Homeताज्या बातम्याउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून सय्यदच्या कुटुंबियांना मदत

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून सय्यदच्या कुटुंबियांना मदत

काश्मीर दि.२५ : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर हल्ला होत असताना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पर्यटकांच्या रक्षणासाठी धावून जाणारा सय्यद आदिल हुसैन शाह या अवघ्या २० वर्षांच्या स्थानिक युवकाचा देखील दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला. माणुसकी दाखवत धाडसाने दहशतवाद्यांना सामोरे जाणाऱ्या सय्यदच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त करतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैयक्तिकरित्या सय्यदच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत केली आहे. पहलगाम येथे मदतीसाठी गेलेले शिवसेना कार्यकर्ते व सरहद संस्थेचे पदाधिकारी यांच्या माध्यमातून आज सय्यदच्या कुटुंबियांना धनादेश देण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सय्यदच्या कुटुंबियांशी संवाद साधून त्यांना धीर दिला.

अवघ्या २० वर्षाचा असलेला सय्यद आदिल पहलगाममध्ये पर्यटकांना घोड्यावरुन फिरवण्याचं काम करायचा. त्याच्या घोड्यावरुन जो प्रवासी पहलागमची सफर करत होता त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. दहशतवादी समोर आल्यानंतर सय्यद याने धाडस दाखवत एका दहशतवाद्याची रायफल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. दहशतवाद्यांनी त्याला गोळी मारल्याने त्याचा मृत्यू झाल. उपमुख्यमंत्री शिंदे बुधवारी दि.२३ एप्रिल रोजी रात्री उशीरा श्रीनगर येथे पोहोचले. तिथे पोहोचताच त्यांनी विमानतळाच्या जवळच असलेल्या कॅम्पमध्ये जाऊन राज्यातील पर्यटकांची भेट घेतली. त्यांची विचारपूस करून त्यांना दिलासा दिला. या हल्ल्यातून बचावलेल्या पर्यटकांनी सय्यद आदिलने दाखवलेली माणुसकी आणि धाडसाबाबतचा अनुभव उपमुख्यमंत्र्यांना सांगितले. त्याची दखल घेत शिंदे यांनी सय्यद  आदिलच्या कुटुबियांना तात्काळ मदत देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज सय्यद  आदिलच्या कुटुंबियांची शिवसेना कार्यकर्ते आणि सरहदचे पदाधिकारी यांनी भेट घेत मदतीचा धनादेश त्यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी स्थानिक आमदार सईद रफीक शाह उपस्थित होते. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सय्यदच्या कुटुंबियांशी संवाद साधला. सय्यद आदिलच्या भावाने हल्ल्याच्या दिवशी झालेला घटनाक्रम सांगितला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उल्हासनगर महानगरपालिकेचे मा. सचिव प्रकाश कुकरेजा यांना वाढदिवसानिमित्त राजेंद्रसिंह भुल्लर (महाराज) यांनी दिल्या शुभेच्छा

उल्हासनगर दि. १३ ( प्रमोद दळवी )  : प्रजा कृपा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच उल्हासनगर महानगरपालिकेचे मा. सचिव प्रकाश कुकरेजा यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना शहरप्रमुख...

मध्यवर्ती रुग्णालयात पहिली एंडोस्कोपिक सेप्टोप्लास्टी शस्त्रक्रिया यशस्वी : उल्हासनगरच्या आरोग्यसेवेत अत्याधुनिक सुविधेची भर

उल्हासनगर दि. १३ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयातील वैद्यकीय सेवांच्या दृष्टीने एक महत्त्वाचा आणि अभिमानास्पद टप्पा गाठण्यात आला आहे. शासकीय वैद्यकीय...

‘हर घर तिरंगा २०२६’ अभियानांतर्गत उल्हासनगरमध्ये भव्य बाईक रॅली : राष्ट्रभावनेचा जागर

उल्हासनगर दि. १३ ( प्रमोद दळवी ) : ‘हर घर तिरंगा २०२६’ अभियानांतर्गत नागरिकांमध्ये राष्ट्रभावना निर्माण व्हावी, देशप्रेमाची भावना वृद्धिंगत व्हावी तसेच राष्ट्रीय ध्वजाबद्दल...

एक हात मदतीचा सामाजिक संस्थेच्या मागणीला यश ; महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना लवकरच गणवेश व...

उल्हासनगर दि.१३ ( प्रमोद दळवी )  : शाळा सुरू होऊन जवळपास दीड महिना उलटूनही उल्हासनगर महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना अद्याप गणवेश व आवश्यक शैक्षणिक साहित्य...

अंबरनाथमध्ये गाळ्याच्या वादातून भाजप-मनसे कार्यकर्ते भिडले; पोलीस ठाण्याच्या आवारात वाहनाची तोडफोड,मनसे शहराध्यक्ष शैलेश शिर्के...

अंबरनाथ दि. १२ ( प्रमोद दळवी )  : अंबरनाथ पूर्वेकडील शिवाजीनगर परिसरात गाळ्याच्या जुन्या वादातून भाजप आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद होऊन हाणामारी झाल्याची...

error: Content is protected !!