उल्हासनगर दि.१४ ( प्रमोद दळवी ) : हिल लाईन पोलीस ठाण्याच्या परिसरात शुक्रवारी दुपारच्या सुमारास साप निघून तो त्या ठिकाणी फिरत असल्याचे पोलिसांना दिसून आले. त्या सापाला पाहून अनेकांचा थरका उडाला. या शिवाय नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी त्वरित सर्पमित्र आकाश गोहिल याला या सापाची माहिती दिली. आकाश यांनी हिललाईन पोलीस ठाण्यात येऊन परिसरात फिरत असलेल्या त्या सापाचा शोध घेण्यास सुरुवात केली.

तो साप त्या ठिकाणी लपून बसलेला असल्याचे दिसून आले. आकाश यांनी त्वरित त्या सापाला पकडले. तो साप नानेटी प्रजातीचा असून तो साप बिनविषारी आहे. दोन फूट लांबीचा तो साप असून त्या सापा बाबत आकाश यांनी पोलिसांना माहिती दिली. आकाश याने मोठ्या चपळाईने त्या सापाला पकडल्याने पोलिसांनी त्याला शाब्बासकी दिली. पकडण्यात आलेल्या सापाला जवळच्या जंगलात सोडण्यात आले असल्याचे आकाश गोहिल यांनी सांगितले





























