उल्हासनगर दि. २ ( प्रमोद दळवी ) : सन २०२५ साठी सलग १५ वर्ष गुणवत्तापूर्ण व उत्कृष्ट सेवेबद्दल ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर मधील विठ्ठलवाडी वाहतूक उपविभाग शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांना महाराष्ट्र दिनानिमित्त १ मे २०२६ रोजी पोलीस पदक देऊन राज्यस्तरीय सन्मानाने गौरवण्यात आले आहे

ठाणे शहर पोलीस आयुक्त मा. आशुतोष डुंबरे यांच्या शुभहस्ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांना मा.पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांचे पोलीस पदक देऊन गौरवण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी पोलीस खात्यातील आजपर्यंत आपल्या सेवेतील महाराष्ट्रातील जवळपास ९ पोलीस ठाण्यात उत्कृष्ट कामगिरी करत सेवा बजावली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना जवळपास १४० रिवार्ड व ७५ हुन अधिक प्रशस्तीपत्र मिळाले आहेत. पोलीस दलात दीर्घकाळ प्रामाणिक, कर्तव्यदक्ष आणि उत्कृष्ट सेवा बजावल्याबद्दल पडवळ यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.





























