- आमदार कुमार आयलानी व युवासेना कल्याण लोकसभा सचिव हरजिंदरसिंह भुल्लर यांच्या हस्ते उद्घाटन
उल्हासनगर दि ३१ : शहरातील शहाड परिसरातील कोणार्क रेसीडेंसी इमारतींमध्ये स्थापित करण्यात आलेल्या सौरऊर्जा पॅनल्सचे उद्घाटन आमदार कुमार आयलानी व युवासेना कल्याण लोकसभा सचिव हरजिंदरसिंह भुल्लर यांच्या उपस्थितीत पार पडले. या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी आमदार कुमार आयलानी यांनी सांगितले की, भारताचे यशस्वी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे की अधिकाधिक नागरिकांनी सौरऊर्जेचा वापर करावा. कोणार्क रेसीडेंसीने या दिशेने पुढाकार घेतला आहे, त्यामुळे सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले.या सौरऊर्जा प्रणालीमुळे मोठ्या प्रमाणावर विजेची बचत होणार आहे. ‘पेरी सकाळची किरण’ या कंपनीच्या मदतीने हे सोलर पॅनल बसविण्यात आले असून, याचा खर्च प्रतियुनिट ११ रुपये आहे, जो केवळ ५ वर्षांपर्यंतच भरावा लागेल. त्यानंतर हे सौरऊर्जा पॅनल मोफत उपलब्ध होईल व सोसायटीतील रहिवाशांना विनामूल्य वीज मिळू शकणार आहे.

या विशेष प्रसंगी माजी नगरसेवक मनोज लासी, कोणार्क रेसीडेंसीचे चेअरमन डॉ. नागपाल, शिवसेना विभागप्रमुख प्रमोद पांडेय, समाजसेवक रवी भाठीजा, यांच्यासह कोणार्क रेसीडेंसी सोसायटीचे अनेक रहिवासी उपस्थित होते.





























