अंबरनाथ दि.१४ ( प्रमोद दळवी ) : अंबरनाथ नगरपरिषद संचालित डिजिटल मराठी शाळा क्रमांक १ व १३ ,शाळा क्रमांक ११ (तमिळ माध्यम ) या शाळेत अचानक साप शिरल्याने विद्यार्थी आणि शिक्षक वर्गांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

शाळेत साप करण्याची माहिती प्रिन्सिपल यांना मिळताच त्यांनी त्वरित सर्पमित्र आकाश गोहिल यांना याबाबत माहिती दिली. आकाश गोहिल यांनी त्वरित त्या शाळेत दहा घेऊन सर्वप्रथम भयभीत झालेल्या विद्यार्थ्यांना दिलासा दिला. त्यानंतर त्या सापाचा शोध घेऊन त्याला त्या शाळेतून पकडले. पकडण्यात आलेला साप हा धामण जातीचा साप असून तो चार फूट लांबीचा साप आहे. याशिवाय तो बिनविषारी साप असल्याने आकाश गोहिल यांनी त्या सापा बाबत शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व सिक्युरिटी गार्ड यांना परिपूर्ण माहिती दिली. सर्पमित्र आकाश गोहिल यांनी त्या शाळेतून साप पकडल्याने विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेली भीती दूर झाली. पकडण्यात आलेला त्या धामण सापाला जंगलात सोडण्यात आले असल्याची माहिती आकाश यांनी दिली.





























