उल्हासनगर दि २८ ( प्रमोद दळवी ) : आपल्या वाहनावर प्रलंबित इ-चलन दंड तडजोडीने व त्वरित निकाली काढण्याची नागरिकांना लोकअदालत मध्ये संधी देण्यात आली आहे.
या लोक अदालत बाबत विठ्ठलवाडी वाहतूक उपविभाग तर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की दिनांक ०९/०५/२०२६ रोजी उल्हासनगर कोर्ट या ठिकाणी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या लोकअदालत मध्ये आपल्या वाहनावर प्रलंबित इ-चलन दंड तडजोडीने व त्वरित निकाली काढण्याची संधी उपलब्ध झाली आहे. तरी सर्व नागरिकांना आव्हान करण्यात येते की, ज्यांचे वाहतूक नियमभंगा संदर्भातील वाहनावर इ चलन दंड प्रलंबित आहेत त्यांनी सदरचे दंड कमी करण्यासाठी वाहतूक उपविभाग विठ्ठलवाडी, उल्हासनगर -४ कार्यालयात उपस्थित राहून सदरचे खटले दाखल करून दंड भरायचा आहे. सदर बाबत खटले विठ्ठलवाडी वाहतूक उपविभाग येथे दिनांक १५/०४/२०२६ ते दिनांक ०५/०५/२०२६ रोजी सकाळी १०.०० वा ते १९.०० वा पर्यंत स्वीकारले जातील. याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी. असे आव्हान विठ्ठलवाडी वाहतूक उपविभाग यांच्या वतीने करण्यात आले आहे





























