Homeशहर“खासदार आपल्या भेटीला - जनता दरबार” उपक्रमाच्या माध्यमातून शेकडो नागरिकांच्या समस्या मार्गी...

“खासदार आपल्या भेटीला – जनता दरबार” उपक्रमाच्या माध्यमातून शेकडो नागरिकांच्या समस्या मार्गी !

  • उल्हासनगर व डोंबिवलीत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सोडविल्या शेकडो नागरिकांच्या समस्या
  • थेट संवादातून नागरिकांच्या अडचणी जाणून घेत तातडीने कार्यवाहीच्या सूचना; अनेक प्रलंबित प्रश्नांना मिळाला मार्ग

उल्हासनगर दि २२  : कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून राबविण्यात येणाऱ्या “खासदार आपल्या भेटीला – जनता दरबार” या उपक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांच्या समस्या थेट ऐकून त्यावर तत्काळ उपाययोजना करण्याच्या उद्देशाने उल्हासनगर आणि डोंबिवली येथे आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारात शेकडो नागरिकांनी उपस्थित राहून आपल्या विविध नागरी समस्या, प्रलंबित कामे आणि प्रशासनाशी संबंधित अडचणी मांडल्या. या उपक्रमाअंतर्गत उल्हासनगर येथील जनसंपर्क कार्यालयात आयोजित जनता दरबारात परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, महापालिका कामकाजाशी संबंधित अडचणी तसेच विविध शासकीय कामांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत निवेदने सादर केली. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या समस्या सविस्तर ऐकून घेतल्या आणि संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना त्या लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या.

डोंबिवली येथे ही शिवसेना मध्यवर्ती शाखेतही “खासदार आपल्या भेटीला – जनता दरबार” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणीही नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या विविध समस्या मांडल्या. खासदार डॉ. शिंदे यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि महापालिका तसेच जिल्हा प्रशासनाच्या संबंधित विभागांशी समन्वय साधून त्या समस्यांवर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

नागरिकांना त्यांच्या समस्या मांडण्यासाठी थेट लोकप्रतिनिधींशी संवाद साधण्याचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे आणि प्रशासनानेही त्या प्रश्नांवर संवेदनशीलतेने व तत्परतेने निर्णय घ्यावेत, या उद्देशाने हा उपक्रम सातत्याने राबविण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या माध्यमातून नागरिकांच्या अनेक प्रलंबित प्रश्नांना मार्ग मिळत असून प्रशासन आणि नागरिकांमध्ये सकारात्मक संवाद निर्माण होत आहे. या उपक्रमामुळे नागरिकांना आपल्या समस्या थेट खासदारांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळत असून प्रशासनालाही त्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्यास गती मिळत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

डोंबिवली येथे झालेल्या कार्यक्रमास आमदार राजेश मोरे, कल्याण डोंबिवली महापौर हर्षाली चौधरी, ज्येष्ठ नगरसेवक विश्वनाथ राणे तसेच स्थानिक नगरसेवक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर उल्हासनगर येथे झालेल्या जनता दरबारावेळी  नागरिकांच्या विविध समस्या खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ऐकून घेतल्या व त्यावर तात्काळ उपयोजना करण्याबाबत चर्चा करण्यात आली. त्यावेळी शहरातील विकास कामांवर सविस्तर आढावा घेण्यात आला.त्यावेळी शिवसेना गटनेते व नगरसेवक अरुण आशान, शिवसेना महानगरप्रमुख व नगरसेवक, राजेंद्र चौधरी यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जर्मनी विरुद्ध पराग्वे, फिफा विश्वचषक 2026 फेरीतील 32 थेट स्कोअर- 0-1: पहिल्या हाफमध्ये एन्सिसो...

FIFA विश्वचषक 2026 च्या त्यांच्या महत्वाकांक्षेला विजय मिळवून देण्यास काही कमी पडेल हे जाणून जर्मनीने त्यांच्या बाद फेरीची मोहीम सुरू केली. त्यांच्या मार्गात पॅराग्वे...

हृदयाच्या धक्क्यानंतर मुंबईच्या डॉक्टरांनी दुर्मिळ लिपिड विकार असलेल्या अर्भकाला वाचवले | मुंबई बातम्या

मुंबई : परळच्या बाई जेरबाई वाडिया रुग्णालयातील डॉक्टरांनी अडीच महिन्यांच्या चिमुरडीचे रक्त काढले तेव्हा ते गोठले. परिचित किरमिजी रंगाच्या ऐवजी, सिरिंज जाड,...

बिष्णोई टोळीच्या सदस्याने पुण्यातील कपड्याच्या दुकानदाराकडे 2 कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे

पुणे : बिष्णोई टोळीतील एका सदस्याने खडकवासल्याजवळील उत्तमनगर येथील एका कपड्याच्या दुकानदाराला धमकावून शनिवारी सकाळी २ कोटी रुपयांची मागणी केली, असे पोलिसांनी...

अमेरिकेतील 5 शहरे जिथे 100 वर्षांपूर्वी वेळ थांबल्यासारखे वाटते

जिम थॉर्प, उर्फ ​​अमेरिकेचे स्वित्झर्लंड, त्याच्या डोंगराळ वातावरणामुळे, त्याच्या शतकानुशतके जुन्या व्हिक्टोरियन वास्तुकलासाठी ओळखले जाते. हे शहर मूळतः 19 व्या शतकाच्या सुरुवातीस माउच चंक...

कृत्रिम पावसाची व्यवहार्यता तपासा: पक्षाचे नेते पीएमसीला | पुणे बातम्या

सोमवारी पीएमसीमध्ये सर्वपक्षीय समितीच्या बैठकीत राजकारण्यांनी पुण्यासाठी कृत्रिम पावसाच्या व्यवहार्यतेवर चर्चा केली आणि नागरी प्रशासनाला शक्यता तपासण्यास सांगितले. पुणे : पुणे महानगरपालिकेत (पीएमसी)...

error: Content is protected !!