Homeशहर'जनगणना २०२७' अंतर्गत क्षेत्रीय प्रशिक्षकांसाठी (FT) तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन

‘जनगणना २०२७’ अंतर्गत क्षेत्रीय प्रशिक्षकांसाठी (FT) तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन

उल्हासनगर दि .१० : भारत सरकारमार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘भारताची जनगणना २०२७’ या अत्यंत महत्त्वाच्या राष्ट्रीय प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याची (HLO) पूर्वतयारी आता वेगाने सुरू झाली आहे. जनगणना अधिनियम १९४८ च्या कलम ४, ५ व ७ आणि जनगणना नियम १९९० मधील तरतुदींनुसार, क्षेत्रीय प्रशिक्षकांची (Field Trainers – FT) कायदेशीर नियुक्ती करण्यात आली आहे. याच अनुषंगाने, शुक्रवारी सिंधू भवन, उल्हासनगर-२ येथे क्षेत्रीय प्रशिक्षकांसाठीच्या विशेष प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले होते .

या प्रशिक्षण कार्यक्रमात मास्टर ट्रेनर्स (MT) द्वारे सर्व नियुक्त क्षेत्रीय प्रशिक्षकांना सखोल मार्गदर्शन करण्यात आले. या प्रशिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट प्रगणक (Enumerators) आणि पर्यवेक्षक (Supervisors) यांना प्रशिक्षित करण्यासाठी क्षेत्रीय प्रशिक्षकांची क्षमता बांधणी करणे हे आहे.

प्रशिक्षणातील मुख्य मुद्दे आणि ठळक वैशिष्ट्ये :

प्रशिक्षण प्रणाली : हे प्रशिक्षण ‘कॅस्केड मॉडेल’ (Cascade Model) वर आधारित असून, यामध्ये क्षेत्रीय प्रशिक्षकांना डिजिटल तंत्रज्ञान आणि प्रत्यक्ष क्षेत्रीय कार्याचे प्रशिक्षण दिले जात आहे.

डिजिटल उपक्रम : प्रशिक्षणादरम्यान जनगणना मोबाइल अॅप (HLO Mobile App) वापरण्याचे प्रात्यक्षिक आणि तांत्रिक बारकावे समजावून सांगण्यात आले.

नकाशा आखणी : घरांची यादी आणि गृहगणनेसाठी (HLO) आवश्यक असलेले मांडणी नकाशे (Layout Maps) तयार करण्याबाबत सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले.

शिस्त आणि कर्तव्य : जनगणना कार्यात सहभागी होणारे सर्व कर्मचारी हे ‘लोकसेवक’ (Public Servant) असून, त्यांनी जनगणनेच्या माहितीची गोपनीयता राखणे आणि कायदेशीर कर्तव्यांचे पालन करणे अनिवार्य असल्याचे अधोरेखित करण्यात आले.

सदर प्रशिक्षण कार्यक्रमासाठी जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावरील वरिष्ठ जनगणना अधिकारी उपस्थित होते. या प्रशिक्षणानंतर हे क्षेत्रीय प्रशिक्षक आता आपापल्या क्षेत्रात प्रगणक आणि पर्यवेक्षकांना मार्गदर्शन करून राष्ट्रीय कार्यात योगदान देण्यास सज्ज झाले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

समाजसेवेत अग्रेसर असणारे समाजसेवक नितीन सपकाळे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

उल्हासनगर दि .१ ( प्रमोद दळवी ) : समाजसेवेत सातत्याने अग्रेसर असणारे समाजसेवक नितीन सपकाळे यांचा वाढदिवस “समाजसेवक चषक” या उपक्रमाच्या निमित्ताने अत्यंत उत्साहात...

महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६७ वा वर्धापन दिन उल्हासनगर महानगरपालिकेत उत्साहात साजरा

'भारताची जनगणना २०२७' अंतर्गत नागरिकांना 'स्व-गणना' करण्याचे आयुक्त मनिषा आव्हाळे यांचे आवाहन उल्हासनगर दि.१ : महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६७ वा वर्धापन दिन शुक्रवारी  उल्हासनगर...

मुंबईत 1,745 कोटींचे कोकेन जप्त; अमित शहा यांनी निर्दयी कारवाईची शपथ घेतली

प्रातिनिधिक प्रतिमेसाठी वापरलेली प्रतिमा मुंबई: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने मुंबईत 1,745 कोटी रुपये किमतीचे 349 किलो उच्च दर्जाचे कोकेन जप्त केल्यानंतर, आंतरराष्ट्रीय ड्रग कार्टेलविरुद्ध...

रु. किमतीचे 3 किलो हायड्रोपोनिक तण. पुणे विमानतळावर 2 फ्लायर्सकडून 1.17 कोटी जप्त

कस्टम अधिकाऱ्यांनी सांगितले की, एकूण ३३४८ ग्रॅम हाय एंड वीड जप्त करण्यात आले, ज्याची किंमत अंदाजे रु. अवैध बाजारात 1.17 कोटी." decoding="async" fetchpriority="high"/>सीमाशुल्क...

‘तुम्ही मजल्यावर असाल!’ फ्युरियस हेनरिक क्लासेन त्याच्या फॅमिलीचे चित्रपट बनवताना शांत होतो, कॅमेरात कैद...

हेनरिक क्लासेन (इमेज क्रेडिट: BCCI/IPL) नवी दिल्ली: सनरायझर्स हैदराबादचा स्टार हेन्रिक क्लासेन त्याच्या आणि त्याच्या कुटुंबाचे फोटो काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका चाहत्याने...

error: Content is protected !!