उल्हासनगर दि.१७ ( प्रमोद दळवी ) : वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने, शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशाने व खासदार डॉ.श्रीकांतजी शिंदे, युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कल्याण लोकसभेत युवासेनेच्या अंतर्गत संघटना वाढवण्याच्या दृष्टिकोनातून उल्हासनगर खासदार कार्यालय, गोल मैदान येथे उल्हासनगर १, ४ व ५ शहर येथील युवासेनेच्या विविध पदांवर असणाऱ्या अनेक युवसैनिकांना नियुक्ती पत्र वाटप करण्यात आले व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.तसेच युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करण्यात आले.

काही पदाधिकारी यांना पद वाढ देऊन तर काही नवीन पदाधिकाऱ्यांना पद देऊन जबाबदारी देण्यात आली. यात शहर सरचिटणीस पदी अँड. प्रवीण करिरा, उपशहर अधिकारी पदी अक्षय माडगूळकर, रवि वर्मा, हफुझू खान, आकाश सोनवणे तसेच विभाग अधिकारी , उप विभाग अधिकारी व शाखा अधिकारी या पदावर युवासैनिकांची नियुक्ती शहर अध्यक्ष सुशील पवार यांचा नेतृत्वाखाली करण्यात आली. येत्या आगामी निवडणूक काळात आणखी जोमाने काम करतील अशी ग्वाही वरिष्ठांना देण्यात आली.

या कार्यक्रमाला शिवसेना प्रवक्ते किरण सोनावणे ,कल्याण जिल्हा अध्यक्ष जितेंन पाटील, लोकसभा जिल्हा सचिव राहुल श्रीधर म्हात्रे, हरजिंदर सिंह भुल्लर (विक्की), उपजिल्हा अध्यक्ष युवराज पाटील, शहर अध्यक्ष सुशील पवार,.बाळा श्रीखंडे, .सुरजीत पंजाबी, विक्की बागुल आणि इतर युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





























