किंवा काही काम सुरु करण्याआधी तिला कसा चांगला वाईट अनुभव येतो आणि त्यावर तिने काय केल पाहिजे यावर सुंदर मार्गदर्शन केलं. मनमाड शहर अध्यक्ष गिरीजा अहिरे सरानी मोलाचं सहकार्य केलं. स्वतःच्या पायावर अगदी खंबीर पणाने आणि कष्टाया ने उभ्या आहें अश्या महिलांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहन दिले. संस्था अशा होतकरू आणि कष्टाळू महिलांना स्वतःच्या पायावर उभ करण्याच कार्य करत आहें जी महिला तिच्या पायावर उभी असून सक्षम बनली आहें तिच्या चेहेऱ्यावरच हसू तीच आमची पावती असे मत संस्थेच्या पदाधिका-यांनी व्यक्त केले
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून काळाराम मंदिर विस्वस्थ मिलिंद तारे सर लाभले. त्यानी महिलांनी बिजनेस कसा करावा आणि आज आपण आपल्या पायावर सक्षम पणे कसे उभे राहिले पाहिजे या बद्दल सुंदर माहिती दिली त्यांच्या मार्ग दर्शन महिलांना उपयोगाचे ठरणार आहें आणि गिरणा गौरव अध्यक्ष सुरेश पवार सर यांनि ही महिलां कशा एकत्रित पणाने काम करावे आणि संस्था कशी चालते याच मार्ग दर्शन केले. सुप्रसिद्ध छाया चित्रकार रमाकांत तरवडे सर संपत्नीक उपस्थिती होते. त्याचा ही सत्कार करण्यात आला. आणि शेवट संस्थेने आपल्या नावाचं प्रतीक म्हणून त्यांना घर भेट दिल. कला क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलाकार मनीषा भुजबळ यांचा ही सत्कार करण्यात आला त्याच बरोबर ज्या महिलेला चहाच शॉप संस्थेने टाकून दिल त्या होतकरू महिला रुपाली सालवे यांचा सत्कार केला. आज चहा विकणाऱ्या महिलेचा सत्कार केला म्हणून तिने संस्थेचे आभार मानले आणि कार्यक्रची सांगता झाली.संस्थेच्या व्यावस्थापिका उषा सूर्यवंशी, खजिनदार पूनम भोईर, मनमाड महिला शहर अध्यक्ष ज्योती आहिरे. सुनीता गांगुर्डे. मीनाताई निकम. चंद्रशेखर भोईर, बाल कलाकार शंभवी भुजबळ.चिरंजीवी काजळे, पवन परदेशी अधि उपस्थित होते.


























