- पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते आपत्तीग्रस्तांना इतर जीवनावश्यक वस्तू आणि ब्लॅंकेट्सचे वाटप
धाराशिव दि.२६ : धाराशिव जिल्ह्याच्या भूम तालुक्यातील साडेसांगवी गावात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पुरपरिस्थितीची आज शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांनी केली. संकटात सापडलेल्या गावकऱ्यांना तातडीने सर्व मदत देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
साडेसांगवी येथील पुरग्रस्त शेतकरी ज्ञानेश्वर डोंबाळे यांना आपल्या व्यथा शिंदे यांच्यापुढे मांडताना भावना अनावर झाल्या. “सगळं काही वाहून गेलं आहे, आता आत्महत्या करणं बाकी राहिलंय…” अशा शब्दांत त्यांनी त्यांची परिस्थिती सांगितली. या संकटातून सावरण्यासाठी ग्रामस्थांना तात्काळ मदत देण्याचे निर्देश शिंदे यांनी देतानाच, शिवसेनेच्या वतीने ग्रामस्थांना तातडीने किराणा किटचे वाटप करण्यात आले. तर पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते आपत्तीग्रस्तांना इतर जीवनावश्यक वस्तू आणि ब्लॅंकेट्सचे वाटप करण्यात आले.
बाणगंगा आणि रामगंगा नदीवर मोठा पूल बांधण्याची तसेच घर आणि शेतीचे पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई देण्याची मागणी ग्रामस्थांनी यावेळी शिंदे यांच्याकडे केली. याबाबत बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फोनवरून बोलून तात्काळ मदत देण्याचे निर्देश दिले.





























