Homeशहरविद्यार्थ्यांना वह्या वाटप करून आदिनाथ पालवे यांनी साजरा केला वाढदिवस

विद्यार्थ्यांना वह्या वाटप करून आदिनाथ पालवे यांनी साजरा केला वाढदिवस

उल्हासनगर दि. २१ ( प्रमोद दळवी )  : वाढदिवस हा समाजोपयोगी उपक्रमातून साजरा करण्याचा संदेश देत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख आदिनाथ पालवे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त उल्हासनगर येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यालयात विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांना हातभार लावण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आदिनाथ पालवे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले आणि मन लावून शिक्षण घेऊन उज्ज्वल भवितव्य घडविण्याचे आवाहन केले.या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष महादेवजी सोनवणे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख राजेंद्र शाहू, शहरप्रमुख शिवाजी जावळे, माजी महानगरप्रमुख राधाचरण करतीया, उपशहरप्रमुख दशरथ चौधरी, अशोक जाधव, शाखाप्रमुख तानाजी माळी, युवासेना वॉर्ड अध्यक्ष दामू मिरगुडे, समाजसेवक शिवाजी रगडे, पत्रकार रामेश्वर गवई यांच्यासह शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी आदिनाथ पालवे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या समाजाभिमुख उपक्रमाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अशा प्रकारचे उपक्रम प्रेरणादायी असून समाजातील इतरांनीही अशा सामाजिक कार्यातून वाढदिवस साजरा करण्याचा आदर्श घ्यावा, असे मत अनेकांनी व्यक्त केले.कार्यक्रमाचा समारोप विद्यार्थ्यांना वह्यांचे वितरण, मान्यवरांच्या शुभेच्छा आणि उपस्थितांच्या उत्स्फूर्त सहभागाने आनंददायी वातावरणात झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘मला माफ करा’: अर्जेंटिनाचे सहाय्यक प्रशिक्षक रॉबर्टो आयला यांनी फिफा विश्वचषक फायनलनंतर माफी का...

नवी दिल्ली: अर्जेंटिनाचे सहाय्यक प्रशिक्षक रॉबर्टो अयाला यांनी फिफा विश्वचषक 2026 फायनलनंतर स्पेनचा मिडफिल्डर डॅनी ओल्मोशी झालेल्या वादाबद्दल माफी मागितली आहे आणि...

DCP म्हणून तोतयागिरी करणाऱ्या आणि लोकांना फसवणाऱ्या कॉनमनशी संगनमत केल्याबद्दल PSIला अटक मुंबई बातम्या

मुंबई: एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची तोतयागिरी केल्याचा आणि अनेक पीडितांची अनेक वर्षांपासून फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या कथित आरोपी मोहम्मद खतीब उर्फ ​​डॉ....

युद्धनौका INS मालवणचा शिवाजी महाराजांच्या सागरी वारशाचा वाघनख मानाचा सन्मान | पुणे बातम्या

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेले प्रसिद्ध शस्त्र वाघनख आता बुधवारी कारवार येथील नौदल तळावर एअर चीफ मार्शल एपी सिंग यांनी नियुक्त...

उच्च कोलेस्टेरॉल नेहमीच शांत राहत नाही: 7 चेतावणी चिन्हे जे तुमचे डोळे, त्वचा आणि...

उच्च कोलेस्टेरॉलला "मूक रोग" असेही संबोधले जाते कारण समस्येची क्वचितच लक्षात येण्यासारखी चिन्हे असतात. अमेरिकन हार्ट असोसिएशन (एएचए) नुसार, एखाद्या व्यक्तीमध्ये कोलेस्ट्रॉलची उच्च पातळी...

राष्ट्रीय टेनिस महासंघाच्या EGM च्या आधी AITA ट्रस्ट लक्ष केंद्रित करते | पुणे बातम्या

पुणे: ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (एआयटीए) एआयटीए ट्रस्टच्या "अपराधी" ऐवजी "बळी" असल्याचा दावा करून, हंगामी अध्यक्ष चिंतन पारीख म्हणाले की, फेडरेशन सप्टेंबरमध्ये...

error: Content is protected !!