Homeशहरउल्हासनगरात भाजपाचा भव्य रोजगार मेळावा; ७५० हून अधिक युवक-युवतींचा सहभाग, १५० जणांना...

उल्हासनगरात भाजपाचा भव्य रोजगार मेळावा; ७५० हून अधिक युवक-युवतींचा सहभाग, १५० जणांना तत्काळ नियुक्तीपत्र

उल्हासनगर दि. २० ( प्रमोद दळवी ): भारतीय जनता पार्टी उल्हासनगर जिल्हा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य रोजगार मेळाव्याला युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यात सुमारे ७५० हून अधिक उमेदवारांनी सहभाग नोंदवत विविध नामांकित कंपन्यांसमोर मुलाखती दिल्या. २० पेक्षा अधिक कंपन्यांनी या रोजगार मेळाव्यात सहभाग घेत उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या.

भाजपाचे उल्हासनगर जिल्हाध्यक्ष राजेश वधारीया  यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेळाव्याच्या पहिल्याच दिवशी १५० युवक-युवतींना ऑन-द-स्पॉट नियुक्तीपत्रे देण्यात आली. आणखी सुमारे १०० उमेदवारांची कागदपत्र पडताळणी अंतिम टप्प्यात असून, ती पुढील २४ तासांत पूर्ण झाल्यानंतर त्यांनाही नियुक्तीपत्रे देण्यात येणार आहेत. नियुक्तीपत्र मिळालेल्या उमेदवारांना दुसऱ्याच दिवशी कामावर रुजू होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या रोजगार मेळाव्याचा मुख्य उद्देश स्थानिक युवक-युवतींना रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध करून देणे हा होता. मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या युवकांनी या उपक्रमाचे स्वागत करत रोजगाराच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल असल्याची भावना व्यक्त केली.

राजेश वधारीया  म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या १२ वर्षांच्या कार्यकाळानिमित्त तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळातील महत्त्वपूर्ण टप्प्यानिमित्त भाजपाच्या उल्हासनगर जिल्हा कार्यालयात या भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्यात ब्लिंकेट, महिंद्रा अँड महिंद्रा यांच्यासह २० हून अधिक नामांकित कंपन्यांच्या एचआर विभागातील अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. मुलाखतीसाठी आलेल्या उमेदवारांमध्ये बहुसंख्य युवक-युवती उल्हासनगरमधील होते, तर अंबरनाथ आणि बदलापूर येथील उमेदवारांचाही सहभाग होता.

यावेळी उपमहापौर अमर लुंड यांनी ४ ऑगस्ट रोजी उल्हासनगर ४ आणि ५ परिसरात आणखी एका भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा केली. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त २१ तारखेला पेट ऑक्सफर्ड स्कूल येथे महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहितीही राजेश वधारीया  यांनी दिली. उल्हासनगरमधील सर्व आठ मंडळांमध्ये टप्प्याटप्प्याने रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असून, उर्वरित ठिकाणांची माहिती लवकरच जाहीर केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘आता तुम्ही संजू सॅमसन आणि वैभव सूर्यवंशीप्रमाणेच केएल राहुललाही खराब करत आहात’: भारताच्या माजी...

केएल राहुल (इमेज क्रेडिट: बीसीसीआय) नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार क्रिस श्रीकांतने लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेदरम्यान केएल राहुलला सहाव्या क्रमांकावर पाठवल्याबद्दल भारतीय...

बेस्ट अपघातात ठार झालेले 65 वर्षीय शेतकरी आपल्या मुलीला भेटण्यासाठी आणि कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी...

मुंबई : मानखुर्द येथे सायन-पनवेल महामार्गावर सोमवारी बेस्टची बस रस्त्याच्या कडेला असलेल्या दुभाजकावर आदळल्याने दहा जण गंभीर जखमी झाले असून एकाचा मृत्यू...

आंतरराष्ट्रीय अभ्यास कोविड उघड झाल्यानंतर पुरवठा साखळीतील अंतर स्थानिक उपाय देते | पुणे बातम्या

पुणे : कोविड साथीच्या रोगाने जग कसे असुरक्षित आहे हे दाखवून दिल्यानंतर महाद्वीपांमध्ये पसरलेल्या प्रयोगशाळा स्थानिक पातळीवर निदान आणि संशोधनासाठी आवश्यक असलेले महत्त्वाचे जैविक...

एलोन मस्कचे कोट: इलॉन मस्कचे दिवसाचे कोट: “तुम्ही चुकीचे आहात असा दृष्टीकोन घ्यावा. तुमचे...

आत्मविश्वासासह यशाची जोड पुरेशी वैशिष्ट्यपूर्ण आहे. इलॉन मस्कचे प्रसिद्ध कोटेशन अगदी विरुद्ध आहे: "तुम्ही चुकीचे आहात असा दृष्टीकोन घ्यावा. तुमचे ध्येय कमी...

शिक्रापूर येथील गृहप्रकल्पातील चार एकर जमिनीचा लिलाव हायकोर्टाने रद्द केला; महारेरा वॉरंटच्या अंमलबजावणीतील त्रुटींसाठी...

पुणे : महारेराने 2021 मध्ये जारी केलेल्या रिकव्हरी वॉरंटच्या विरोधात शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथील ऑरा सिटी गृहनिर्माण प्रकल्पाचा एक भाग असलेल्या 4.42...

error: Content is protected !!