Homeशहरउल्हासनगर गुन्हे शाखेची मोठी कारवाई ; भायखळ्यातील घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीवर झडप :...

उल्हासनगर गुन्हे शाखेची मोठी कारवाई ; भायखळ्यातील घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीवर झडप : १० लाख ९० हजार २६१रुपयाचे सोन्याचे दागिने हस्तगत

उल्हासनगर दि. २० ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर गुन्हे शाखा, घटक- ४  ने केलेल्या प्रभावी कारवाईत भायखळा परिसरातील घरफोडी प्रकरणातील तब्बल १० लाख ९० हजार २६१ रुपये किमतीचे ८६  ग्रॅम ३२० मिली वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात यश मिळविले आहे. या प्रकरणात एका आरोपीला ताब्यात घेऊन चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपासासाठी आरोपीस भायखळा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगर गुन्हे शाखा, घटक- ४  चे पोलीस हवालदार गणेश गावडे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, घरफोडीचे गुन्हे करणारा एक इसम उल्हासनगर कॅम्प नं -१ येथील अमरडाय कंपनीजवळ, उल्हास नदीकडे जाणाऱ्या रस्त्यावर येणार आहे. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून संशयित इसमास ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने आपले नाव नूर नबीर गुलाब कादर शेख (वय २९ ), रा. मुसाफिरखाना, सॅन्डस रोड, वाडी बंदर ब्रिजवरील झोपडी, डोंगरी, मुंबई असे सांगितले. सखोल चौकशीत त्याने भायखळा येथील एका इमारतीतील घरात घरफोडी करून सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. तसेच चोरीचा मुद्देमाल त्याचा मित्र अंजुम मुजाअली शेख, माझगाव, मुंबई याच्याकडे ठेवण्यासाठी दिल्याची माहितीही त्याने पोलिसांना दिली. त्यानंतर उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पथकाने भायखळा पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहिती घेतली असता, या घटनेप्रकरणी भायखळा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ०४३३/२०२६  अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 मधील कलम ३३१ (३ ) व ३०५ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी अंजुम मुजाअली शेख याचा शोध घेऊन त्याच्याकडून चोरीस गेलेले एकूण ८६ ग्रॅम ३२० मिली वजनाचे सोन्याचे दागिने, किंमत सुमारे १० लाख ९० हजार २६१ रुपये किमतीचे हस्तगत केले. जप्त करण्यात आलेला मुद्देमाल, मुद्देपावती, पंचनामा यासह आरोपी नूर नबीर गुलाब कादर शेख यास लेखी अहवालासह पुढील कारवाईसाठी भायखळा पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. ही उल्लेखनीय कारवाई उल्हासनगर गुन्हे शाखा, घटक- ४  चे पोलीस निरीक्षक राजेश गज्जल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अशोक पवार, पोलीस हवालदार गणेश गावडे, राजेंद्र थोरवे, अशोक थोरवे, प्रकाश पाटील, विक्रम जाधव, रितेश वंजारी, अमर कदम तसेच पोलीस कॉन्स्टेबल रेवणनाथ शेकडे यांनी संयुक्तपणे पार पाडली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात CJP कार्यकर्त्यावर बेकायदेशीर सभेचा गुन्हा दाखल

पुणे : डेक्कन जिमखाना पोलिसांनी सोमवारी झुरळ जनता पार्टी (सीजेपी) शी संबंधित 10 तरुणांवर बेकायदेशीर असेंब्लीचा गुन्हा दाखल केला जेव्हा ते जेएम...

‘तो जे पाहत होता ते मी पाहू शकलो नाही’: संजू सॅमसनने T20 WC दरम्यान...

भारतीय क्रिकेटपटू संजू सॅमसन संजू सॅमसनने उघड केले आहे की आयसीसी पुरुष T20 विश्वचषक 2026 दरम्यान रोहित शर्माचे आश्वासक शब्द टूर्नामेंटच्या शेवटच्या टप्प्यात...

35 लाखांच्या चरससह मेंढपाळाला अटक

नवी मुंबई : चरस विकत असल्याच्या माहितीवरून १८ जुलै रोजी सापळा रचून १०.७३ लाख रुपये किमतीची २.१४६ किलो चरस जप्त करून ६३...

जिल्ह्याला अधिक डेटा-एंट्री ऑपरेटरची गरज भासत आहे कारण मतदारांची गर्दी वाढत आहे

डेटा-एंट्री ऑपरेटरच्या कमतरतेमुळे पुण्यातील मतदार यादी पुनरिक्षण प्रक्रियेला विलंब होत आहे. पुणे: पुणे जिल्ह्यातील मतदार याद्यांच्या विशेष गहन पुनरिक्षण (SIR) मध्ये डेटा-एंट्री ऑपरेटरची...

जैनम जैन यांना भेटा: बुर्ज खलिफा येथे कार्यालय असलेले 14 वर्षीय AI संस्थापक आणि...

प्रतिमा क्रेडिट्स: Instagram/Upsc वर्ल्ड अधिकृत बहुतेक पालक आपल्या मुलांना यशस्वी झाल्याचे स्वप्न पाहतात. पण यश हे फक्त चांगले गुण मिळवण्यापुरते नसते तर? जिज्ञासू,...

error: Content is protected !!