Homeसामाजिकडॉ.वाळीबा विठ्ठल पोपेरे यांची सामाजिक कार्याची शौर्यगाथा

डॉ.वाळीबा विठ्ठल पोपेरे यांची सामाजिक कार्याची शौर्यगाथा

डॉ. वाळीबा विठ्ठल पोपेरे यांचा मौजे. पोपेरेवाडी (कोंभळाणे)ता.अकोले जि.अहिल्यानगर या गावी गरीब कुटुंबामध्ये जन्म झाला. निरक्षर  आई-वडीलांनची खूपच कौटुंबिक आर्थिक परिस्थिती गरिबीची असल्याने शेती शिवाय इतर कोणत्याही साधन जगण्याचे नव्हते. वडिलांचे नाव कै.विठ्ठल कुशाबा पोपेरे व आईचे नाव कै.रुक्मिणीबाई विठ्ठल पोपेरे त्यांना सहा अपत्य त्यामध्ये चार मुले व दोन मुली डॉ.वाळीबा पोपेरे हे सर्वात शेवटचे (धाकटे) होय डॉ.पोपेरे यांचे प्राथमिक शिक्षण कसेबसे श्री संत गाडगे महाराज पोस्ट बेसिक आश्रम शाळा राहुरी येथे झाले व माध्यमिक शिक्षण कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालय कोंभाळणे येथे झाले आई-वडिलांचा व्यवसाय शेती करणे हा होय सर्व निसर्गावरच अवलंबून असे पाऊस पडला तर शेतीत पीक घेता येत असे व पाऊस जर पडला नाही तर शेतामध्ये काहीच पिकत नसे. मोलमजुरी करण्यासाठी इतर गावी स्थलांतर करावे लागत असे तसेच गावामध्ये पुढील शिक्षण सुविधा उपलब्ध नसल्याने उच्च माध्यमिक शिक्षण घेण्याकरिता साहजिकच बाहेरगावी जावे लागले वस्तीगृहात राहून पुढील शिक्षण सुरू झाले स्वतः मेहनत करून सुट्टीमध्ये काम करून शिक्षणाचा खर्च भागवत असे नंतर वार्षिक सुट्टी लागली की जवळच असलेल्या शहरात जाऊन मार्च ते मे महिन्या पर्यंत मिळेल ते काम करायचे व जमा केलेल्या पैशातून पुढील वर्षाची शाळेची फी, गणवेश, वह्या पुस्तके, व वसतिगृहाची फी, असे भागवायचे अशा प्रकारे शालेय जीवनाचा प्रवास सुरू झाला. असे असताना मनात विचार आला की आपण इतके गरीब का आहोत आपण देखील श्रीमंत व्हायला पाहिजे होते. परंतु गरीब कुटुंबात जन्म झाल्याने  नाविलाज होता.

आपण मागासलेल्या समाजाकरिता  चांगले काहीतरी काम केले पाहिजे असे असताना स्वामी विवेकानंद यांचे पुस्तके वाचण्यास सुरुवात केली. व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहेब, रयतचे राजे छत्रपती शिवाजी महाराज,  महात्मा ज्योतिबा फुले, यांची पुस्तके वाचण्यास सुरुवात केली महाभारत, रामायण, असे वेगवेगळे ग्रंथ वाचण्यास सुरुवात केली. व त्यामधील असलेले सर्वांचे विचार मनात बिंबु लागले. व त्यानंतर समाजसेवेची आवड निर्माण झाली. छोटे मोठे काम करून समाजसेवा करण्याचे ठरविले ग्रामीण खेड्यामध्ये जीवन जगण्यास खरोखरच मूलभूत गरजांची कमतरता आहे हे लक्षात आले व आपले मूळ गाव सोडून पुढील शिक्षणाकरिता किंवा रोजगारा करिता मुंबई लगत असलेल्या ठाणे जिल्ह्यातील कल्याण या शहरात मोठे बंधू राहत असे वडिलांनी पाठवले यांच्याकडे राहु लागलो छोटे-मोठे कोर्स केले. पुढील शिक्षणाकरिता मोठे बंधू व वहिनी यांचे मोठ्या प्रमाणावर सहकार्य लाभले छोटे मोठे काम करून बी.ए.पर्यंत शिक्षण पूर्ण केले. परंतु समाजसेवेची आवड असल्याने मन काही स्वस्थ बसून देत नव्हतं ग्रामीण भागात आजही पाहिले तर मागासवर्गीय समाज हा शासनाच्या मुख्य प्रवाहात आलेला दिसत नाही ही बाब लक्षात घेऊन सामाजिक संघटनेच्या मार्फत सामाजिक सेवा करण्याचे पक्के ठरविले व आदिवासी सामाजिक सेवाभावी संस्था डोंबिवली अध्यक्ष दत्तात्रय झोले साहेब, यांच्यामार्फत सदस्य बनवून सामाजिक कार्य करण्याची सुरुवात केली. शहराजवळच असलेल्या वाड्या वस्त्यांवर पाड्यांवर जाऊन आदिवासी समाजाची व्यथा, प्रथा,  चालीरीती, रूढी जाणून घेण्याचा प्रयत्न केला व खऱ्या अर्थाने सामाजिक कामाची सुरुवात झाल्यासारखे वाटू लागले.आदिवासी समाजाचे महादेव जमातीचे पहिले IAS डॉक्टर गोविंद गारे साहेब यांची भेट झाली. व विविध संघटनेचे पदाधिकारी डी के झोले साहेब यांची देखील त्या कार्यक्रमांमध्ये भेट झाली व त्यांच्यासोबत चांगल्या पद्धतीने समाजसेवेचे कार्य करण्याची एक नवीन संधी मला मिळाली.

त्यानंतर मोठ्या प्रमाणावर समाजसेवेचे कार्य सुरू झाले अर्धवेळ मिळेल ती नोकरी करून त्यानंतर समाजसेवा करिता अर्धवेळ देत असे हे सगळं करून देखील पुढील शिक्षण बंद केले नाही ते चालूच ठेवले. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ यांच्याकडून एम ए पूर्ण केले उदरनिर्वाह करण्यासाठी स्क्रीन पेंटिंग कमर्शियल आर्ट डिप्लोमा पूर्ण केला. कृषी विभागाचा कोर्स व नागरिक संरक्षण दल यामध्ये मिळेल ते काम केले व मराठी इंग्लिश टंकलेखन व संगणक प्रशिक्षण एम एस सी आय टी असे विविध कोर्स पूर्ण केले. तसेच ठाणे जिल्ह्यातील मुंबई लगत असलेला बराच भाग हा मागासलेला आहे हे कळाले वाडा,मोखाडा, जव्हार, तलासरी, पालघर, विक्रमगड, शहापूर, मुरबाड, कर्जत, खोपोली इत्यादी ठिकाणी ग्रामीण आदिवासी समाजामध्ये जनजागृती मोहीम नेहरू युवा केंद्र महाराष्ट्र शासन यांचा उपक्रमाद्वारे यांच्यामार्फत राबविण्यास सुरूवात केली विविध महाविद्यालय विविध शाळा गावोगावी जाऊन वाड्यावर त्यांवर पाड्यांवर  अशा ठिकाणी समाजामध्ये जनजागृती मोहीम राबवण्यास सुरुवात केली. सुरुवातीला ग्रामीण भागात अल्प प्रमाणात प्रतिसाद मिळाला परंतु वारंवार त्यांच्या दारी खेटे मारून मग त्यांना कळलं की हे समाजसेवेचे उपक्रम राबवत आहेत व आमच्या हिताचे आहेत मग त्यांची चांगली मैत्री झाली व खऱ्या अर्थाने ग्रामीण भागामध्ये कामाला सुरुवात झाली. तसेच पुढील उपक्रम राबवण्यास हाती घेतले शासनाच्या विविध योजनांची माहिती देणे, शिक्षणाचे महत्त्व महिलांसाठी पटवून देणे, अंधश्रद्धा निर्मूलन, याच्याबद्दल अभियान राबवणे, आरोग्य शिबिर अभियान राबवणे, कुपोषित बालकांना माहिती देणे, आरोग्य शिबिर राबवणे, मुला-मुलींचे शिक्षणाबाबतचे महत्त्व पालक सभेचे आयोजन करणे, अन्न वस्त्र व निवारा या मूलभूत गरजा कशा मिळतील यावर भर देण्यात आला. व त्या कृतीत राबविण्याचे सखोल कार्य हाती घेतले पुढे रोजगाराबाबत शिबिरे घेणे, गावातील मुला मुलींना रोजगाराबाबत शिबिर घेणे, गावातील मुलांना इयत्ता दहावी नंतर किंवा बारावीनंतर पुढे काय करायचे याबाबत सखोल माहिती देणे, केवळ नोकरीच्या मागे न लागता आयटीआय कोर्स देखील केल्याने नोकरी मिळते अशा पद्धतीने त्यांना शिबिराच्या माध्यमाने समजविण्यात आले. हे सर्व करत असताना काही गावांमध्ये जाणे-येण्याकरिता बस  सेवा उपलब्ध नव्हती विविध जिल्ह्याच्या ठिकाणी निवेदन देऊन बस सेवा सुरू करण्यात आली व त्या बस सेवेचा गरोदर स्त्रिया वयोवृद्ध नागरिक व शाळकरी मुले यांना शहराच्या ठिकाणी जाण्याकरिता मोठ्या प्रमाणात फायदा झाला अशा प्रकारे सामाजिक कार्याची चळवळ चालूच ठेवली. राजकारणामध्ये मागासवर्गीय यांचे प्रमाण फार अल्प होते.सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, याकडे देखील त्यांचा लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

तसेच मुरबाड अंबरनाथ शहापूर बदलापूर कर्जत कल्याण उल्हासनगर अशा शहरात महिलांकरिता मोफत ब्युटी पार्लर प्रशिक्षण सुरू केले,मेणबत्ती प्रशिक्षण मोफत दिले, अगरबत्ती प्रशिक्षण मोफत दिले, व तरुण होतकरू मुला मुलींकरिता संगणक प्रशिक्षण मोफत देण्यात आले, हे केवळ सूक्ष्म लघु उद्योग केंद्र साकीनाका भारत सरकार यांच्यामार्फत व एकात्मक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय शहापूर यांच्यामार्फत गरजूवंत अनुसूचित जमातींच्या मुला-मुलींकरिता प्रशिक्षण देण्यात आले. शाळेत जाण्यासाठी शाळकरी मुलांना सायकल वाटप करण्यात आली व अनुसूचित जमातीच्या उमेदवारांकरिता न्यूकलेस बजेट अंतर्गत विविध योजनांची माहिती देणे, व त्या कृतीत राबवण्याकरिता प्रोत्साहन देणे व कागदपत्रांची माहिती देणे अशा प्रकारे गावोगावी जाऊन प्रत्यक्षात त्यांना त्या योजनेचा लाभ देण्यात आला.तसेच आदिवासी शबरी वित्त महामंडळ यांच्यामार्फत शबरी घरकुल योजना देखील अनेक कुटुंबाला मिळवून देण्यात आल्या व सामाजिक कार्य सतत चालूच राहिले अनेक तरुण-तरुणी यांना मार्गदर्शन करून स्वतःच्या व्यवसाय कसा सुरू करावा या विषयावर जास्त भर देण्यात आला.व एमपीएससी, यूपीएससी यांच्या मार्फत देखील चांगले अधिकारी बनू शकतो त्यासाठी त्यांना विविध ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे सर्व स्वर्गीय रुक्मिणीबाई पोपेरे चारीटेबल ट्रस्ट बदलापूर या ट्रस्टच्या वतीने करण्यात आले.अशा सर्व केलेल्या उल्लेखनीय समाजकार्याची दखल घेऊन उल्हासनगर महानगरपालिका यांच्यामार्फत ‘महापौर जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. व त्यानंतर मोठी जबाबदारी अंगावर आल्याने समाजकार्याची व्याप्ती वाढवण्यास सुरुवात केली. राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या विविध योजना गोरगरीब जनतेपर्यंत कशा पोहोचतील या सामाजिक कार्यावर भर देण्यात आली. अशाप्रकारे राज्य शासनाने दखल घेऊन राज्यस्तरीय आदिवासी सेवक पुरस्कार महाराष्ट्र शासन त्यांच्यामार्फत प्रदान करण्यात आला. अशाप्रकारे समाजसेवेचे कार्य केवळ  महाराष्ट्रात न करता प्रत्येक राज्यांमध्ये केलं पाहिजे हे मनात व्यापक विचार ठेवून समाजकार्य महाराष्ट्र, उडीसा, गोवा,झारखंड,आसाम नागालँड,तिरुअनंतपुरम,  इत्यादी ठिकाणी सुरू झाले. त्यानंतर मुंबईमध्ये डॉक्टर होमी बाबा रिसर्च सेंटर येथे ICITP या इंटरनॅशनल संघटनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील मुंबई येथे मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले त्या कार्यक्रमाकरिता नागालँड, मणिपूर, मिझोरम, तिरुअनंतपुरम,आसाम, राजस्थान, झारखंड, उडीसा,महाराष्ट्र  इत्यादी राज्यातील विविध आदिवासी जमातीतील जनसंख्या मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रमास उपस्थित राहिले व  त्यांच्यासमोर महाराष्ट्र राज्यातील ४५  जमातीची माहिती सादर करण्याची एक संधी प्राप्त झाली. महाराष्ट्र राज्यातील असलेले आदिवासी ४५  जमातीची माहिती त्यांच्या अडीअडचणी राहणीमान विविध व्यवसाय व समस्या रोजगारापासून असलेले वंचितता या सर्व बाबींवर विशेष लक्ष केंद्रित करून ते मांडण्याची संधी क्रमशा प्राप्त झाली. त्या कार्यक्रमाकरिता डॉक्टर होमी भाभा रिसर्च सेंटरचे प्राध्यापक. टोपो सर व भूमी सेनेचे अध्यक्ष काळुराम काका दोधडे सर पालघर व पी ए सांगमा सर आसाम व राजस्थानचे प्रा.सूर्यकांत  मीना सर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रम मोठ्या उत्साहात मुंबई येथे झाला.अशाप्रकारे सामाजिक कार्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भर पडली व सामाजिक कार्याची व्याप्ती देशभर वाढली. महाराष्ट्र राज्यामध्ये आदिवासी समाजाकरिता १००  कलमी धोरणांची मांडणी करून महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल मा. विद्यासागरराव साहेब यांच्या पर्यंत अनुसूचित जमाती कल्याण समिती विधान भवन (चेरमन ) साहेब, समितीमार्फत मांडणी करून सामाजिक परिवर्तनाचा एक टप्पा पार पडला त्यामध्ये मूलभूत गरजा, रोजगार प्राप्ती, उद्योग व्यवसाय, शैक्षणिक धोरण, वन हक्क, महसूल अधिनियम, वनपट्टे, आरोग्य सुविधा, दळणवळण क्षेत्र, अशा  क्रीडा धोरण, मूलभूत गरजा, आदिवासींचे जास्त सहभाग डिंक,मध,तेंदु पत्त टोकर बांबू, हिरडा,बेहडा, भात गिरणी, हिरडा प्रकल्प उभारणे, अशा विविध सामाजिक उपकरणे विद्यमान कायद्यातील पळवाटा व तरतुदी व विद्यमान कायद्यात दुरुस्ती करणे यांचा सखोल अभ्यास करून शंभर कलमी धोरणांची अंमलबजावणी करण्याकरिता शासनास निवेदन देण्यात आले अशा प्रकारे सामाजिक कार्य करत असताना विविध संघटना,संस्था, महामंडळे, महाराष्ट्र राज्य,गोवा राज्य, दिल्ली राज्य, झारखंड राज्या, जम्मू-काश्मीर राज्य,राजस्थान राज्य अशा वेगवेगळ्या राज्यातून देखील तालुका पातळीवर जिल्हा पातळीवर राज्यस्तरावर व राष्ट्रीय स्तरावर सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन 3936 पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. केवळ पुरस्कार महत्त्वाचे नसून त्यामध्ये गोरगरीब जनतेची व गरजवंत समाजाची केलेली सेवा ही फार महत्त्वाची सेवा असून जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे. ही बाब लक्षात घेऊन देशपातळीवर विविध राज्यांमध्ये जाऊन जनजागृती अभियान राबवणे भारतीय राज्यघटनेचा सूची क्रमांक पाच मध्ये असलेल्या तरतुदींच्या आधारे असलेल्या अधिकाराबाबत माहिती देऊन केंद्रशासित प्रदेश त्यामध्ये विविध कायद्यातील असलेल्या त्रुटींची निवारण करून विद्यमान कायद्यात बदल करून त्याची अंमलबजावणी करणे याबाबत राज्य शासन व केंद्र शासनास शिफारसी करण्यात आल्या. अशाप्रकारे कार्यक्रम सुरू आहेत. हे सर्व करत असताना देशपातळीवरील भारत आयकॉन पुरस्कार रक्षा मंत्रालय तथा  ग्रामविकास मंत्रालय यांच्या सहयोगाने प्राप्त झाला तसेच सरदार वल्लभाई पटेल पुरस्कार जम्मू-काश्मीर येथे नीती आयोग भारत सरकार यांच्या माध्यमाने प्रदान करण्यात आला. तसेच इंटरनॅशनल स्पीच  स्प्रिच्युअल युनिव्हर्सिटी नवी दिल्ली यांची डॉक्टरेट पदवी शालेय शिक्षण मंत्री जम्मू-काश्मीर सरकार यांच्या हस्ते डॉ.व्ही.व्ही.पोपेरे यांना प्रदान करण्यात आली.भारतीय वेल्फेअर असोसिएशन नवी दिल्ली  यांच्या माध्यमाने देशरत्न पुरस्कार रक्षा मंत्रालय ग्रामविकास मंत्रालय व समाज कल्याण मंत्रालय यांच्या विशेष सहयोगाने नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला. अशाप्रकारे सामाजिक कार्याचे चळवळ अद्याप पर्यंत सुरू असून सामाजिक परिवर्तन करणे हे एक देशहिताचे कार्य असून आजच्या तरुण पिढीने डॉ. पोपेरे यांच्या कार्याची आदर्श डोळ्यासमोर ठेवून माणुसकी धर्म जोपासला पाहिजेत सामाजिक परिवर्तन करणे काळाची गरज आहे. माणसाने माणुसकी धर्म पाळला पाहिजे हीच खरी जनसेवा होय.

धन्यवाद!

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीसीसीआय सूर्यकुमार यादवला पुढील निवड बैठकीसाठी न बोलावण्याची शक्यता आहे

सूर्यकुमार यादव (पीटीआय फोटो/कुणाल पाटील) नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट बोर्ड (बीसीसीआय) सूर्यकुमार यादवच्या T20I संघातील भविष्याबाबत चर्चा करण्यासाठी गोंधळात पडणार आहे. TOI मार्चमध्ये...

एमएलसी निवडणुका: प्रमुख महामंडळ आणि पॅनेल नियुक्त्यांसाठी बंडखोरांचा विचार करू, महा भाजप प्रमुख |...

मुंबई : 18 जून रोजी होणाऱ्या 16व्या द्विवार्षिक आणि एका पोटनिवडणुकीसाठी महायुतीने बुधवारी 17 एमएलसी उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केली. संयुक्त पत्रकार...

रोबोटिक सहाय्याने कमीतकमी हल्ल्याची शस्त्रक्रिया संधिवाताचा हृदयरोग असलेल्या महिलेला प्रक्रियेनंतर फक्त 3 दिवसांनी चालणे,...

डॉ आशिष बाविस्कर रोबोटिक सहाय्यक मिनिमली इनवेसिव्ह मिट्रल व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट करत आहेत पुणे : संधिवाताच्या हृदयविकाराने ग्रस्त असलेल्या 46 वर्षीय महिलेला रोबोटिक सहाय्यक...

आजची स्पॅनिश म्हण: “पुरुष जे करू शकतो ते करतो; स्त्री ते करते…” |

दिवसाची स्पॅनिश म्हण (प्रतिमा: AI-व्युत्पन्न) काही सुविचार गूढ गुंफून येतात. इतर सरळ मुद्द्यापर्यंत पोहोचतात. ही स्पॅनिश म्हण दुस-या श्रेणीतील आहे. "पुरुष जे करू...

दीनानाथ मंगेशकर हॉस्पीटलमधील 6 वर्षीय मुलाच्या मृत्यूची ससूनने चौकशी करावी: पीएमसी पॅनेल

पुणे : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात (DMH) सहा वर्षीय प्रियांशी बागडे हिच्या डोळ्याच्या उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची चौकशी करण्यासाठी पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) नियुक्त केलेल्या...

बीसीसीआय सूर्यकुमार यादवला पुढील निवड बैठकीसाठी न बोलावण्याची शक्यता आहे

सूर्यकुमार यादव (पीटीआय फोटो/कुणाल पाटील) नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट बोर्ड (बीसीसीआय) सूर्यकुमार यादवच्या T20I संघातील भविष्याबाबत चर्चा करण्यासाठी गोंधळात पडणार आहे. TOI मार्चमध्ये...

एमएलसी निवडणुका: प्रमुख महामंडळ आणि पॅनेल नियुक्त्यांसाठी बंडखोरांचा विचार करू, महा भाजप प्रमुख |...

मुंबई : 18 जून रोजी होणाऱ्या 16व्या द्विवार्षिक आणि एका पोटनिवडणुकीसाठी महायुतीने बुधवारी 17 एमएलसी उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केली. संयुक्त पत्रकार...

रोबोटिक सहाय्याने कमीतकमी हल्ल्याची शस्त्रक्रिया संधिवाताचा हृदयरोग असलेल्या महिलेला प्रक्रियेनंतर फक्त 3 दिवसांनी चालणे,...

डॉ आशिष बाविस्कर रोबोटिक सहाय्यक मिनिमली इनवेसिव्ह मिट्रल व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट करत आहेत पुणे : संधिवाताच्या हृदयविकाराने ग्रस्त असलेल्या 46 वर्षीय महिलेला रोबोटिक सहाय्यक...

आजची स्पॅनिश म्हण: “पुरुष जे करू शकतो ते करतो; स्त्री ते करते…” |

दिवसाची स्पॅनिश म्हण (प्रतिमा: AI-व्युत्पन्न) काही सुविचार गूढ गुंफून येतात. इतर सरळ मुद्द्यापर्यंत पोहोचतात. ही स्पॅनिश म्हण दुस-या श्रेणीतील आहे. "पुरुष जे करू...

दीनानाथ मंगेशकर हॉस्पीटलमधील 6 वर्षीय मुलाच्या मृत्यूची ससूनने चौकशी करावी: पीएमसी पॅनेल

पुणे : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात (DMH) सहा वर्षीय प्रियांशी बागडे हिच्या डोळ्याच्या उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची चौकशी करण्यासाठी पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) नियुक्त केलेल्या...
error: Content is protected !!