Homeशहरलोकमान्य गुरुकुल इतर शाळांसाठी आयडॉल- अनिल बोरनारे

लोकमान्य गुरुकुल इतर शाळांसाठी आयडॉल- अनिल बोरनारे

डोंबिवलीतील बारा तासांच्या शाळेचे अनिल बोरनारे यांच्याकडून कौतुक

डोंबिवली दि.२७ : चार भिंतीच्या वर्गाखोल्यांच्यापलीकडे पंचकोशाधारित शिक्षण देत लोकमान्य गुरुकुल शाळा इतर शाळांसाठी आयडॉल ठरली असून पालकांनी योग्य शाळेची निवड केली  असल्याचे मत मुंबई मराठी अध्यापक संघांचे अध्यक्ष प्राचार्य अनिल बोरनारे यांनी केले

डोंबिवलीतील टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकमान्य गुरुकुल शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन सावित्रीबाई फुले नाट्यगृहात संपन्न झाले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोरनारे बोलत होते यावेळी टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्यवाह नितेश्री काबाडी, सहकार्यवाह रूपाली साखरे कोषाध्यक्ष राजेंद्र कामतेकर संस्था सदस्य महेश नाईक शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना पावडे उपस्थित होते. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास हे नविन राष्ट्रीय शिक्षण धोरणाचे उदिष्ट असून त्यासाठी राष्ट्रीय शिक्षण धोरणात अनेक उपक्रम सुचविले आहे मात्र लोकमान्य गुरुकुल शाळा दहा वर्षांपासूनच विद्यार्थ्यांना पूरक उपक्रम राबवित असल्याने या शाळेतून संस्कारक्षम विद्यार्थी घडत असल्याचे बोरनारे म्हणाले.

शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना पावडे यांनी आपल्या प्रास्ताविकेतून शाळेविषयी सांगतांना २०१६ रोजी पंचकोशाधारित लोकमान्य गुरुकुलाची स्थापना झाली असून १२ तासांची मराठी माध्यमाची, सेमी इंग्लिश आणि उपक्रमांवर आधारित शाळा आहे योगासने परिपाठ : ओंकार ध्यान श्लोक, गीता पठण, प्रेरणादायी गीत, मराठी, इंग्रजी वृत्तपत्रांचे वाचन, तज्ज्ञांनी ऋतुमानानुसार ठरवून दिलेला आहार, इंग्रजी आणि संस्कृत संभाषण वर्ग, विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेत वाढ व्हावी, वाचनाची गोडी निर्माण व्हावी म्हणून अवांतर वाचनासाठी स्वतंत्र तासिका, अध्ययना बरोबरच शिक्षकांच्या उपस्थितीत स्वयं अध्ययन, वर्कशीट सोडवण्यासाठी राखीव तासिका, कथक, गायन, किबोर्ड, तबला, बासरी या वादनांचा समावेश, सुसज्ज प्रयोगशाळा, आणि संगणक कक्ष, प्रत्येक वर्गात ई लर्निंग ची सुविधा, मल्लखांब, रोप मल्लखांब, आट्यापाट्या, फुटबॉल, क्रिकेट याचे प्रशिक्षण, प्रत्येक महिन्याला क्षेत्रभेटीचे आयोजन.मातृभूमी परिचय शिबिर आणि कौशल्य विकसन शिबिराचे आयोजन केले जात असल्याचे सांगितले

“महाराष्ट्राच्या सांस्कृतिक सण आणि परंपरेचे दर्शन”  या विषयावर आधारित सादर केलेल्या कार्यक्रमात चैत्र महिन्यापासून सुरू होणारे सर्व सण उत्सव दाखवण्यात आले. गुढीपाडवा, वारी, दिवाळी, रक्षाबंधन, गणपती, कोळीगीत, बाल्याडान्स अशा विविध मराठी पारंपरिक सणांचे सादरीकरण नृत्य व संगीताच्या माध्यमातून करण्यात आले. तसेच वंशी वादन, योगासने, मल्लखांब, तसेच मराठी, संस्कृत व इंग्रजी भाषांतील लघुनाट्यांचे सादरीकरण कार्यक्रमाचे आकर्षण ठरले. विशेष म्हणजे या सर्व लघुनाटिका शाळेतील शिक्षकांनीच लिहिल्या होत्या. विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकवर्गानेही कार्यक्रमात सहभाग नोंदवून उत्साही वातावरण निर्माण केले. शैक्षणिक, सांस्कृतिक व कलेतील (संगीत, नृत्य, वाद्य) प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना अनिल बोरनारे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. याशिवाय आदर्श विद्यार्थी तसेच १००% उपस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांनाही सन्मानित करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आयर्लंड आणि इंग्लंड टी-20 साठी भारतीय संघात नितीश कुमार रेड्डीऐवजी सूर्यांश शेडगे

नितीश कुमार रेड्डी आणि सूर्यांश शेडगे (एएनआय फोटो) नवी दिल्ली: आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या आगामी T20I मालिकेसाठी BCCI ने नितीश कुमार रेड्डीच्या जागी सूर्यांश...

सोबो डॉक्टरने तिच्याविरुद्ध वॉरंट बजावण्यासाठी दिल्ली पोलिसांवर प्रभाव टाकण्यासाठी पैसे दिले

मुंबई: दक्षिण मुंबईतील एका महिला डॉक्टरने वरिष्ठ सरकारी अधिकारी म्हणून भासवण्यासाठी आणि चेक बाऊन्स प्रकरणात पोलिसांच्या कारवाईवर प्रभाव पाडण्यासाठी एका तोतयागिरी करणाऱ्या...

‘तो एक अनुभवी ट्रेकर होता’: केतन अग्रवालच्या कुटुंबीयांनी पाहिलं पुणे पोलिसांची लोहगड किल्ल्यावर काय...

केतन अग्रवाल (एल) आणि त्यांची मंगेतर, सिया गोयल (आर); सीसीटीव्ही फुटेजमध्ये केतनचे ट्रेकिंगचे शेवटचे क्षण टिपले आहेत पुणे: 18 जून रोजी लोहगड किल्ल्यावर...

समय रैना: नेटफ्लिक्सकडून ₹15-20 कोटी? समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ कमाईवरील व्हायरल पोस्टने इंटरनेट...

समय रैना पुन्हा चर्चेत आला आहे, परंतु यावेळी, तो विनोद, वादग्रस्त क्लिप किंवा व्हायरल स्पर्धकामुळे नाही.त्याऐवजी, इंटरनेट एक गोष्ट शोधण्यात व्यस्त आहे:...

संपूर्ण महाराष्ट्रात नागरी मालमत्तेचे नकाशे पुन्हा रेखाटण्यासाठी ड्रोन सर्वेक्षण; 1.4 लाख उत्परिवर्तन अर्ज ऑनलाइन...

राज्य सरकारने शहरी मालमत्तेचे नकाशा तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ड्रोन-आधारित सर्वेक्षण सुरू केले आहे आणि सुमारे एक कोटी रेकॉर्डसाठी उत्परिवर्तन प्रक्रियेचे डिजिटायझेशन करत...

error: Content is protected !!