- बीएसएनएलची – राष्ट्रनिर्मिती आणि डिजिटल सक्षमीकरणाची २५ वर्षे (०१.१० .२००० ते ३० .०९ .२०२५ )
- मार्च २०२६ पर्यंत कल्याण डोंबिवली परिसरामध्ये १८९ बीएसएनएलचे नवीन टॉवर उभारण्यात येणार
कल्याण दि.३० ( प्रमोद दळवी ) : भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) भारत सरकारचा उपक्रम, आपला २५ वा वर्धापनदिन (रौप्य महोत्सव )साजरा करत आहे. १ ऑक्टोबर २००० रोजी स्थापित झालेल्या बीएसएनएलने खेड्यापासून ते डिजिटल इंडियाच्या मिशनपर्यंत राष्ट्राच्या प्रगतीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. हा रौप्य महोत्सव सेवा, विश्वास आणि दृढनिश्चयाचा उत्सव आहे. (बीएसएनएल) १ ऑक्टोबर २०२५ रोजी देशाला समर्पित दूरसंचार सेवा देत दूरसंचार क्षेत्रातील २५ वा गौरवशाली वर्षे पूर्ण करत आहे, त्यांच्या रौप्य महोत्सवी सोहळ्यानिमित्त. या अभिमानास्पद प्रसंगी बीएसएनएलच्या कामगिरी, टप्पे, भविष्यातील दृष्टीकोन आणि बीएसएनएलच्या भविष्यातील प्रकल्पांची माहिती देण्यासाठी मंगळवारी कॉन्फरन्स हॉल, दुसरा मजला, पीजीएमटी कार्यालय, कला तलाव टेलि. एक्सचेंज, कल्याण पश्चिम येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.
पत्रकार परिषदेमध्ये कल्याणचे पीजीएमटी ( प्रिन्सिपल जनरल मॅनेजर) महेश कुमार, तसेच जनरल मॅनेजर सोळंकी यांनी उपस्थित असलेल्या सर्व पत्रकार बांधवांना मार्गदर्शन केले. या पत्रकार परिषदेला डीजीएम शेटके, जाटव , पी आर पटेल उपस्थित होते. तसेच मंडळ अभियंता वि. डी. पाटील , नितीन कापडणीस , डी एन पटेल ,ठाकूर ,आर एल गुप्ता व कल्याण बीएसएनएलचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

बीएसएनएलचे पीजीएमटी महेश कुमार यांनी प्रामुख्याने असे सांगितले की येणाऱ्या मार्च २०२६ पर्यंत कल्याण डोंबिवली परिसरामध्ये १८९ बीएसएनएलचे नवीन टॉवर उभारण्यात येणार आहे. जेणेकरून एमटीएनएल एरिया जो कल्याण मध्ये आहे, जिथे मोबाईलचे नेटवर्क आताच्या घडीला बिलकुल मिळत नाही, अशा ठिकाणी १८९ टावर लागतील व या परिसरातलं मोबाईलचे नेटवर्क 4जी आणि 5जी ने अत्यंत चांगल्या पद्धतीने लोकांना मिळेल. अत्यंत कमी दरामध्ये जिओ एअरटेलच्या तुलनेमध्ये फक्त निम्म्यादरामध्ये 4G ची सेवा बीएसएनएल उपलब्ध करून देणार आहे त्यामुळे सामान्य नागरिकाला दिलासा मिळेल असे पीजीएमटी महेश कुमार यांनी सांगितले.
महेश कुमार यांनी आणखी एक महत्त्वाची माहिती सांगितली की २७ तारखेला माननीय प्रधानमंत्री मोदी यांनी जे ९७५०० 4जी मोबाईल टावरचं उद्घाटन केलं त्याच्यामध्ये देशभर सर्व अतिदुर्गम भागामध्ये आपण मोबाईलचं 4G च जाळ उभारलेला आहे. अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये अत्यंत दुर्गम भागामध्ये जिथे कोणताही जिओ, एअरटेल, वोडाफोन असा मोबाईलचा ऑपरेटर पोहोचलेला नाही अशा ठिकाणी आपण एक सामाजिक बांधिलकी म्हणून एक देशाचे देण म्हणून आपण हे सर्व जाळ उभारलेला आहे. सरकारने यासाठी बीएसएनएलला मदत पण केलेली आहे. बीएसएनएल नेहमीच सामान्य नागरिकांसाठी गोरगरीब जनतेसाठी कमी दरात उत्तम सेवा कशी पुरवली जाईल, पुरवण्यात येईल, जेव्हा पूर परिस्थिती असते कुठे आतंकवादी हल्ला होतो, भूकंप होतो, अशा ठिकाणी बीएसएनएल नेहमी अग्रेसर असत सेवा पुरवण्यासाठी. त्यावेळी नफा तोटा खाजगी कंपन्यांसारखा असं बघितला जात नाही बीएसएनएल नेहमीच एक पाऊल पुढे असतो मदतीसाठी. पत्रकारांनी पण सरकारी कंपनी असलेल्या बीएसएनएलला जास्तीत जास्त प्रसिद्धी देऊन आपल्या माध्यमांमध्ये प्रसिद्धी देऊन सहकार्य करावे देशाला आणि सरकारला मदत करावी असे आवाहन महेश कुमार यांनी केले.
१ ऑक्टोबर २००० रोजी बीएसएनएल स्थापन झालं होतं. आज १ ऑक्टोबर २०२५ आहे. या रौप्य महोत्सवी निमित्ताने सकाळपासून बीएसएनएलचे सर्व वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी यांचा दिवसभर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला आहे. सकाळी १० वाजता दीप प्रज्वलन, सरस्वती पूजनाच्या कार्यक्रमाने सुरुवात होईल. त्यानंतर बीएसएनएलला 25 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल केक कापण्यात येणार आहे. बीएसएनएलचे जे चॅनल पार्टनर्स आहेत. टीआयपी आहेत जे चांगलं परफॉर्मन्स करत आहेत त्यांचा सत्कार तसेच जे बीएसएनएलचे मोठे ग्राहक आहेत जे मोठ्या प्रमाणात रेवेन्यू देतात त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे आणि त्यानंतर एक भव्य रॅली बीएसएनएलच्या प्रचारासाठी कल्याण वेस्ट परिसरा मध्ये, खडकपाडा परिसरामध्ये काढण्यात येणार आहे. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले आहे.
बीएसएनएलचे २५ वर्षांतील प्रमुख यश
२००० : बीएसएनएलची स्थापना, देशाच्या विशाल दूरसंचार नेटवर्कचा वारसा स्वीकारला.
२००२ : जीएसएम मोबाइल सेवांचा विस्तार, कोट्यवधी लोकांना परवडणारी मोबाइल सुविधा.
२००५ : ब्रॉडबँड सेवांची सुरुवात, सामान्य नागरिकांना इंटरनेट उपलब्ध.
२०१० : ग्रामीण भागात टॉवर्सचा विस्तार, दुर्गम क्षेत्रांपर्यंत कव्हरेज.
२०१५ : भारतनेट प्रकल्पात योगदान, ग्रामपंचायतींना ऑप्टिकल फायबरने जोडले.
२०१७ : एंटरप्राइज सेवांचा विस्तार लीज्ड लाइन, एमपीएलएस, क्लाउड सोल्युशन्स.
२०२० : कोविड-19 दरम्यान रुग्णालये, प्रशासन आणि नागरिकांना अखंडित सेवा.
२०२२ : भारत फायबर विस्तार, शहरी आणि ग्रामीण भागात हाय-स्पीड ब्रॉडबॅड.
२०२५ : माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी सी-डॉट, तेजस आणि टीसीएसद्वारे विकसित स्वदेशी 4जी/5जी सेवांचा शुभारंभकेला.
बीएसएनएल – राष्ट्रीय भावनेचे प्रतीक
राजस्थानच्या वाळवंटापासून लडाखच्या बर्फाच्छादित शिखरांपर्यंत आणि अंदमान-निकोबार बेटांपर्यंत, बीएसएनएलने कनेक्टिव्हिटीला प्रत्येक भारतीयाचा हक्क बनवले आहे. आर्थिक आव्हानांनंतरही ग्रामीण आणि नफा न देणाऱ्या क्षेत्रांत सेवा पुरवून बीएसएनएलने राष्ट्रसेवेची बांधिलकी सिद्ध केली आहे. ही केवळ एक टेलिकॉम कंपनी नसून विश्वास आणि कुटुंबाचे नाव आहे.
संकटकाळात बीएसएनएलची भूमिका
भूकंप, चक्रीवादळ, पूर यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमध्ये नेटवर्क जलद पुनर्स्थापित.
कोविड-19 दरम्यान रुग्णालये आणि प्रशासनाला जोडले.
लेह-लडाख, नक्षलग्रस्त क्षेत्रे आणि दुर्गम बेटांवर कनेक्टिव्हिटी सुनिश्चित.
उपग्रह मोबाइल सेवेद्वारे आपत्ती व्यवस्थापन आणि राष्ट्रीय सुरक्षेत योगदान.
डिजिटल इंडियामधील बीएसएनएलच्या सेवा
भारत फायबर (FTTH): 44 लाखांहून अधिक कनेक्शन्स, घरे आणि व्यवसायांना हाय-स्पीड ब्रॉडबँड.
भारतनेटः ग्रामपंचायतींना ऑप्टिकल फायबरद्वारे डिजिटल समावेशन.
मोबाइल सेवा: ९ कोटींहून अधिक ग्राहक, विश्वासार्ह कनेक्टिव्हिटी.
एंटरप्राइज सेवाः लीज्ड लाइन, एमपीएलएस, व्हीपीएन, क्लाउड आणि IoT सोल्युशन्स.
उपग्रह सेवाः संरक्षण, आपत्तीग्रस्त क्षेत्रे आणि दुर्गम समुदायांसाठी सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी.
आत्मनिर्भर भारताचा अग्रदूत
बीएसएनएल आत्मनिर्भर भारत मिशनमध्ये अग्रणी आहे. २७ सप्टेंबर २०२५ रोजी माननीय पंतप्रधानांनी सी-डॉट, तेजस आणि टीसीएसद्वारे विकसित स्वदेशी 4जी/5जी सेवांचा उद्घाटन केला. ही तंत्रज्ञान परदेशी अवलंबित्व कमी करेल आणि राष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक विकास आणि डिजिटल स्वातंत्र्याला बळ देईल.
विकसित भारत २०४७ ची दिशा
२०४७ पर्यंत विकसित भारताच्या लक्ष्यासाठी बीएसएनएल कटिबद्ध आहे. प्रत्येक नागरिकाला परवडणाऱ्या, सुरक्षित आणि उच्च दर्जाच्या डिजिटल सेवा.
ग्रामीण टॉवर्स आणि भारत फायबरचा विस्तार.
स्वदेशी 5जी, 6जी संशोधन आणि सायबर सुरक्षेवर लक्ष.
बीएसएनएल शेतकरी, विद्यार्थी आणि डिजिटल बँकिंगपर्यंत सर्वांना जोडून समावेशी विकास सुनिश्चित करत आहे.
रौप्य महोत्सव संकल्प
बीएसएनएल पुन्हा आपला संकल्प व्यक्त करतोः
राष्ट्राची जीवनरेषा बनणे.
आत्मनिर्भर भारताची कणा बनणे.
२०४७ पर्यंत विकसित भारताच्या निर्मितीत पूर्ण योगदान देणे.
“बीएसएनएल – २५ वर्षांची सेवा, विश्वास आणि कनेक्टिव्हिटी… विकसित भारताचा प्रवास सुरू.”





























