Homeशहरसतनामसिंग लबाना हत्याकांड : मुख्य आरोपीची विठ्ठलवाडी पोलिसांकडून परिसरात धिंड; पोलिसांनी दाखवला...

सतनामसिंग लबाना हत्याकांड : मुख्य आरोपीची विठ्ठलवाडी पोलिसांकडून परिसरात धिंड; पोलिसांनी दाखवला कायद्याचा धाक

उल्हासनगर दि. ११ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगरातील कॅम्प क्रमांक ४ येथील कुर्ला कॅम्प चौक परिसरात झालेल्या सतनामसिंग लबाना यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी वेगवान कारवाई करत मुख्य आरोपी गुरप्रीतसिंग उर्फ अनिस करतारसिंग लबाना (वय १९) याला घटनेनंतर हिल्लाईन पोलिसांनी अवघ्या काही तासांत अटक केली होती . त्यानंतर परिसरात कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्याच्या उद्देशाने विठ्ठलवाडी पोलिसांनी आरोपीची कडक पोलीस बंदोबस्तात पायी धिंड काढली.

मिळालेल्या माहितीनुसार, पूर्ववैमनस्यातून सतनामसिंग लबाना यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच विठ्ठलवाडी पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हाती घेत आरोपीचा शोध सुरू केला. त्याच दरम्यान हिल्लाईन पोलिसांनी अनिस लबाना याचा शोध घेऊन त्याला त्वरित ताब्यात घेऊन विठ्ठलवाडी पोलिसांच्या स्वाधीन केले. आरोपी गुरप्रीतसिंग उर्फ अनिस करतारसिंग लबाना याच्या अटकेनंतर विठ्ठलवाडी पोलिसांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रहार गोडसे यांच्या नेतृत्वाखाली आरोपीची कॅम्प क्रमांक – ४ मधील सुभाष टेकडी, कानसाई रोड, कुर्ला कॅम्प चौक तसेच परिसरातील इतर महत्त्वाच्या भागांतून पायी धिंड काढली. या मार्गामध्ये हत्या घडलेले ठिकाण तसेच आरोपीच्या कथित गुन्हेगारी कारवायांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे सांगितल्या जाणाऱ्या भागांचाही समावेश होता. मोठ्या पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली.

या कारवाईमागील उद्देश गुन्हेगारांमध्ये कायद्याची भीती निर्माण करणे, समाजविघातक प्रवृत्तींना कठोर संदेश देणे आणि सर्वसामान्य नागरिकांचा पोलिसांवरील व कायद्यावरील विश्वास अधिक दृढ करणे हा असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान, पोलिसांच्या तातडीच्या आणि कठोर कारवाईचे स्थानिक नागरिकांनी स्वागत केले. या कारवाईमुळे परिसरातील दहशतीचे वातावरण कमी होण्यास मदत होईल तसेच गुन्हेगारांविरोधात पोलिसांची कठोर भूमिका स्पष्ट झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. सतनामसिंग लबाना हत्याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस अधिक तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

AFMC, पुणे, MUHS दीक्षांत समारंभात 34 सुवर्णपदके जिंकली | पुणे बातम्या

सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय पुणे : आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज (AFMC), पुणे यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या (MUHS) 2026 च्या दीक्षांत समारंभात तब्बल...

शान मसूदच्या हकालपट्टीवर रमीझ राजाने पीसीबीवर गौप्यस्फोट केला: ‘जेव्हा कर्णधाराला सातत्याने सामान्य खेळाडूंचा गट...

रमीझ राजा आणि शान मसूद पाकिस्तानचा माजी कर्णधार रमीझ राजाने आगामी वेस्ट इंडिज आणि इंग्लंड दौऱ्यांपूर्वी शान मसूदला कसोटी कर्णधारपदावरून हटवण्याच्या पाकिस्तान क्रिकेट...

110 कोटी रुपयांच्या महाजेनको भूसंपादनातील गैरव्यवहारांची चौकशी करण्याचे आदेश पीएमओने महाराष्ट्र सरकारला दिले आहेत.

पंतप्रधान कार्यालयाने महाराष्ट्र सरकारला महाजेनकोच्या भूसंपादन पद्धतीची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत मुंबई: छत्तीसगडमधील गारे पाल्मा सेक्टर-II कोळसा ब्लॉकसाठी महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन...

बेकायदेशीरपणे जमीन फेरफार केल्याप्रकरणी पुण्यातील 15 महसूल अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे

राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील आणि काहींना सेवेतून बडतर्फ केले जाईल. पुणे : राज्याचे...

हर्ष गोयंका : जपानने फळांच्या पेटीत शेतकऱ्यांचे फोटो लावले; भारताने यातून शिकले पाहिजे, असे...

पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही सफरचंद किंवा स्ट्रॉबेरीचा बॉक्स उचलता, तेव्हा त्या शेतकऱ्याचा हसरा चेहरा पाहण्याची कल्पना करा ज्याने त्यांना वाढवले ​​होते. हे...

error: Content is protected !!