Homeताज्या बातम्यामेरा भारत ठाणे व नशाबंदी मंडळातर्फे ‘नशा मुक्त युवा, विकसित भारतासाठी’ कार्यक्रम...

मेरा भारत ठाणे व नशाबंदी मंडळातर्फे ‘नशा मुक्त युवा, विकसित भारतासाठी’ कार्यक्रम उत्साहात संपन्न

ठाणे दि. ३१  : भारत सरकारच्या युवक कल्याण व क्रीडा विभागांतर्गत मेरा भारत ठाणे आणि नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने विद्या प्रसारक मंडळाच्या बांदोडकर विज्ञान (स्वायत्त) महाविद्यालयात ‘नशा मुक्त युवा, विकसित भारतासाठी’ हा जनजागृतीपर कार्यक्रम उत्साहात पार पडला.

महाविद्यालयाच्या पतंजली सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन ‘चला मामाच्या गोव्याला जाऊ या’ या चित्रपटातील कलाकार अभिजित चव्हाण, संतोष जुवेकर आणि कुशल बद्रिके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. विंदा मांज्रमकर, मेरा भारत ठाण्याच्या जिल्हा युवा अधिकारी मनिषा शर्मा, कार्यक्रम सहाय्यक ज्योती रानी, समन्वयक सुनील गमरे, उपप्राचार्या प्रीती जांभुळकर, पर्यवेक्षक प्रा. बालाजी घुगे, कॅप्टन बिपीन धुमाळे, नाट्यदिग्दर्शक गोपी भोसले, सेवानिवृत्त प्रा. डॉ. प्रकाश माळी आणि प्रा. अनिल आठवले उपस्थित होते.

‘मतपरिवर्तनातून… व्यसनमुक्तीकडे’ या संकल्पनेवर आधारित कार्यक्रमात गीतगायन, नृत्य, नुक्कड नाटक, परिसंवाद, काव्यवाचन, चित्रकला, घोषवाक्य लेखन आणि रील निर्मिती अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. प्राचार्या डॉ. विंदा मांज्रमकर यांनी विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर राहून निरोगी व जबाबदार नागरिक बनण्याचे आवाहन केले. नशाबंदी मंडळाचे समन्वयक मिलिंद पाटील यांनी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची शपथ दिली. स्पर्धांसाठी प्रा. प्रीती जांभुळकर, प्रा. बालाजी घुगे, प्रा. डॉ. प्रकाश माळी, प्रा. अनिल आठवले, प्रा. बिपीन धुमाळे, प्रा. विनोद थोरात, प्रा. प्रल्हाद वाघ, प्रा. नुपूर तळेले, प्रा. दर्शना चव्हाण, प्रा. रुपाली पाटील, गोपी भोसले, प्रा. सुभाष काळे, कांचन गायकवाड, प्रा. आशा शिरसाट, प्रा. योगिता पडवेकर, कु. आश्लेषा भोसले, प्रा. निकिता केणी आणि प्रा. पूजा कणसे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

समारोप प्रसंगी प्राचार्या डॉ. विंदा मांज्रमकर, जिल्हा युवा अधिकारी मनिषा शर्मा आणि कार्यक्रम सहाय्यक ज्योती रानी यांच्या हस्ते सर्व परीक्षक तसेच विविध स्पर्धांतील विजेत्यांचा स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. सहभागी सर्व विद्यार्थ्यांनाही प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कॅप्टन बिपीन धुमाळे यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उल्हासनगरमध्ये साईनाथ सेवा समिती पालखी परिवारच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

उल्हासनगर दि. १५ ( प्रमोद दळवी )  : रक्तदान हेच श्रेष्ठ दान या सामाजिक भावनेतून साईनाथ सेवा समिती पालखी परिवार, उल्हासनगर-१ यांच्या वतीने भव्य...

उल्हासनगर गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५७ कोटी २५ लाखांची सायबर फसवणूक उघड

उल्हासनगर दि. १५ ( प्रमोद दळवी )  : देशातील विविध राज्यांतील नागरिकांची तब्बल ५७ कोटी २५ लाख ४४ हजार २८४ रुपयांची सायबर फसवणूक केल्याचे...

स्वातंत्र्य दिन व संविधान बहुउद्देशीय संस्थेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा : विद्यार्थ्यांना वह्या-पेनचे वाटप

उल्हासनगर दि. १५ ( प्रमोद दळवी  )  : स्वातंत्र्य दिन तसेच संविधान बहुउद्देशीय संस्थेचा वर्धापन दिन विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात...

उल्हासनगरच्या आरोग्य व्यवस्थेला नवी दिशा : ८ नागरी आरोग्य वर्धिनी केंद्रांचे लोकार्पण

नागरिकांना मिळणार अधिक सुलभ, गुणवत्तापूर्ण आणि नागरिकाभिमुख प्राथमिक आरोग्यसेवा उल्हासनगर दि.१५ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना त्यांच्या परिसरातच सुलभ, दर्जेदार...

उल्हासनगरच्या वाहतूक कोंडीवर हायटेक उपाय; Google Maps वर नजर ठेवत आता कंट्रोल रूममधून वाहतूक...

उल्हासनगर  दि. १५ ( प्रमोद दळवी ) : अरुंद रस्ते, वाढती वाहनसंख्या आणि त्यातून निर्माण होणारी वाहतूक कोंडी ही उल्हासनगर शहराची मोठी समस्या बनली...

error: Content is protected !!