Homeशहरकुळगाव बदलापूर नगरपरिषद मध्ये मान्सूनच्या पार्श्वभूमीवर विशेष आढावा बैठक संपन्न

कुळगाव बदलापूर नगरपरिषद मध्ये मान्सूनच्या पार्श्वभूमीवर विशेष आढावा बैठक संपन्न

बदलापूर दि. २२: आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर शहरात अतिवृष्टी, पूरस्थिती, पाणी साचणे तसेच इतर संभाव्य आपत्तींचा सामना करण्यासाठी आणि नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी कुळगाव बदलापूर नगरपरिषद मध्ये शुक्रवारी  सकाळी ११.३० वाजता नगराध्यक्ष दालन सभागृह येथे मा. नगराध्यक्षा श्रीमती रुचिता घोरपडे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले.

या बैठकीत मान्सूनपूर्व तयारी, विभागांमधील समन्वय तसेच आपत्कालीन नियोजन याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. मा. नगराध्यक्षा श्रीमती रुचिता घोरपडे यांनी मान्सून काळात उद्भवू शकणाऱ्या संभाव्य अडचणींचा आढावा घेत आवश्यक सूचना दिल्या. मुख्याधिकारी श्री. मारुती गायकवाड यांनी संबंधित विभागांना दक्ष राहून आवश्यक उपाययोजना तात्काळ राबविण्याचे निर्देश दिले.शहरात कुठेही पाणी साचणार नाही याची दक्षता घेणे, वादळामुळे कोसळणारी झाडे त्वरित हटविणे, पथदिवे नियमित सुरू ठेवणे तसेच विद्युत पोलवरील सर्व जॉईंटची तपासणी करण्याबाबत संबंधित विभाग व वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या.सदर बैठकीस मा. नगराध्यक्षा श्रीमती रुचिता घोरपडे, मुख्याधिकारी श्री. मारुती गायकवाड, बांधकाम समिती सभापती श्री. रमेश सोळसे, नियोजन समिती सभापती श्री. संभाजी शिंदे, पाणीपुरवठा समिती सभापती श्री. शैलेश वडनेरे, गटनेते श्री. शरद तेली तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

राष्ट्रीय महिला पॅनेल TCS ला 127 युनिट्सवर स्वतंत्र PoSH पॅनेल तयार करण्याचे निर्देश देते

राष्ट्रीय महिला आयोगाने टीसीएसच्या नाशिक युनिटमध्ये कामाच्या ठिकाणी सुरक्षा आणि PoSH अनुपालनामध्ये "पद्धतशीर तफावत" दर्शविली. दिल्ली/पुणे: राष्ट्रीय महिला आयोगाने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला त्यांच्या...

डॉ. व्ही व्ही पोपेरे आदिवासी सेवक (महाराष्ट्र शासन) यांना राष्ट्रीय कर्तव्य सन्मान २०२६ पुरस्कार...

उल्हासनगर  दि. २२ ( प्रमोद दळवी ) : शिवओमं आर फाऊंडेशन प्रेझेंट्स मुंबई यांच्यावतीने राष्ट्रीय कर्तव्य सन्मान २०२६  कार्यक्रम मोठ्या उत्साहात ठाणे येथे संपन्न...

SRH साठी ऐतिहासिक IPL पराक्रम! अभिषेक शर्मा, हेनरिक क्लासेन, इशान किशन बनले फक्त…

इशान किशन आणि अभिषेक शर्मा (इमेज क्रेडिट: BCCI/IPL) नवी दिल्ली: सनरायझर्स हैदराबादच्या प्रभावी IPL 2026 मोहिमेमागे अभिषेक शर्मा, हेनरिक क्लासेन आणि इशान किशन...

गडचिरोलीत मुंबई ते सूरजागड हा विकास द्रुतगती मार्ग बांधणार : एकनाथ शिंदे | मुंबई...

मुंबई: मुंबई ते गडचिरोलीतील सूरजागडपर्यंत नवीन विकास द्रुतगती महामार्ग बांधण्यात येणार असल्याचे डीसीएम एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी सांगितले. शिंदे म्हणाले की, मुंबई...

सानिया मिर्झाने अँड्रीवाला फ्रेंच ओपनमध्ये महिला एकेरीची ट्रॉफी जिंकण्याची सूचना केली

सानिया मिर्झा म्हणाली की, रविवारपासून सुरू होणाऱ्या फ्रेंच ओपनमध्ये महिलांचे मैदान हे एक "ओपन मिक्स" आहे आणि मीरा अँड्रीव्हाला नवीन ग्रँडस्लॅम चॅम्पियन...

error: Content is protected !!