Homeशहरडोंबिवलीतील हिंदू नववर्ष स्वागतयात्रा : यंदाची स्वागत यात्रा यात्रा ‘वंदे मातरम्’ चे...

डोंबिवलीतील हिंदू नववर्ष स्वागतयात्रा : यंदाची स्वागत यात्रा यात्रा ‘वंदे मातरम्’ चे १५० वे वर्ष या संकल्पनेवर आधारित

डोंबिवली, दि. ५ : गुढीपाडव्यानिमित्त संपूर्ण भारतात निघणाऱ्या स्वागतयात्रांची सुरुवात करून देणारं शहर, अशी ओळख असलेल्या सांस्कृतिक उपराजधानी डोंबिवलीतील हिंदू नववर्ष स्वागत यात्रा यंदा वंदे मातरम चे १५० वे वर्ष या विशेष संकल्पनेवर आधारित असणार आहे.

श्री गणेश मंदिर संस्थान डोंबिवली  आयोजित पत्रकार परिषदेत या नववर्ष स्वागत यात्रेबाबत माहिती देण्यात आली. गुढीपाडव्याच्या निमित्ताने दरवर्षी मोठ्या उत्साहात साजऱ्या होणाऱ्या या हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचे यंदा २८ वे वर्ष आहे.श्री गणेश मंदिराच्या पुढाकारातून साजरा होणारा हा गावकीचा उत्सव  मोठ्या उत्साहात पार पडतो. विशेष म्हणजे यंदाच्या स्वागत यात्रेच्या संयोजन समितीत मोठ्या प्रमाणात तरुणांचा सहभाग  असून, नियोजनात तरुणांचा यात्रेतील सहभाग वाढवण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. तसंच या निमित्ताने भारतीय नागरिक म्हणून  जे उद्या जबाबदारी खांद्यावर घेणार आहेत, अशा लहान मुलांच्या मनावर ही राष्ट्रीय संस्कार व्हावेत, कुटुंब प्रबोधन, समरसता, नागरी कर्तव्य, पर्यावरण याची जाणीव त्यांच्या मनात व्हावी, या दृष्टीने ही कार्यक्रमाची रचना केली आहे.

या अनुषंगानेच  शनिवारी ७ मार्च रोजी डोंबिवलीतील ३७ शाळांमधील सुमारे १८०० विद्यार्थी सामुदायिक देवदेशोपासना आणि ‘वंदे मातरम्’ गायनात सहभागी होणार आहेत. रविवारी १५ मार्च २०२६ रोजी अथर्वशीर्ष पठण, राष्ट्रभक्तीपर गीत गायन, वादन-नृत्य स्पर्धा, तरुणांसाठी  आकर्षण असणारी बाईक रॅली, मंगळवारी 17 मार्च रोजी सामुदायिक श्रीसूक्त पठण आणि दीपोत्सव असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. याशिवाय आकर्षक रांगोळी प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले आहे.छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनानिमित्त बुधवारी १८ मार्च २०२६ रोजी सायंकाळी भागशाळा मैदान येथे ‘शिवशंभू रणशौर्य अमृतगाथा’ या गीत-नृत्याविष्कारातून, छत्रपती संभाजी महाराजांना आदरांजली अर्पण करण्यात येणार आहे.

वक्फ विधेयकात महत्वाची भूमिका मांडणारे, आणि येणाऱ्या महाराष्ट्रातील कुंभमेळ्याच नियोजन आणि जबाबदारी असणारे नाशिक येथील महामंडलेश्वर महंत सुधीरदास महाराज हे युवा पिढीसोबत  यावेळी संवाद साधणार आहेत. या व्यतिरिक्त डोंबिवली मधील सामाजिक परिवर्तनाची केंद्र असणाऱ्या मंदिराना संयोजन समिती तर्फे संपर्क करण्यात आला असुन, संबंधित मंदिरात उपास्य देवातेची उपासना करून शहर आणि देशाच्या समृद्धीची या निमित्ताने प्रार्थना करावी असं आवाहन करण्यात आलं आहे. तरुणाई साठी सोशल मीडिया पेज तयार करण्यात आलं असुन, त्यावर त्यांच्या वयोगटातील स्पर्धेचीही लवकर घोषणा करण्यात येईल. यात्रेत एकरूपता दिसावी यासाठी  प्रयत्न चालू असुन, त्या दृष्टीने ही संयोजन समिती चा विचार आहे.

गुरुवारी १९ मार्च रोजी, गुढीपाडव्याच्या दिवशी कल्याण-डोंबिवलीच्या महापौर ॲड. हर्षाली चौधरी (थविल )यांच्या हस्ते श्री गणेशाची महापूजा करण्यात येईल. पंचांग वाचन, श्रीराम महापूजा, प्रतिनिधीक गुढी उभारणी तसेच श्री गणरायाच्या पालखीचे पूजन होऊन ढोल-ताशांच्या गजरात पालखीचे स्वागत यात्रेसाठी प्रस्थान होईल.ही स्वागत यात्रा भागशाळा मैदान येथून सकाळी सव्वा सात वाजता सुरू होईल. भागशाळा मैदान, पंडित दीनदयाल पथ, द्वारका हॉटेल, रेल्वे मार्ग, शिवमंदिर पथ, राजेंद्र प्रसाद पथ, चार रस्ता मानपाडा रोड,बाजीप्रभू चौक, फडके पथ आणि आप्पा दातार चौक या मार्गे पालखीसह यात्रा मार्गक्रमण करेल.

यंदाच्या नववर्ष स्वागत यात्रेत किमान १०० च्या आसपास संस्था विविध प्रकारे सहभागी होतील अशी माहिती आयोजकांनी यावेळी दिली . या संपूर्ण स्वागत यात्रेत ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे प्रमुख अतिथी म्हणून डोंबिवली मध्ये यावेळी आपल्यासोबत असतील. डोंबिवलीकरांनी, विशेषतः शहरातील तरुणाईने मोठ्या संख्येने या सर्व उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.या पत्रकार परिषदेला कल्याण-डोंबिवलीचे उपमहापौर राहुल दामले, नगरसेवक मंदार हळबे, श्री गणेश मंदिर संस्थेच्या अध्यक्ष अलका मुतालिक, सचिव प्रविण दुधे, उपाध्यक्ष सीए सुहास आंबेकर, तसेच श्रीपाद कुलकर्णी, गौरी कुंटे, राजय कानिटकर आणि संयोजन समिती प्रमुख अमेय काटदरे उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हार्दिक पांड्या मुंबईहून बेंगळुरूला तळ हलवतो: हे कारण आहे

हार्दिक पांड्या (एएनआय फोटो) भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या करिअरच्या महत्त्वाच्या वाटचालीत बेंगळुरू येथे स्थलांतरित झाला आहे, BCCI च्या सेंटर ऑफ एक्सलन्सला (COE)...

मुंबईतील चेंबूरमध्ये स्कूल बसवर झाड पडल्याने 11 वर्षीय मुलाचा मृत्यू, 4 जखमी

13 विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या मेक फोर्स स्कूल बसवर (MH03/CV-7439) झाड कोसळल्याची घटना दुपारी 3 च्या सुमारास रोड क्रमांक 11 वरील हेरिटेज प्राईडजवळ घडली....

त्याच्या बाजूला व्यावहारिक KU सह, मुकुंदचे डोळे आनंदी पुनरुत्थान

पुणे: अनौपचारिक क्रीडा चाहत्यांसाठी, त्यांची भागीदारी एक आकर्षक प्रयोग आहे: दोन माजी प्रतिस्पर्धी आणि जवळचे मित्र व्यावसायिक प्रतिस्पर्ध्यापासून प्रशिक्षक आणि विद्यार्थी या...

मेगापोडे: मेगापोडेला भेटा: पिल्लेसारखा पक्षी जो आपली अंडी हेतुपुरस्सर पुरतो आणि ती मुले पुन्हा...

पारंपारिक उष्मायनाला मागे टाकणारा कोंबडीच्या आकाराचा पक्षी मेगापोड सह निसर्गाची कल्पकता चमकते. नर वनस्पतीपासून उष्णता निर्माण करणारे ढिगारे काळजीपूर्वक तयार करतात, अंडी उबविण्यासाठी...

पहिल्याच पावसात उल्हासनगरातील शिवाजी चौक पाण्याखाली: व्यापाऱ्यांसह वाहन चालक त्रस्त

उल्हासनगर दि. ३० ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगरच्या विकासकामांसाठी करोडो रुपयांचा निधी उपलब्ध करूनही उल्हासनगर शहराची परिस्थिती जैसी थी वैशीच दिसून येत असल्याचे...

error: Content is protected !!