Homeताज्या बातम्याछत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा पुढील पिढ्यांना स्फूर्तिदायक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा पुढील पिढ्यांना स्फूर्तिदायक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

   छत्रपतींच्या राजकोट येथील पुतळ्याचे दर्शन व पूजन

  • विक्रमी वेळेत आकर्षक पुतळ्याची उभारणी
  • महाराजांचा हा देशातील बहुदा सर्वात उंच पुतळा ठरेल
  • परिसराचा विकास करुन पर्यटनाला चालना

सिंधुदुर्गनगरी, दि. ११ : छत्रपती शिवाजी महाराज महान योद्धा होते. त्यांचे विचार सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने विक्रमी वेळेत शिवरायांच्या कर्तृत्वास साजेसा भव्य पुतळा उभारला असून महाराजांचा हा पुतळा पुढील पिढ्यांना स्फूर्तिदायक ठरणार असल्याचे, प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन मुख्यमंत्र्यांनी घेऊन व पूजन केले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री नितेश राणे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले, खासदार नारायण राणे, आमदार सर्वश्री दीपक केसरकर, रवींद्र चव्हाण, निलेश राणे, निरंजन डावखरे,  जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माणिक दिवे, प्रभारी पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता  किणी आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,  सार्वजनिक बांधकाम विभागाने विक्रमी वेळेत पुतळ्याचे काम पूर्ण करुन महाराजांच्या कर्तृत्वास साजेसा भव्य पुतळा उभारला आहे. मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच यंत्रणांनी अतिशय वेगाने काम केले आहे. ज्येष्ठ मूर्तीकार राम सुतारांनी कमी वेळेत आकर्षक आणि देखणा पुतळा साकारला आहे.

आय.आय.टी.,जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे देखील पुतळा उभारणीत मोलाचे योगदान लाभले असून मी सर्वांचे अभिनंदन करतो. पुतळा उभारताना कोकणातील वेगवान वारे व वादळांचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे. याची उंची पाहता महाराजांचा हा देशातील बहुदा सर्वात उंच पुतळा ठरेल. पुतळ्याची भव्यता लक्षात घेता पुतळ्याच्या आसपासचा परिसर विकसित करुन पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. कोकणच्या विकासाला नेहमीच प्राधान्य दिलेले आहे. पर्यटनाच्या दृष्टीने कोकणचा अधिकाधिक विकास करणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, शिवप्रभूंच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. या भूमीत छत्रपती शिवाजी महाराजांचा हा भव्य पुतळा अभिमान, स्वाभिमान आणि शौर्याचे प्रतीक आहे. हा पुतळा इथे येणाऱ्या पर्यटक आणि शिवभक्तांसाठी एक आदराचे स्मारक ठरणार असल्याचेही ते म्हणाले.

प्रारंभी मुख्यमंत्री व मान्यवरांच्या हस्ते शिवआरती करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिकात्मक मुर्तीचे पूजन देखील करण्यात आले. यावेळी आकर्षक रंगांमध्ये फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. ज्येष्ठ मूर्तीकार अनिल सुतार, बांधकाम विभागाचे अधिकारी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

पुतळा उभारणी विषयी

सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ३१ कोटी ७५ लाख रकमेतून हा पुतळा उभारण्यात आला आहे. ज्येष्ठ मूर्तीकार राम सुतार यांच्या कंपनीमार्फत हे काम पूर्ण करण्यात आले आहे. पुतळा उभारण्याचे काम ईपीसी तत्त्वावर झालेले आहे. तलवारधारी पुतळ्याची उंची ६० फूट इतकी असून संपूर्ण पुतळा ब्राँझ धातूमध्ये उभारण्यात आला आहे.  पुतळ्याच्या आधारासाठी स्टेनलेस स्टील सपोर्ट फ्रेमवर्क करण्यात आले आहे . तसेच चौथऱ्यासाठी M50 या उच्च दर्जाचे काँक्रीट व स्टेनलेस स्टील सळईचा वापर करण्यात आला आहे. या पुतळ्याचे संकल्पन आयआयटी मुंबई या  संस्थेकडून तपासून घेण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अलेक्झांडर झ्वेरेव्हने फ्लॅव्हियो कोबोलीचा पराभव करून रोलँड गॅरोस येथे पहिले ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळवले...

पॅरिसमधील फ्रेंच ओपनमध्ये इटलीच्या फ्लॅव्हियो कोबोलीविरुद्धचा अंतिम टेनिस सामना जिंकल्यानंतर जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव्हची प्रतिक्रिया (एपी फोटो) ग्रँडस्लॅम विजेतेपदासाठी अलेक्झांडर झ्वेरेव्हची प्रदीर्घ प्रतीक्षा अखेर...

मुंबई-गोवा महामार्गावर दुचाकीच्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला, तर अन्य जखमी

नवी मुंबई: रविवारी दुपारी मुंबई-गोवा महामार्गावर मुंबईकडे जाणाऱ्या कॅरेजवे ओलांडणाऱ्या दोन महिलांपैकी एका महिलेला दुचाकीस्वाराने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर...

प्रवाशांची सुरक्षा सुधारण्यासाठी जीआरपीने पुणे रेल्वे स्थानकातून ६० भिकाऱ्यांना पुनर्वसन गृहात हलवले

पुणे : गव्हर्नमेंट रेल्वे पोलिस (GRP) च्या अधिकाऱ्यांनी प्रवाशांची सुरक्षितता वाढवण्यासाठी आणि परिसराची स्वच्छता सुधारण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून गेल्या दोन महिन्यांत...

रेस्टॉरंटमध्ये ऑर्डर करणे, दिशानिर्देशांमध्ये मदत करणे आणि बरेच काही: मुलाचा आत्मविश्वास वाढवण्याचे 7 सोपे...

जरी तुम्हाला तुमच्या मुलापेक्षा जास्त माहिती असेल तरीही, कधीकधी, त्यांचा विद्यार्थी बनणे ही आत्मविश्वास वाढवण्यासाठी सर्वोत्तम गोष्ट आहे. त्यांना समजेल असे काहीतरी शिकवायला सांगणे,...

पुनर्मूल्यांकन प्रक्रियेत CBSE विद्यार्थ्यांकडून भौतिकशास्त्रातील सुधारणांबद्दल कमाल तक्रार

सीबीएसईच्या चुकांबद्दल अनेक दिवसांचा निषेध पुणे : हजारो विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी प्रवेश केलेल्या मूल्यांकन केलेल्या इयत्ता बारावीच्या CBSE उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती दाखवतात की भौतिकशास्त्र ही...

error: Content is protected !!