Homeशहरनीट परीक्षार्थी विद्यार्थीच्या मदतीला धावून आले अंबरनाथ पोलीस

नीट परीक्षार्थी विद्यार्थीच्या मदतीला धावून आले अंबरनाथ पोलीस

अंबरनाथ दि. २६ ( प्रमोद दळवी )  : अंबरनाथ येथील ऑडनस इस्टेट येथील केंद्रीय विद्यालयात नीटची परीक्षा देण्यासाठी आलेल्या एका विद्यार्थिनी जवळ परीक्षेसाठी लागणारा मोठा फोटो उपलब्ध नसल्याने तसेच परीक्षेसाठी थोडाच वेळ शिल्लक असताना आपण फोटो काढण्यासाठी गेलो तर परीक्षा केंद्राचा गेट बंद होईल व आपल्याला परीक्षा देता येणार नाही याचा विचार करत रडत बसलेल्या त्या विद्यार्थिनीच्या मदतीला अंबरनाथ पोलिसांनी वेळेस धाव घेऊन तिला मदत केली. तिला फोटो उपलब्ध करून दिल्याने तिला नीटची परीक्षा देता आली. खाकी वर्दीतील माणुसकीचा प्रकार अंबरनाथ मध्ये सर्वांना पाहायला मिळाला.

अंबरनाथ ऑर्डनन्स येथील केंद्रीय विद्यालय येथे NEET परीक्षा  होती. त्यावेळी परीक्षेच्या बंदोबस्तासाठी अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद व सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पानसरे व इतर कर्मचारी उपस्थित होते. त्यावेळी विद्यार्थिनी आलिशा हिच्या जवळ नीटच्या परीक्षेसाठी मोठा फोटो उपलब्ध नव्हता. याशिवाय तिने आपल्या जवळील पैसे, मोबाईल फोन व इतर वस्तू आपल्या वडिलांकडे दिल्या होत्या. वडील तिला परीक्षा केंद्रावर सोडून गेल्यावर. काही वेळानंतर तिच्याजवळ फोटो नसल्याचे तिच्या लक्षात आले. तिला परीक्षा केंद्रात प्रवेश मिळणार नाही हे समजताच ती खूपच घाबरली. याशिवाय तिच्याजवळ पैसे नसल्याने आणि वडिलांची संपर्क करण्यासाठी मोबाईल नव्हता. परीक्षा केंद्रापासून फोटो स्टुडिओ देखील लांब होते . त्यात परीक्षा सुरू होण्यास अर्धा तास शिल्लक राहिल्या होता. ती फोटो स्टुडिओतून फोटो घेऊन परत केंद्रावर येऊ शिकणार नाही हे तिच्या लक्षात येताच ती रडू लागली. आपल्याला नीटची परीक्षा मुकावी लागेल या विचारणे ती रडत असताना पोलीस बंदोबस्तावर असलेले अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद व सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पानसरे यांनी त्या विद्यार्थिनीच्या मदतीला धाव घेतली. त्यांनी त्वरित अंबरनाथ पोलीस स्टेशनच्या सरकारी वाहनातून तिला फोटो स्टुडिओमध्ये नेऊन तात्काळ फोटो काढून दिला.

पोलिसांनी वेळीच प्रसंगी तिला मदत केल्यामुळे त्या विद्यार्थिनीला नीटची परीक्षा देता आली. त्या विद्यार्थिनीने पोलिसांचे आभार प्रकट केले. य घटनेवरून त्या परीक्षा केंद्रावर खाकी वर्दीतील माणुसकीचा प्रकार सर्वांना पाहायला मिळाला. अंबरनाथ पोलिसांची संवेदनशीलता, तत्परता आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली बांधिलकी यांचे हे उत्तम उदाहरण आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

एनबीएचा पुढील शोध सुपरस्टारसाठी नाही. हे पुढील मोठ्या कल्पनेसाठी आहे

डेव्हिड ली, एनबीए इन्व्हेस्टमेंटचे प्रमुख. (फोटो क्रेडिट: एनबीए रायझिंग स्टार्स इनव्हिटेशनल) सिंगापूरमधील TimesofIndia.com: सिंगापूरमधील OCBC एरिना येथे NBA Rising Stars Invitational 2026 च्या...

दोन दुर्मिळ तांबे प्लेट्स एलिफंटाचा सागरी भूतकाळ उघडतात

या वर्षी एलिफंटा येथे उत्खनन केलेल्या दोन मोठ्या स्टोरेज जारपैकी एका खोलवर, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) ने 17 एप्रिल रोजी दुहेरी खजिना अडखळला.पश्चिम भारतातील...

‘केतनने मला सांगितले की लग्न मोडण्यास उशीर झाला आहे’: पोलिस म्हणतात की सिया गोयलने...

चॅट्स सिया गोयलच्या विधानांच्या विरोधात आहेत, लोणावळा पोलिस म्हणतात लोणावळा: रियाल्टर केतन अग्रवालच्या कथित हत्येच्या तपासाला नवे वळण मिळाले आहे, पोलिसांनी दावा केला...

स्वीडिश मंत्री तिच्या 3 महिन्यांच्या बाळाला EU बैठकीत घेऊन आले; व्हायरल व्हिडिओ देशातील उदार...

या क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. गुरुवारी संपूर्ण युरोपमधील मंत्री हवामान धोरणांवर चर्चा करण्यासाठी लक्झेंबर्गमध्ये एकत्र आले तेव्हा एका क्षणाने पटकन स्पॉटलाइट...

लोहगड किल्ला खून प्रकरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केतन अग्रवालच्या वडिलांची भेट घेतली, जलदगती...

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलदगती न्यायालयाचे आदेश दिले असून धक्कादायक लोहगड किल्ला हत्याकांडप्रकरणी उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली...

error: Content is protected !!