Homeशहरआषाढी एकादशीनिमित्त ज्ञान गंगा महाविद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळा उत्साहात संपन्न

आषाढी एकादशीनिमित्त ज्ञान गंगा महाविद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळा उत्साहात संपन्न

ठाणे  दि. २५ ( प्रमोद दळवी )  : ज्ञान गंगा एज्युकेशन ट्रस्टच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या मराठी वाङ्मय मंडळ, सांस्कृतिक समिती आणि ग्रंथालय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशीनिमित्त ग्रंथ दिंडी व पालखी सोहळा भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाची सुरुवात ट्रस्टचे संस्थापक संचालक प्रा. बी. डी. पाटील यांच्या हस्ते ग्रंथांचे तसेच श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या मूर्तींचे गंध, अक्षता व पुष्प अर्पण करून पूजनाने झाली. त्यानंतर ढोल-ताशे आणि लेझीमच्या गजरात ग्रंथ दिंडी काढण्यात आली. महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी विठ्ठल नामाच्या गजरात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारून टाकला.

विद्यार्थिनींच्या आकर्षक लेझीम पथकाने सादर केलेल्या कौशल्यपूर्ण प्रात्यक्षिकाने उपस्थितांची दाद मिळवली. त्यानंतर महाविद्यालयाच्या सभागृहात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी मृदुंगाच्या साथीने सुमधुर स्वरात भजन व अभंग सादर करून भक्तिरसाची अनुभूती दिली. तसेच विद्यार्थिनींच्या दमदार नृत्याविष्काराने कार्यक्रमात अधिक रंगत आणली.

या कार्यक्रमास पदवी व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. भाविका करकेरा, ट्रस्टच्या सीओओ वंदना शर्मा, पीआरओ प्रा. अनिल आठवले, सर्व प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता सामूहिक ‘पसायदान’ पठणाने करण्यात आली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये संत परंपरेची ओळख, वाचन संस्कृतीची जपणूक आणि भारतीय संस्कृतीविषयी आदरभाव निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

घोरपडे पेठ पोलीस चौकीबाहेर एका व्यक्तीवर गोळीबार; चार धरले | पुणे बातम्या

आरोपींनी पीडितेवर, ख्वाजाउद्दीन शेखवर तीन गोळ्या झाडल्या, पण नंतरचा फोटो उमेश कुमार यांनी मारला. पुणे : शुक्रवारी सकाळी घोरपडे पेठ पोलीस चौकीबाहेर मोटारसायकलवरून...

बदलापुरात तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक; राष्ट्रवादी काँग्रेसकडून धाडसी कार्याचा गौरव

बदलापूर दि. २५ ( प्रमोद दळवी )  : आषाढी एकादशीच्या निमित्ताने बदलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अन्न व प्रशासन विभागाचे महाराष्ट्र आयुक्त तुकाराम मुंडे...

‘विद्यार्थ्यांचा विजय’: शबाना आझमी, आलिया भट्ट, प्रियांका चोप्रा, प्रकाश राज या सेलिब्रिटींपैकी प्रधान यांच्या...

विरोधानंतर शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याचे चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांनी स्वागत केले. मुंबई: याला "विद्यार्थ्यांचा विजय" म्हणण्यापासून ते जनरल झेड यांना "आशेची त्सुनामी" म्हणून गौरवण्यापर्यंत, चित्रपटातील व्यक्तिमत्त्वांनी...

शिरूरमध्ये भितीच्या ढगाखाली बिबट्याने 2 वर्षात 5 व्या चिमुकल्याचा बळी घेतला पुणे बातम्या

वन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की पिंपळसुटी, मांडवगण फराटा आणि आजूबाजूची गावे मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड, विखुरलेली फार्महाऊस आणि बिबट्यांसाठी आदर्श आच्छादन आणि अधिवास...

वेस्ट इंडिज 12.4 षटकात 18/1

वेस्ट इंडिज विरुद्ध पाकिस्तान लाइव्ह स्कोअर, पहिला कसोटी दिवस 1: वेस्ट इंडिजचा कर्णधार रोस्टन चेस याने शनिवारी ब्रायन लारा क्रिकेट अकादमी येथे पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या...

error: Content is protected !!