Homeशहरविठ्ठलवाडी रेल्वे ट्रॅकजवळ गांजा विक्री करणाऱ्यावर पोलिसांची झडप; ५३० ग्रॅम गांजा जप्त

विठ्ठलवाडी रेल्वे ट्रॅकजवळ गांजा विक्री करणाऱ्यावर पोलिसांची झडप; ५३० ग्रॅम गांजा जप्त

उल्हासनगर दि. १६ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगर शहरातील कॅम्प क्रमांक-३ परिसरातील विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकाजवळील गोपाळ समाज परिसरात रेल्वे ट्रॅकच्या कडेला एक इसम गांजाची विक्री करत असल्याची गुप्त माहिती मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी गुरुवारी सापळा रचून छापा टाकत मोठी कारवाई केली.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी इम्तियाज उर्फ पप्प्या युसुफलाला (वय ४०) याला गांजाची विक्री करताना रंगेहात पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून ५३० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या गांजाची अंदाजे किंमत सुमारे ९ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात आरोपी इम्तियाज उर्फ पप्प्या युसुफलाला याच्याविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक (एनडीपीएस) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही कारवाई पोलीस उपआयुक्त सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली, मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी आणि पोलीस निरीक्षक शितल बामणे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाने केली. या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक शेवाळे, पोलीस हवालदार अनिल पाटील, प्रमोद जाधव, चंदू शिंदे, हांडे, देशमुख तसेच निलेश नांगरे यांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली. शहरात अमली पदार्थांच्या विक्रीविरोधात पोलिसांकडून सातत्याने विशेष मोहीम राबविण्यात येत असून अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टरचा आत्महत्या, 14 जणांवर गुन्हा | पुणे बातम्या

पुणे : गुलटेकडी, मार्केट यार्ड येथे गुरुवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास एक 65 वर्षीय इमारत कंत्राटदार घरातील पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.स्वारगेट...

यूएस मधील 5 कमी प्रसिद्ध राष्ट्रीय उद्याने जी आश्चर्यकारकपणे रिकामी आणि शांत आहेत

नॉर्थ कॅस्केड्स नॅशनल पार्क हे अमेरिकन आल्प्स म्हणूनही ओळखले जाते. 300 पेक्षा जास्त हिमनद्या असूनही हे यूएस मधील सर्वात कमी भेट दिलेल्या राष्ट्रीय उद्यानांपैकी...

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या कल्याण जिल्हा कक्ष प्रमुखपदी सौ. मीना (ताई) सोंडे यांची नियुक्ती

उल्हासनगर दि १६ ( प्रमोद दळवी )  : वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या कल्याण जिल्हा (उल्हासनगर व अंबरनाथ) कक्ष प्रमुखपदी सौ. मीना...

शाळा सुरू झाल्यानंतर महिन्याभरात शिक्षण पुरवठ्यासाठी दिलेला निधी | पुणे बातम्या

विद्यार्थ्यांना त्यांचे शैक्षणिक साहित्य वेळेवर मिळावे यासाठी नागरी संस्था प्रयत्न करत आहे पुणे : पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर महिनाभरानंतर शैक्षणिक...

विराट कोहलीने मोडला रिकी पाँटिंगचा विक्रम, सर्वकालीन टॉप-फाइव्ह एलिट यादीत प्रवेश | क्रिकेट बातम्या

भारताचा विराट कोहली (ANI फोटो) विराट कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याच्या चमकदार कारकिर्दीत आणखी एक मैलाचा दगड जोडला आणि ऑस्ट्रेलियन महान रिकी...

error: Content is protected !!