Homeशहरधावत्या एक्सप्रेसमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमावर पोलिसांची झडप

धावत्या एक्सप्रेसमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमावर पोलिसांची झडप

  • सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कल्याण लोहमार्ग पोलिसांनी शोधून काढला आरोपी

 कल्याण दि.१२ ( प्रमोद दळवी ) :  कल्याण रेल्वे स्थानकातून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करत तिच्यावर धावत्या एक्सप्रेसमध्ये लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला कल्याण लोहमार्ग पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून तपास करून त्याला अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातील शेकापूर गावात सापळा रचून गजाआड करण्याची कामगिरी केली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या त्या नाराधमाचे नाव गजानन चव्हाण ( ३० ) असे आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पीडित अल्पवयीन मुलगी ही कल्याण परिसरात राहणारी आहे. मूळचा अकोला जिल्ह्यात पातुर तालुक्यातील शेकापूर गावाचा रहिवासी असलेला गजानन हा कामानिमित्त टिटवाळा येथे आला होता. तो त्याच्या भावाच्या घरी राहत होता. २९ जून रोजी ती पीडित मुलगी कल्याण रेल्वे स्थानकात आली असता गजानन याची तिच्याशी भेट झाली. त्याने तिच्या अज्ञात पणाचा फायदा घेत तिचे अपहरण करून तिला लोकल ट्रेनने टिटवाळा येथे आपल्या भावाच्या घरी नेले. दुसऱ्या दिवशी टिटवाळा ते कसारा लोकलने प्रवास करीत कसारा रेल्वे स्थानकातून अकोल्याकडे जाणारी एक्सप्रेसमध्ये बसून प्रवास करीत होता. या प्रवासादरम्यान पीडित मुलीवर धावत्या एक्सप्रेसमध्ये लैंगिक अत्याचार केला, शिवाय तिला नराधमाने आपल्या मूळ गावी बसमध्ये नेत तिच्यावर अत्याचार करत पीडित मुलीला अकोला रेल्वे स्थानकात सोडून पळून गेला होता.

दरम्यान, अकोला लोहमार्ग पोलिसांनी पीडित मुलीला ताब्यात घेऊन तिची चौकशी केली असता हा धक्कादायक प्रकार समोर आला, त्यानंतर अकोला रेल्वे पोलीस ठाण्यात पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून नराधम गजाननवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. व तो गुन्हा कल्याण लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग केलाय. या गुन्ह्याचे गांभीर्य पाहता वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरी कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक लक्ष्मण चव्हाण यांच्या पथकानं तपास सुरू केला. तपासादरम्यान नराधम पीडित मुलीला कल्याण स्थानकातून घेऊन जात असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले. कल्याण लोहमार्ग पोलीस पथकानं त्याची ओळख पटवून त्याच्या मागावर पोलीस असतानाच तो मूळगाव असलेल्या अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील शेकापूर गावात असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे स्थानिक पातूर पोलिसांच्या मदतीनं सापळा रचून त्याला अटक केली. आरोपीला कल्याणच्या रेल्वे न्यायालयात हजर केलं असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास कल्याण लोहमार्ग पोलीस करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वैभव सूर्यवंशीचा 10 वर्षांचा धाकटा भाऊ आशीर्वाद सूर्यवंशी याने झळकावले शतक

वैभव सूर्यवंशी आणि आशीर्वाद सूर्यवंशी नवी दिल्ली : सूर्यवंशी कुटुंबात क्रिकेट खेळताना दिसत आहे. किशोरवयीन सनसनाटी वैभव सूर्यवंशी आंतरराष्ट्रीय मंचावर सतत चर्चेत असतो,...

संघर्षाच्या रणांगणातून राष्ट्रवादी कधीही मागे हटणार नाही, असे सुनेत्रा म्हणाल्या

मुंबई : कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची एकजूट, अविचल निष्ठा आणि कठोर परिश्रम यातून पक्षाचे भवितव्य उज्वल होईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा...

‘वारंवार माझा अपमान केला’ : पुण्यातील टीसीएसच्या तांत्रिकाने गळफास घेतला; २ सहकाऱ्यांविरुद्ध एफआयआर

पुणे: आयटी फर्मच्या 48 वर्षीय कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर पोलिसांनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) च्या दोन कर्मचाऱ्यांसह तीन जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल...

एम्पायर स्टेट बिल्डिंगने अमेरिकेच्या मैलाचा दगड वर्षातील प्रत्येक प्रवाशाच्या न्यूयॉर्क प्रवासाचा अव्वल का असावा...

एम्पायर स्टेट बिल्डिंग, न्यूयॉर्क शहराच्या क्षितिजावर उंच, जगातील सर्वात ओळखल्या जाणाऱ्या आर्किटेक्चरल लँडमार्क्सपैकी एक आहे आणि ट्रिपॅडव्हायझरच्या 2026 ट्रॅव्हलर्स चॉईस अवॉर्ड्समध्ये यूएस...

‘2 महिला सहकाऱ्यांनी अनुकूल काम नाकारले, तज्ञांच्या बाहेर प्रकल्प नियुक्त केले’: पुणे टीसीएस तंत्रज्ञांनी...

पुणे: एका 48 वर्षीय TCS कर्मचाऱ्याचा, ज्याचा या महिन्याच्या सुरुवातीला आत्महत्येने मृत्यू झाला होता, त्याने तीन लोकांवर - दोन महिला सहकाऱ्यांसह -...

error: Content is protected !!