Homeशहरभिवंडीतील कामवारी नदीच्या पात्रात बुडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू

भिवंडीतील कामवारी नदीच्या पात्रात बुडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू

भिवंडी दि.२१( प्रमोद दळवी ) : भिवंडी तालुक्यातील गोरसई गावातून वाहणाऱ्या कामवारी नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा पाण्याच्या खोलपात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

कामवारी नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झालेल्या त्या दोन सख्ख्या भावांची नावे सागर परशुराम धुमाळ व अक्षय परशुराम धुमाळ अशी आहेत. दुपारी तीन वाजेच्या सुमारास भिवंडी तालुक्यातील गोरसई गावाच्या वेशीवरून वाहणाऱ्या कामवारी नदीत हे दोघे सख्खे भाऊ पाहण्यासाठी गेले होते. सतत पडत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे पाण्याची पातळी वाढलेली होती. अक्षय हा पोहण्यासाठी पाण्यात उतरला असता त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्याच्या पात्रात बुडू लागला. त्याला वाचवण्याचा प्रयत्न करण्यासाठी सागर हा गेला असता ते दोघेही खोल पाण्यात बुडाले. या घटनेची माहिती पाहणाऱ्या एका मित्राने गावात दिल्यानंतर गावातील असंख्य तरुणांनी त्या नदीच्या ठिकाणी धाव घेतली. त्यांनी नदीच्या पात्रात उतरून त्या दोन्ही भावांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.

या घटनेची माहिती मिळताच नायब तहसीलदार आदेश म्हात्रे हे सुद्धा घटनास्थळी दाखल झाले. सायंकाळी साडेसात वाजता अंधार झाल्याने अग्निशामक दलाच्या जवानांनी शोध मोहीम थांबवले. सकाळी पुन्हा एनडीआरएफच्या जवानांनी शोध मोहीम हाती घेऊन दोघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या घटनेनंतर संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘माझ्या कुटुंबाशी सामना करण्यापेक्षा केतनला मारणे सोपे होते’: सिया गोयलचा पुणे पोलिसांना धक्कादायक खुलासा

लोहगड किल्ला हत्याकांडात एक धक्कादायक खुलासा झाला कारण आरोपी सिया गोयलने पोलिसांना सांगितले की तिला तिचा मंगेतर केतन अग्रवाल त्याच्या केसांच्या पॅचमुळे आवडत...

एनबीएचा पुढील शोध सुपरस्टारसाठी नाही. हे पुढील मोठ्या कल्पनेसाठी आहे

डेव्हिड ली, एनबीए इन्व्हेस्टमेंटचे प्रमुख. (फोटो क्रेडिट: एनबीए रायझिंग स्टार्स इनव्हिटेशनल) सिंगापूरमधील TimesofIndia.com: सिंगापूरमधील OCBC एरिना येथे NBA Rising Stars Invitational 2026 च्या...

दोन दुर्मिळ तांबे प्लेट्स एलिफंटाचा सागरी भूतकाळ उघडतात

या वर्षी एलिफंटा येथे उत्खनन केलेल्या दोन मोठ्या स्टोरेज जारपैकी एका खोलवर, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) ने 17 एप्रिल रोजी दुहेरी खजिना अडखळला.पश्चिम भारतातील...

‘केतनने मला सांगितले की लग्न मोडण्यास उशीर झाला आहे’: पोलिस म्हणतात की सिया गोयलने...

चॅट्स सिया गोयलच्या विधानांच्या विरोधात आहेत, लोणावळा पोलिस म्हणतात लोणावळा: रियाल्टर केतन अग्रवालच्या कथित हत्येच्या तपासाला नवे वळण मिळाले आहे, पोलिसांनी दावा केला...

स्वीडिश मंत्री तिच्या 3 महिन्यांच्या बाळाला EU बैठकीत घेऊन आले; व्हायरल व्हिडिओ देशातील उदार...

या क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. गुरुवारी संपूर्ण युरोपमधील मंत्री हवामान धोरणांवर चर्चा करण्यासाठी लक्झेंबर्गमध्ये एकत्र आले तेव्हा एका क्षणाने पटकन स्पॉटलाइट...

error: Content is protected !!