Homeशहरनाशिक येथील मरळगोई शिवारात बिबट्याचा सुळसुळाट : शेतकऱ्याच्या गाईला खाल्ले , नागरिकांमध्ये...

नाशिक येथील मरळगोई शिवारात बिबट्याचा सुळसुळाट : शेतकऱ्याच्या गाईला खाल्ले , नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

नाशिक दि.१ ( प्रमोद दळवी ) : नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यामधील मुक्काम पोस्ट गोंदेगाव परिसरातील मरळगोई या ठिकाणी शेतकरी सिद्धोधन बनसोडे हे आपल्या कुटुंबासह राहतात. त्याच ठिकाणी थोड्या अंतरावर त्यांची शेतजमीन आहे. त्या शेतातील गोठ्याबाहेर ते आपल्या गाईला बांधत असतात. काल रात्री नेहमीप्रमाणे ते गायला बांधून आपल्या घरी गेले. पहाटे साधारण पाचच्या सुमारास बिबट्याने त्यांच्या शेतात प्रवेश करून गाईवर हल्ला करून तिला ठार मारले. त्यानंतर त्यांनी तिला अर्ध फस्त केलं सकाळी बनसोडे हे आपल्या शेतात गेले असता त्यांना अर्धवट खाल्लेला गायचा मृतदेह दिसला. या घटनेमुळे बनसोडे कुटुंबांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आपल्या शेतातील गाय बिबट्याने खाल्ल्याने त्यांचे जवळपास ४०  हजार रुपयांच्या नुकसान झाले आहे.

सरकारी डॉक्टरांनी त्या गाईचा पंचनामा केला असून आपल्याला शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी बनसोडे कुटुंबीयांनी केली आहे. त्या परिसरातील शिवारात बिबट्याचा वावर होत असल्याने शेतकरी वर्गांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने त्वरित या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी बनसोडे व इतर शेतकऱ्यांनी केली आहे. त्या परिसरात हा बिबट्या फिरत असल्याने शेतकऱ्यांना घाबरतच आपल्या शेतात जावे लागत आहे. जर वेळेच्या बिबट्याचा बंदोबस्त केला नाही तर तो बिबट्या परिसरातील नागरिकांवर ही हल्ला करू शकतो. या घटनेमुळे मरळगोई परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विरोधकांना आणि शेतकऱ्यांना आता शेती कर्जमाफी हवी आहे, मुख्यमंत्र्यांच्या चर्चेला डोळेझाक म्हणा

आमदार अंबादास दानवे आणि इतर शिवसेनेचे (UBT) पदाधिकारी कांद्याच्या भाववाढीच्या निषेधार्थ शेतकऱ्यांमध्ये सामील झाले. पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३० जूनपूर्वी शेतकऱ्यांची...

कोल्ड्रिंक, चहा ,कॉफी व पेढ्यांमध्ये गुंगीच्या औषध मिसळून लुटमारी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांवर विठ्ठलवाडी...

उल्हासनगर दि.१९ ( प्रमोद दळवी ) : कोल्ड्रिंक, चहा, कॉफी व पेढ्यामध्ये गुंगीचे औषध मिसळून नागरिकांना बेशुद्ध करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन व रोख...

ऋषभ पंतने कसोटी उपकर्णधारपद गमावले, प्रिन्स यादवला ODI कॉल-अप – अफगाणिस्तान मालिकेसाठी भारताच्या संघाच्या...

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मंगळवारी भारतामध्ये जून महिन्यात खेळल्या जाणाऱ्या अफगाणिस्तान विरुद्ध एकदिवसीय कसोटी आणि तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी...

नागरिक चळवळीने 300 आठवड्यांत महाराष्ट्रातील खारफुटीतून 1,200 टन कचरा साफ केला

कोविड-19 लॉकडाऊन दरम्यान तीन नागरिकांपासून जे सुरू झाले ते महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या समुदायाच्या नेतृत्वाखालील पर्यावरण चळवळीत बहरले आहे. मॅन्ग्रोव्ह क्लीनअप ड्राइव्हने अलीकडेच सलग...

कोरेगाव पार्क येथे वकिलाने कारमध्ये विनयभंग केल्याची तक्रार केल्यानंतर चार जणांना अटक

पुणे : एका वकिलाने सोमवारी सकाळी पोलिसात तक्रार दाखल केली की, रविवारी रात्री 11.30 च्या सुमारास कोरेगाव पार्कमध्ये एका कारमध्ये त्यांच्या दोन...

error: Content is protected !!