Homeशहरकला आणि क्रीडा यांचा अनोखा संगम : रंगकर्मी क्रिकेट लीग"चा दिमाखदार ट्रॉफी...

कला आणि क्रीडा यांचा अनोखा संगम : रंगकर्मी क्रिकेट लीग”चा दिमाखदार ट्रॉफी आणि टी-शर्ट अनावरण सोहळा संपन्न.

मुंबई दि. ९ : चंदेरी दुनियेतील कलाकार जेव्हा हातात बॅट आणि चेंडू घेतात, तेव्हा मैदानातही मनोरंजनाचा षटकार पाहायला मिळतो. रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रातील कलाकारांना एकत्र आणणाऱ्या बहुचर्चित “रंगकर्मी क्रिकेट लीग” (RCL) स्पर्धेचा अधिकृत ट्रॉफी आणि टी-शर्ट लॉन्चिंग सोहळा नुकताच मुंबईत मोठ्या थाटामाटात पार पडला.

या सोहळ्याला श्रीकांत भारतीय आणि मंगेश सांगळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. कलाकारांमधील एकोपा आणि खिलाडूवृत्ती जोपासण्यासाठी अशा स्पर्धांचे आयोजन होणे काळाची गरज असल्याचे मत मान्यवरांनी यावेळी व्यक्त केले. त्यांच्या उपस्थितीने सोहळ्याची रंगत द्विगुणित झाली. या स्पर्धेचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे संघांचे नेतृत्व करणारे दिग्गज कलाकार! यंदा मैदानात आपली रणनीती आखण्यासाठी सज्ज झाले आहेत: विजय पाटकर, सागर कारंडे,  हरीश दुधाडे, कांचन पगारे, संचित यादव आणि नूपुर दुधवडकर या दिग्गज कलाकारांच्या सहभागामुळे प्रेक्षकांमध्ये स्पर्धेबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात संचित यादव आणि शितल कल्लापुरे यांनी मोलाची भूमिका बजावली. आकर्षक चकाकणारी ट्रॉफी आणि विशेष डिझाइन केलेले टी-शर्ट्स हे या संध्याकाळचे मुख्य आकर्षण ठरले. या उपक्रमाला पंडित राठोड, सचिन खांडागळे, संदीप राठोड, गणेश गारगोटे, ओमकार सर आणि अखिलेश चौबे या प्रायोजकांनी भक्कम पाठबळ दिले आहे.

“केवळ अभिनयच नाही, तर मैदानावरही आमची मैत्री आणि एकता दिसावी, हाच या लीगचा मुख्य उद्देश आहे.” क्रिकेटप्रेमी आणि चाहत्यांसाठी ही एक पर्वणीच ठरणार आहे. या लीगचे सामने खालीलप्रमाणे रंगणार आहेत: दिनांक: १४ आणि १५ मे २०२६. ठिकाण: परळ सेंट्रल रेल्वे ग्राऊंड, मुंबई. अंतिम सामना हे या स्पर्धेचे विशेष आकर्षण असेल. तरी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून आपल्या आवडत्या कलाकारांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते ‘परळ’च्या खेळपट्टीवर… कोण उंचावणार विजयाची ट्रॉफी?

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘माझ्या कुटुंबाशी सामना करण्यापेक्षा केतनला मारणे सोपे होते’: सिया गोयलचा पुणे पोलिसांना धक्कादायक खुलासा

लोहगड किल्ला हत्याकांडात एक धक्कादायक खुलासा झाला कारण आरोपी सिया गोयलने पोलिसांना सांगितले की तिला तिचा मंगेतर केतन अग्रवाल त्याच्या केसांच्या पॅचमुळे आवडत...

एनबीएचा पुढील शोध सुपरस्टारसाठी नाही. हे पुढील मोठ्या कल्पनेसाठी आहे

डेव्हिड ली, एनबीए इन्व्हेस्टमेंटचे प्रमुख. (फोटो क्रेडिट: एनबीए रायझिंग स्टार्स इनव्हिटेशनल) सिंगापूरमधील TimesofIndia.com: सिंगापूरमधील OCBC एरिना येथे NBA Rising Stars Invitational 2026 च्या...

दोन दुर्मिळ तांबे प्लेट्स एलिफंटाचा सागरी भूतकाळ उघडतात

या वर्षी एलिफंटा येथे उत्खनन केलेल्या दोन मोठ्या स्टोरेज जारपैकी एका खोलवर, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) ने 17 एप्रिल रोजी दुहेरी खजिना अडखळला.पश्चिम भारतातील...

‘केतनने मला सांगितले की लग्न मोडण्यास उशीर झाला आहे’: पोलिस म्हणतात की सिया गोयलने...

चॅट्स सिया गोयलच्या विधानांच्या विरोधात आहेत, लोणावळा पोलिस म्हणतात लोणावळा: रियाल्टर केतन अग्रवालच्या कथित हत्येच्या तपासाला नवे वळण मिळाले आहे, पोलिसांनी दावा केला...

स्वीडिश मंत्री तिच्या 3 महिन्यांच्या बाळाला EU बैठकीत घेऊन आले; व्हायरल व्हिडिओ देशातील उदार...

या क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. गुरुवारी संपूर्ण युरोपमधील मंत्री हवामान धोरणांवर चर्चा करण्यासाठी लक्झेंबर्गमध्ये एकत्र आले तेव्हा एका क्षणाने पटकन स्पॉटलाइट...

error: Content is protected !!