उल्हासनगर दि. २७ ( प्रमोद दळवी ): टीईटीचा पेपर फुटल्याने तो रद्द झाला असून ही टी ई टी राज्यात नकोच असल्याची भूमिका शिक्षक महासंघ मुंबई व कोकण विभाग अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी मांडली आहे.
दैनंदिन अध्यापनाचा व टीईटी परीक्षेचा दुरान्वेही संबंध नसल्याने ही टीईटी परीक्षा रद्द करण्याची भूमिका अनिल बोरनारे राज्याचे मुख्यमंत्री व शिक्षण मंत्री यांच्याकडे मांडणार आहेत. आधीच दैनंदिन अध्यापनाबरोबरच बीएलओची कामे शिक्षकांच्या माथी मारल्याने या शैक्षणिक कामांमुळे शिक्षक त्रस्त झाले असून शिक्षकांना कोणी वालीच राहिला नाही नसल्याचेही बोरनारे यांनी सांगितले. सध्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात टीईटी तसेच बीएलओच्या कामांबाबत राज्यातील सर्व विधानसभेचे आमदार व विधान परिषद सदस्यांकडे शिक्षक महासंघाच्या माध्यमातून निवेदन देणार असल्याचेही अनिल बोरनारे यांनी सांगितले





























