उल्हासनगर दि. १७ ( प्रमोद दळवी ) : शिवसेना शहरप्रमुख तथा ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्रसिंह भुल्लर (महाराज) यांच्या वाढदिवसानिमित्त भुल्लर परिवाराच्या वतीने भव्य अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार, १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता सी. ब्लॉक रोड, भुल्लर पॅलेस, उल्हासनगर–१ येथे हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
राजेंद्रसिंह भुल्लर (महाराज) यांनी आपल्या सामाजिक, राजकीय तसेच सार्वजनिक जीवनात सातत्याने नागरिकांशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केले आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या सुख-दुःखात सहभागी होत त्यांनी जनसेवेचा वसा जपला आहे. त्यांच्या कार्याला मिळणारी जनतेची साथ, कार्यकर्त्यांचे प्रेम आणि मित्रपरिवाराचा स्नेह यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या अभिष्टचिंतन सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. उल्हासनगर शहराच्या सामाजिक व सार्वजनिक जीवनात राजेंद्रसिंह भुल्लर (महाराज) यांचा मोठा जनसंपर्क असून, विविध स्तरातील नागरिक, शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते, हितचिंतक तसेच मित्रपरिवार यांच्याशी त्यांचे आत्मीयतेचे संबंध आहेत. त्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या सोहळ्यात मोठ्या संख्येने नागरिक व शुभेच्छुक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.
“आपल्या सर्वांची उपस्थिती आणि प्रेमळ शुभेच्छा हाच आमच्यासाठी सर्वात मोठा आनंद आहे,” अशी भावना भुल्लर परिवाराने व्यक्त केली आहे. आपल्या स्नेहपूर्ण उपस्थितीने हा अभिष्टचिंतन सोहळा अधिक उत्साहपूर्ण आणि अविस्मरणीय होईल, असेही परिवाराच्या वतीने सांगण्यात आले. या आनंदाच्या प्रसंगी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक, मित्रपरिवार तसेच नागरिकांनी सहकुटुंब उपस्थित राहून राजेंद्रसिंह भुल्लर (महाराज) यांना मनःपूर्वक शुभेच्छा द्यावेत, असे आवाहन भुल्लर परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.





























