Homeताज्या बातम्याखरगे यांच्या सभास्थळाच्या ‘शुद्धीकरणा’चा उल्हासनगर काँग्रेसकडून तीव्र निषेध; आंबेडकर चौकात निषेध मोर्चा...

खरगे यांच्या सभास्थळाच्या ‘शुद्धीकरणा’चा उल्हासनगर काँग्रेसकडून तीव्र निषेध; आंबेडकर चौकात निषेध मोर्चा व सत्याग्रह

उल्हासनगर दि. १७ ( प्रमोद दळवी )  : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उत्तराखंडमधील हल्द्वानी येथे झालेल्या सभेनंतर काही उजव्या विचारसरणीच्या संघटनांकडून सभास्थळाचे ‘गंगाजलाने शुद्धीकरण’ करण्यात आल्याच्या घटनेचा उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने तीव्र निषेध केला. खरगे यांच्या उपस्थितीमुळे सभास्थळ अपवित्र झाले, या मानसिकतेतून करण्यात आलेले हे कृत्य अत्यंत निंदनीय असून, हा प्रकार केवळ एका राष्ट्रीय नेत्याचा अपमान नसून भारतीय संविधानाने दिलेल्या समता, बंधुता आणि मानवी प्रतिष्ठेच्या मूल्यांवर झालेला आघात आहे, अशी भूमिका काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटी तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्देशानुसार या घटनेचा निषेध करण्यासाठी उल्हासनगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शांततापूर्ण निषेध मोर्चा व सत्याग्रह आंदोलन आयोजित करण्यात आले होते. उल्हासनगर-४ येथील आंबेडकर चौक, सुभाष टेकडी परिसरात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जातीयवाद व मनुवादी विचारसरणीविरोधात जोरदार घोषणा देत संबंधित घटनेचा निषेध केला. तसेच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करून सामाजिक समता आणि संविधानिक मूल्यांचा संदेश देण्यात आला.

आंदोलनादरम्यान उपस्थित काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, भारताचे संविधान प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार देते. कोणत्याही व्यक्तीच्या जात, धर्म किंवा सामाजिक पार्श्वभूमीवरून एखाद्या ठिकाणाचे ‘शुद्धीकरण’ करण्याची मानसिकता ही सामाजिक सलोखा आणि संविधानिक मूल्यांना बाधक आहे. अशा भेदभावपूर्ण प्रवृत्तींना लोकशाही भारतात स्थान नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या निषेध आंदोलनाला उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रोहित साळवे, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते किशोर धडके, महादेव शेलार, विरोधी पक्षनेत्या अंजली साळवे, ब्लॉक अध्यक्ष विशाल सोनवणे, पवन मिरणी, अनिल यादव, विकी आहुजा, जिल्हा उपाध्यक्ष राजेश फक्के, मालती गवई, कालिंदी गवई, विजय गाडे, अन्सार शेख, आबा साठे, राहुल कोजगे, आतिश जाधव, हनी मिरानी तसेच समाजसेवक रजनीकांत गायकवाड, दिगंबर हजारे, माला मोरे, लता पडघम यांच्यासह काँग्रेसच्या विविध आघाड्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उल्हासनगरमध्ये दिवसाढवळ्या नशेखोर टोळीचा धुडगूस; ३ कारसह मालवाहू रिक्षाची तोडफोड

उल्हासनगर दि. १७ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगर-३ मधील सेक्शन १७ येथील बाबा थरिया सिंगजी  दरबार जवळ असलेल्या उद्यान परिसरात सोमवारी सायंकाळी सुमारे...

लक्ष्मी म्युझिकल स्टुडिओमध्ये उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा; देशभक्तीपर गीतांतून हुतात्म्यांना मानवंदना

मुंबई दि. १७ : "भारतमातेचे ऋण फेडण्यासाठी प्रत्येक भारतीयाने जात-धर्म विसरून एकत्र येणे हीच काळाची गरज आहे," असा संदेश देत, भारतीय स्वातंत्र्याला ८० वर्षे...

बुक ऑफ लाइफ चर्चमध्ये रक्तदान शिबिर : चर्च सदस्यांचा उत्स्फूर्त सहभाग

नाशिक दि. १७ ( संदीप गायकवाड  )  : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून नाशिक येथील बुक ऑफ लाइफ चर्चच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. मानवसेवा...

पवित्र श्रावण मासातील पहिल्या श्रावणी सोमवारी महादेवाचे मनोभावे दर्शन

उल्हासनगर दि. १७ ( प्रमोद दळवी )  : पवित्र श्रावण मासातील पहिल्या श्रावणी सोमवारी अंबरनाथ येथील प्राचीन व ऐतिहासिक शिवमंदिरात भक्तिमय वातावरणात भगवान महादेवाची...

उल्हासनगरमध्ये साईनाथ सेवा समिती पालखी परिवारच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

उल्हासनगर दि. १५ ( प्रमोद दळवी )  : रक्तदान हेच श्रेष्ठ दान या सामाजिक भावनेतून साईनाथ सेवा समिती पालखी परिवार, उल्हासनगर-१ यांच्या वतीने भव्य...

error: Content is protected !!