Homeशहरउल्हासनगरात गुढीपाडव्याच्या स्वागतासाठी तरुणाई उतरली रस्त्यावर: विविध ठिकाणाहून नागरिक स्वागत यात्रेत सहभागी

उल्हासनगरात गुढीपाडव्याच्या स्वागतासाठी तरुणाई उतरली रस्त्यावर: विविध ठिकाणाहून नागरिक स्वागत यात्रेत सहभागी

उल्हासनगर दि १९ ( प्रमोद दळवी ) : सालाबादप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात उल्हासनगरात भव्य दिव्य  नववर्ष हिंदू स्वागत यात्रा समितीतर्फे गुढीपाडवा स्वागत यात्रा २०२६ काढण्यात आली.

काढण्यात आलेल्या या स्वागत यात्रेत मोठ्या प्रमाणात लोकांचा उत्साह बघायला मिळाला. समितीचं यंदाचा पाचवा वर्ष होतं. ही स्वागत यात्रा उल्हासनगर शहरातील कॅम्प  नंबर – ४  परिसरातील श्रीराम नगर पासून शिवाजी महाराज मैदानापर्यंत काढण्यात आली होती. ठिकठिकाणी नागरिक या स्वागत यात्रेसाठी आले होते. वेगळ्या पद्धतीने वेशभूषा व पारंपारिक पद्धतीचा पेहरावा नागरिकांनी केला होता. देवी देवतांचे ही मुखवटे घालून नागरिक या स्वागत यात्रेमध्ये सामील झाले होते. ढोल ताशांच्या गजरात नाचत गाजत ही स्वागत यात्रा काढण्यात आली होती. मोठ्या संख्येने महिला वर्ग सकाळपासून या गुढीपाडवा स्वागत यात्रेमध्ये सहभागी झाले होते. भजन कीर्तनकार मंडळी देखील या स्वागत यात्रेत सहभागी झाले होते.

या गुढीपाडवा स्वागत यात्रेचे स्वागत करण्यासाठी ठीक ठिकाणी नागरिकांनी गुढ्या उभारल्या होत्या. मोठ्या उत्साहात काढण्यात आलेल्या या गुढीपाडवा स्वागत यात्रेचा ठिकठिकाणी सत्कार करून शुभेच्छा देखील देण्यात आल्या. शहरातील पॅनल क्रमांक १३,  १४  आणि १५  मधील सर्व नगरसेवक, सर्व पदाधिकारी ,विविध पक्षाचे नेते आणि सगळ्या मंडळांनी या गुढीपाडवा स्वागत यात्रेत सहभाग घेतला होता.

या यात्रेच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात तरुणाई रस्त्यावर उतरली होती. याबाबत नगरसेवक अरुण आशान यांनी सांगितले ही गुढीपाडवा स्वागत यात्रा ही उल्हासनगरातील एकमेव मराठी नववर्षा हिंदू वर्षाची ही स्वागत यात्रा आहे. मला वाटतं की बाळासाहेबांची अस्मिता जपणारे बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चालणारे सन्माननीय उपमुख्यमंत्री आमचे लाडके नेते एकनाथ शिंदे साहेब आणि आमचे लाडके खासदार डॉ. श्रीकांत शिंदे साहेब ज्या पद्धतीने हिंदू वारसा जपतायेत त्याचं प्रतीक म्हणून आम्ही या संस्कृतीचे जतन केलेल्या आनंद दिघे साहेबांचा वारसा आम्ही पुढे चालवत आलेलो आहोत. बाळासाहेबांचा वारसा शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने या समितीचे यंदाचा पाचवं वर्ष आहे असे अरुण आशान म्हणाले. नागरिकांचा या गुढीपाडवा स्वागत यात्रेला इतका उत्साह आहे की सकाळी साडेसहा वाजल्यापासून मोठ्या संख्येने विविध परिसरातून विविध प्रांतातून नागरिक या स्वागत यात्रेत सहभागी झाले होते  असेही आशान म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

PMC संचालित शाळा चालवण्यात खाजगी संस्था स्वारस्य दाखवतात

पीएमसीचा शिक्षण विभाग 250 मराठी, इंग्रजी, उर्दू आणि कन्नड-माध्यमाच्या शाळा चालवतो जेथे सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थी शिक्षण घेतात. या शाळांमध्ये सुमारे...

नॉर्वे विरुद्ध कोट डी’आयव्होअर, फिफा विश्वचषक सामन्याचा निकाल: हॅलँडने 16 फेरी गाठण्यासाठी नॉर्वेला मृत्यूच्या...

ऑस्लो, मंगळवार, 30 जून, 2026 रोजी आयव्हरी कोस्ट आणि नॉर्वे यांच्यातील 2026 विश्वचषकादरम्यान 16 च्या फेरीतील सॉकर सामन्यात विजयानंतर नॉर्वेजियन चाहते जल्लोष करत...

तांब्याची तार चोरणारी चौघांची टोळी पकडली | मुंबई बातम्या

या वायरची किंमत सुमारे 40 लाख रुपये आहे मुंबई: शहर गुन्हे शाखेने MTNL अधिकाऱ्यांची तोतयागिरी केल्याप्रकरणी आणि बोरिवली पूर्व येथून 39.40 लाख रुपये...

नाल्यांमध्ये अडकलेल्या गौरची वन पथकाने सुटका केली

गौर आपल्या कळपापासून विभक्त होऊन शहरी किनाऱ्याजवळ राहिली असावी. अन्न किंवा पाण्याच्या शोधात ते शहरात दाखल झाले असावे पुणे : सिंहगड रोडवरील विश्रांतीनगर...

इस्माईल सायबारी: “डॉक्टरांनी सांगितले की मी कधीच चालू शकत नाही”: मोरोक्कोचा फिफा डब्ल्यूसी नायक...

ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. फुटबॉल खेळपट्टीवर टिकणारे उत्सव आहेत. आणि मग असे काही क्षण असतात जे खेळाच्या पलीकडे जातात. मोरोक्कोने...

error: Content is protected !!