Homeशहरस्वातंत्र्य दिन व संविधान बहुउद्देशीय संस्थेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा : विद्यार्थ्यांना...

स्वातंत्र्य दिन व संविधान बहुउद्देशीय संस्थेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा : विद्यार्थ्यांना वह्या-पेनचे वाटप

उल्हासनगर दि. १५ ( प्रमोद दळवी  )  : स्वातंत्र्य दिन तसेच संविधान बहुउद्देशीय संस्थेचा वर्धापन दिन विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. सुभाष टेकडी, उल्हासनगर येथील संस्थेच्या कार्यालयात आयोजित कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि त्रिशरण पंचशील ग्रहण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उल्हासनगर शहराध्यक्ष प्रशांत धांडे, काँग्रेसचे राहुल कोजगे, समाजसेवक सुरेश देशमुख यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त उपस्थितांना लाडूचे वाटप करण्यात आले. तसेच सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

दरम्यान, यावर्षी संविधान बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने उल्हासनगर व अंबरनाथ परिसरातील वीटभट्टी कामगारांच्या मुला-मुलींसाठी विशेष शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आला. डिजिटल एज्युकेशन स्कूल, वीटभट्टी पालेगाव आणि जिजामाता मराठी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना राम मंदिर, वसार गाव येथे वह्या व पेनचे वाटप करण्यात आले. या वेळी वसार गावचे सरपंच दिलीप फुलोरे तसेच ज्ञानेश्वर फुलोरे यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात आले. कार्यक्रमात संविधान बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष भाई रोकडे यांनी संस्थेच्या सामाजिक कार्याचा आढावा घेत थोडक्यात प्रास्ताविक केले. संस्थेच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक आणि वंचित घटकांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांना वह्या वाटप कार्यक्रमात संजय वाघमारे, निलेश भगत, विजय पवार, प्रशांत धांडे, राहुल कोजगे, सुरेश देशमुख, सुनील मोहिते, महेंद्र धांडे, अतुल पारखंडे, राजू सूर्यवंशी, सिद्धार्थ बागडे आदी मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांना लाडूचे वाटप करून स्वातंत्र्य दिनाचा आनंदही साजरा करण्यात आला. वीटभट्टी कामगारांच्या मुलांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देत त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा संस्थेचा उपक्रम उपस्थितांकडून कौतुकास्पद असल्याचे सांगण्यात आले. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांना हातभार लावण्यात आला.कार्यक्रमाच्या शेवटी अरविंद तायडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. त्यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उल्हासनगरच्या आरोग्य व्यवस्थेला नवी दिशा : ८ नागरी आरोग्य वर्धिनी केंद्रांचे लोकार्पण

नागरिकांना मिळणार अधिक सुलभ, गुणवत्तापूर्ण आणि नागरिकाभिमुख प्राथमिक आरोग्यसेवा उल्हासनगर दि.१५ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना त्यांच्या परिसरातच सुलभ, दर्जेदार...

उल्हासनगरच्या वाहतूक कोंडीवर हायटेक उपाय; Google Maps वर नजर ठेवत आता कंट्रोल रूममधून वाहतूक...

उल्हासनगर  दि. १५ ( प्रमोद दळवी ) : अरुंद रस्ते, वाढती वाहनसंख्या आणि त्यातून निर्माण होणारी वाहतूक कोंडी ही उल्हासनगर शहराची मोठी समस्या बनली...

रस्ता सुरक्षा अभियानातून हेल्मेट वापराचा संदेश ; पत्रकारांच्या माध्यमातून जनजागृती : उल्हासनगर वाहतूक उपविभागाचा...

उल्हासनगर दि. १५ ( प्रमोद दळवी )  : रस्ता सुरक्षा आणि वाहतूक नियमांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक विभागांतर्गत...

महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य न मिळाल्याने स्वातंत्र्यदिनी उल्हासनगर महापालिका मुख्यालयासमोर लहूजी शक्ती सेनेचे...

उल्हासनगर दि. १५ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगर महानगरपालिका प्रशासनाच्या अखत्यारितील महापालिका शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, लेखन साहित्य तसेच आवश्यक शालेय...

‘एक सौदा भुताचा’ चित्रपटाचा भव्य प्रीमियर शो उत्साहात संपन्न :भय, थरार आणि रहस्याची अनुभूती...

नाशिक दि. १५ ( प्रमोद दळवी )  : भय, थरार आणि रहस्याचा अनोखा संगम असलेल्या ‘एक सौदा भुताचा’ या मराठी हॉरर-थ्रिलर चित्रपटाचा भव्य प्रीमियर...

error: Content is protected !!