( प्रमोद दळवी )
उल्हासनगर दि ९ : केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार राज्यभरात मॉक ड्रिलच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर महानगरपालिकेच्या मागील परिसरात सायंकाळी ६ वाजता मॉक ड्रिलचे प्रात्यक्षिका दाखवण्यात आले.

जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर युद्धजन्य किंवा आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास नागरिकांनी कोणती सतर्कता बाळगावी, तसेच प्रशासनाने कोणती पावली उचलावी, यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या. नागरी संरक्षण दलाने सायरन वाजून नागरिकांना धोक्याचा इशारा देण्यात आला. सर्व नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यासाठीच्या सूचना संबंधित परिसरात शोध मोहीम घेऊन जखमी अडकलेल्या नागरिकांची तात्काळ सुटका करणे, त्यांना प्रथमोपचार करणे, अशी कार्यवाही करण्यात आली. त्यावेळी पोलीस, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते’

नागरिक संरक्षण दलाचे विजय जाधव यांनी सांगितले की केंद्र शासनाच्या आदेशाप्रमाणे भारतातील ८०० जिल्ह्यांपैकी २४४ अधिक १५० जवळजवळ ४०० जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल करण्यात आले. आज ऐनवेळी मा. जिल्हाधिकारी तथा नियंत्रण नागरी संरक्षण यांच्या मान्यतेने उल्हासनगर येथील जागा निश्चित करुन मॉक ड्रिल द्वारे प्रात्यक्षिका दाखवण्यात आले.त्यामध्ये पोलीस, फायर ,महसूल ,महानगरपालिकेचे अधिकारी ,कर्मचारी आणि इतर सर्व यंत्रणेने सहभाग घेतला होता. सिविल डिफेन्स मार्फत मॉक ड्रिल सादर करण्यात आला होता. याचा मुख्य उद्देश हे आहे की अटॅक झाला, किंवा काही दुर्घटना झाली, त्यात पब्लिक व आम नागरिकांनी घाबरू नये, त्यात शासन प्रणाली आपल्या सोबत आहे आपणास काही होणार नाही हे त्यांना दाखवणं आणि दर्शवण्यास खूप गरजेचे आहे असे विजय जाधव यांनी सांगितले. या मॉक ड्रिला उल्हासनगरातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.






























