Homeशहरमोबाईलच्या प्रकाशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भीम अनुयायींचे अभिवादन

मोबाईलच्या प्रकाशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भीम अनुयायींचे अभिवादन

 उल्हासनगर दि.१४ ( प्रमोद दळवी ) : दरवर्षी मोठ्या उत्साहात आणि धुमधडाक्यात फटाक्यांची आतिषबाजीसह ढोल ताशांच्या गजरात प.पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी उल्हासनगरातील सुभाष टेकडीत भीम अनुयायी  मोठ्या प्रमाणात आदल्या दिवशी रात्री विविध परिसरातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात रॅली घेऊन येतात आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत असतात. पण यावेळी मात्र अचानक रात्रीच विद्युत पुरवठा खंडित झाल्याने भीम अनुयायींमध्ये नाराजगीचे वातावरण पसरल्याचे दिसत होते. तरीदेखील मोठ्या उत्साहात भीम अनुयायींनी आंबेडकर चौकात उपस्थित राहून आपल्या जवळील मोबाईलच्या प्रकाशातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत मोठ्या जल्लोषात जयंती साजरी केली.

उल्हासनगरातील कॅम्प  नंबर -४ परिसरातील सुभाष टेकडीत  डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात गेल्या वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळा बसवण्यात आला. त्यावेळी मोठ्या रोषणाईत आणि विविध मान्यवरांच्या व परिसराततील हजारो भीम अनुयायींच्या उपस्थितीत पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले होते. यावर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यासाठी विविध मंडळांनी रॅलीचे आयोजन केले होते. आंबेडकर चौकात देखील उत्कृष्ट पद्धतीने सजावट करण्यात आली आहे. १३  एप्रिल रोजी रात्री बारा वाजता अनेक ठिकाणाहून विविध मंडळांच्याऱ्या रॅली ढोल ताशाच्या गजरात नाचत गाजत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी निघतात. मात्र यावेळी १३  एप्रिल रोजी सायंकाळपासूनच लाईटचा लपंडाव सुरू झाला. आणि रात्री १० वाजता पूर्ण सुभाष टेकडी, कानसई परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला. काही वेळातच लाईट सुरु होईल अशी अपेक्षा सगळ्या होती. मात्र विद्युत पुरवठा काही सुरू झाला नाही. अनेक जण एमएसईबीच्या अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त करीत होते. आंबेडकर चौकात विविध परिसरातून रॅली येण्याची वेळ झाली असताना देखील  विद्युत पुरवठा सुरू झाला नव्हता. रात्री बारा वाजले तरी विद्युत पुरवठा सुरू न झाल्याने अखेर अनेक परिसरातून भीम अनुयायींनी मोठ्या उत्साहात नाचत गाजत ढोल ताशाच्या गजरात मोबाईलच्या प्रकाशात आंबेडकर चौकात रॅली घेऊन आले . सर्वत्र अंधार असताना देखील मोठ्या उत्साहात बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी हजारोच्या संख्येने भीम अनुयायी आंबेडकर चौकात उपस्थित होते. अत्यंत शांत व शिस्तबद्ध पद्धतीने सर्वांनी मोबाईलच्या प्रकाशातच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करीत जयंती साजरी केली.

सुमारे चार तासानंतर सुभाष टेकडीतील विद्युत पुरवठा सुरू झाला. पहाटेपर्यंत काही परिसरातून रॅली येत होत्या. अंबरनाथ आनंदनगर एमआयडीसी परिसरातून विद्युत मेन लाईनीद्वारे सुभाष टेकडी, कानसई परिसरात विद्युत पुरवठा होत असल्याने अचानक मोठा लोड निर्माण झाल्यामुळे त्या ठिकाणावरील विद्युत वायर जळाली होती. ते दुरुस्तीचे काम चार तासानंतर पूर्ण झाले. विद्युत अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे सुभाष टेकडीतील भीम अनुयायींना मात्र मोबाईलच्या प्रकाशातच बाबासाहेबांना अभिवादन करावे लागल्याने त्यांच्यामध्ये नाराजगीचे वातावरण पसरलेले दिसत होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मुंबईत टरबूज खाल्ल्यानंतर एका कुटुंबातील ४ जणांचा संशयास्पद अन्नातून विषबाधा होऊन मृत्यू झाला

मुंबई: पती (40), पत्नी (35) आणि 16 आणि 13 वर्षांच्या दोन मुलींचा रविवारी संशयास्पद अन्नातून विषबाधा झाल्यामुळे चार जणांच्या कुटुंबाचा मृत्यू झाला,...

PCMC 60 कोटी बिलांची रांग: मुख्य लेखाधिकारी विभागाच्या अधिकाऱ्यांवर ठपका ठेवतात

पुणे: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या (पीसीएमसी) लेखा विभागात यावर्षी 30 मार्च रोजी 60 कोटी रुपयांची बिले मंजूर करण्यात आलेल्या अनियमिततेची गेल्या आठवड्यात चौकशी समितीने पुष्टी...

आयपीएल 2026: ‘क्रिकेट उपकरणाचा गैरवापर’ – एलएसजी विरुद्ध केकेआर सामन्यात वादग्रस्त बाद झाल्यानंतर आंक्रिश...

अंपायर्ससोबत चर्चा करताना आंगकृष्ण रघुवंशी (पीटीआय फोटो) नवी दिल्ली: कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणाऱ्या आंग्रश रघुवंशीला लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान आयपीएल आचारसंहिता मोडल्याबद्दल...

हा लहान मुलगा त्याच्या वाढदिवसाच्या केकला ‘नाही’ म्हणाला तोपर्यंत…: पुढे जे घडले ते पालकांसाठी...

मोठे झाल्यावर, आम्ही उत्सवाचे मोजमाप भव्य सजावट, उत्तम प्रकारे नियोजित कार्ये आणि पार्ट्या किंवा महागड्या भेटवस्तूंद्वारे करतो. पण लहानांसाठी, केकचा आकार किंवा...

शहरी जैवविविधतेला चालना देण्यासाठी NIBM रोड परिसरात मियावाकी जंगलाची योजना केली आहे

पुणे: दाट, स्थानिक वृक्षारोपणाद्वारे शहरी जैवविविधता बळकट करण्याच्या व्यापक प्रयत्नाचा एक भाग म्हणून पुणे वन विभाग आनंदवन फाउंडेशनच्या सहकार्याने NIBM रोडलगत एक हेक्टर जागेवर...

error: Content is protected !!