Homeशहरअतिसार थांबवा अभियानांतर्गत आनंद नगर येथे जनजागृती उपक्रम

अतिसार थांबवा अभियानांतर्गत आनंद नगर येथे जनजागृती उपक्रम

ठाणे दि.१९ ( प्रमोद दळवी )  : ठाणे महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या “अतिसार थांबवा अभियान” अंतर्गत आनंद नगर आरोग्य केंद्र, कासारवडवली येथे विशेष जनजागृती उपक्रम आयोजित करण्यात आला.

या उपक्रमास ज्ञानगंगा एज्युकेशनल ट्रस्टच्या नर्सिंग महाविद्यालयाचे पीआरओ प्रा. अनिल आठवले यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. माधवी देवल, परिचारिका सौ. प्रतिभा भोये, कु. राजश्री महाले तसेच प्रसाविका, आशा व इतर आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. अभियानाअंतर्गत बाह्यरुग्ण विभागातील रुग्ण व नागरिकांना अतिसार प्रतिबंधासाठी आवश्यक आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले. हात स्वच्छ धुण्याची योग्य पद्धत, वैयक्तिक व परिसर स्वच्छता राखणे, सुरक्षित व ताजे अन्न सेवन करणे, उकळून अथवा शुद्ध केलेले पाणी पिणे तसेच शिळे अन्न टाळण्याबाबत माहिती देण्यात आली.

तसेच ORS (ओआरएस) द्रावण तयार करण्याची योग्य पद्धत समजावून सांगण्यात आली. ORS चे द्रावण तयार केल्यानंतर ते २४ तासांच्या आत वापरण्याचे तसेच उर्वरित द्रावण टाकून देण्याचे आवाहन करण्यात आले. लहान मुलांमध्ये अतिसाराची लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घेण्याचे महत्त्वही यावेळी अधोरेखित करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान हात धुण्याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले तसेच उपस्थितांना ORS पाकिटांचे वाटप करण्यात आले. नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत या जनजागृती उपक्रमात सहभाग नोंदविला.

दिनांक १६ जून ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत सुरू असलेल्या “अतिसार थांबवा अभियान” अंतर्गत अशा विविध जनजागृती उपक्रमांद्वारे नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्याचे कार्य सुरू असून, या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व संबंधितांचे आभार व्यक्त करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘एक सौदा भुताचा’ चित्रपटाचा भव्य प्रीमियर शो उत्साहात संपन्न :भय, थरार आणि रहस्याची अनुभूती...

नाशिक दि. १५ ( प्रमोद दळवी )  : भय, थरार आणि रहस्याचा अनोखा संगम असलेल्या ‘एक सौदा भुताचा’ या मराठी हॉरर-थ्रिलर चित्रपटाचा भव्य प्रीमियर...

उल्हासनगर महानगरपालिकेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा : ११० फूट उंच राष्ट्रध्वजाला मानवंदना; महिला प्रशिक्षणार्थींचा...

उल्हासनगर दि. १५ ( प्रमोद दळवी )  : भारतीय स्वातंत्र्याच्या ८० व्या वर्धापन दिनानिमित्त उल्हासनगर महानगरपालिकेत स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात...

हर घर तिरंगा २०२६’ मोहिमेत फाळणी दिवस प्रदर्शन व कँडल मार्चचे आयोजन

उल्हासनगर दि. १४ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगर महानगरपालिकेच्या वतीने ‘हर घर तिरंगा २०२६’ मोहिमेअंतर्गत शुक्रवार, दि. १४ ऑगस्ट २०२६ रोजी सिंधू भवन,...

बदलापूर पुर्व येथील सोनार यांची दागिन्यांची फसवणूक करून अपहार करणाऱ्या आरोपीस गुन्हे शाखा घटक...

उल्हासनगर दि. १४ ( प्रमोद दळवी )  : बदलापूर पूर्व परिसरातील आपटेवाडी रोड येथील मोरया ज्वेलर्स तसेच त्यांच्याकडे दागिने घेऊन आलेल्या ग्राहकांची फसवणूक करून...

उल्हासनगर महानगरपालिकेचे मा. सचिव प्रकाश कुकरेजा यांना वाढदिवसानिमित्त राजेंद्रसिंह भुल्लर (महाराज) यांनी दिल्या शुभेच्छा

उल्हासनगर दि. १३ ( प्रमोद दळवी )  : प्रजा कृपा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच उल्हासनगर महानगरपालिकेचे मा. सचिव प्रकाश कुकरेजा यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना शहरप्रमुख...

error: Content is protected !!