- डॉक्टरांच्या हॉस्टेलवर एअर इंडियाचे विमान कोसळल्याने पूर्ण इमारत जळून खाक
- या दुर्घटनेत अनेक डॉक्टरांचा मृत्यू झाल्याची शक्यता
- या भीषण दुर्घटनेत फक्त एकच प्रवासी जिवंत सापडला
- विमानातील सर्व २४१ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू
गुजरात दि १२ : गुजरातच्या अहमदाबाद मधील एअर इंडियाच्या विमानाचा अपघाता झाला आहे. २४२ प्रवाशांना लंडनला घेऊन जाणारे विमान अहमदाबाद विमानतळा बाहेरील परिसरात असलेल्या डॉक्टरांसाठीच्या हॉस्टेलवर कोसळले आहे. यामुळे हॉस्टेल परिसरातील वाहने जळून खाक झाली असून हॉस्टेलमधील विश्रांती घेत असलेले डॉक्टर, कर्मचारी यांच्याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
एअर इंडियाचे AI171 हे विमान अहमदाबादवरून लंडन जात होते. प्राथमिक माहितीनुसार, विमानात २३० प्रवासी आणि १२ क्रू मेबर्स, असे एकूण २४२ लोक होते. विमानाने गुरुवारी (१२ जून) दुपारी १ वाजून ३८ मिनिटांनी उड्डाण केले. पण,त्यानंतर काही मिनिटांतच मेघानीनगर भागात कोसळले. ज्या इमारतीवर हे विमान कोसळले ती इमारत डॉक्टरांचे हॉस्टेल असल्याचे तेथील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, “प्राथमिक माहितीनुसार, लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या वसतिगृहात कोसळले आहे. २-३ मिनिटांत पोलिस आणि इतर एजन्सी घटनास्थळी पोहोचल्या. जवळजवळ ७०-८०% परिसर रिकामा करण्यात आला आहे. सर्व एजन्सी काम करत आहेत. या अपघातग्रस्त बोईंग ७८७-८ विमानात २४२ प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. यापैकी १६९ भारतीय नागरिक, ५३ ब्रिटिश नागरिक, १ कॅनेडियन नागरिक आणि ७ पोर्तुगीज नागरिक आहेत.

आजवर जेवढ्या विमान दुर्घटना झाल्या त्यात एवढ्या मोठ्या संख्येने प्रवासी कधीच मृत्यूमुखी झाले नव्हते पण या दुर्घटनेत एअर इंडियाच्या विमानातील सर्वच प्रवासी सुमारे २४१ प्रवासी यांचा मृत्यू झाला. याशिवाय ज्या डॉक्टरांच्या हॉस्टेलवर हे विमान कोसळले त्या ठिकाणावरील देखील काही कर्मचारी व डॉक्टर यांचा मृत्यू झाल्याचा दाट संशय आहे. विमानातील सर्व २४१ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून त्यात १६९ भारतीय नागरिकांचा समावेश आहे . आतापर्यंत २०४ प्रवासांचे मृतदेह सापडले आहेत. भारतातील इतिहासातला सर्वात मोठा विमान दुर्घटनेतील हा आकडा आहे. दुर्घटनाग्रस्त विमानात नागपूरचा ही कुटुंब होते . विमान दुर्घटने प्रकरणी मृत्युमुखी झालेल्या व्यक्तींबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील संवेदना व्यक्त केली. अहमदाबादच्या मेघानित प्रवासी विमान बी जे एम मेडिकल कॉलेजच्या आवारात कोसळले . ६२५ फूट उंचीवरून हे विमान कोसळले. या भीषण दुर्घटनेत फक्त एकच प्रवासी जिवंत सापडला.या विमान दुर्घटनेत एमबीबीएसच्या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे ,रुग्णालयाची दुरुस्ती टाटा कडून केली जाणार, मृत्यूच्या कुटुंबाला प्रत्येक कोटीची टाटा मदत करणार आहे .जखमीचा खर्च टाटा करणार आहे .केंद्रीय गृहमंत्री अमित शहाणी दुर्घटना स्थळाची पाहणी केली



























