Homeशहरउल्हासनगरात महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांवर टोळीचा तलवारीने हल्ला

उल्हासनगरात महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांवर टोळीचा तलवारीने हल्ला

उल्हासनगर दि २ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगर महानगरपालिकेत सफाई कामगार म्हणून कामाला असलेल्या एका कर्मचाऱ्यावर सात ते आठ जणांचे टोळीने तलवारीने हल्ला करून त्याला गंभीर  जखमी केल्याची खळबजण घटना उल्हासनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार उल्हासनगर शहरातील कॅम्प  नंबर २ परिसरातील भैय्यासाहेब  आंबेडकरनगर परिसरात राहणारा पवन ढकोलिया हा उल्हासनगर महापालिकेत सफाई कर्मचारी म्हणून काम करतो. तो दुपारच्या सुमारास जेवणासाठी घरी आला होता. जेवण करून पुन्हा कामावर जात असताना सात ते आठ जणांच्या टोळीने त्याला गंभीरित्या प्रथम मारहाण  करून त्याच्या डोक्यावर तलवारीने हल्ला केला. त्या हल्ल्यात पवन हा गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पवन याच्यावर ज्या  टोळीने हल्ला केला त्या हल्लेखोरांची नावे पवन यांनी पोलिसांना दिली आहे. याशिवाय ज्या टोळीने त्याच्यावर हल्ला केला ती आपल्या परिसरात राहणारे असल्याची त्यांनी सांगितले आहे. पवन यांनी दिलेल्या तक्रारीवरून उल्हासनगर पोलीस ठाण्यात सात ते आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. या घटनेमुळे उल्हासनगरात एकच खळबळ उडाली असून शहरात दहशत निर्माण करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी सर्वत्र केली जात आहे. त्या टोळीने पवन याच्यावर कोणत्या कारणावरून हल्ला केला हा सर्व प्रकार पोलिसांच्या तपासात  उघडकीस येणार आहे.

टोळीने पवन याच्या डोक्यावर १५  ते २०  तलवारीने वार केले आहेत. याशिवाय त्याच्या डोक्यावर दगडी मारण्यात आले असून त्याचा पाय देखील फ्रॅक्चर करण्यात आला आहे. या टोळीने विविध हत्याराने पवन याच्यावर हल्ला केला आहे. हा प्रकार घडत होता तेव्हा परिसरातील नागरिकांनी आरडाओरड  केल्यावर हल्लेखोर त्या ठिकाणी पळून गेले त्यामुळे पवन हा बचावला. परिसरात वाढणाऱ्या गुन्हेगारीला पोलिसांनी आळा घालने गरजेचे आहे असे मत नागरिक व्यक्त करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केप वर्देने विश्वचषक इतिहास रचला, दुर्मिळ पात्रता मैलाचा दगड पूर्ण करण्यासाठी आतापर्यंत केवळ तीन...

केप वर्देच्या खेळाडूंनी ह्यूस्टन येथे शुक्रवार, २६ जून, २०१६ रोजी विश्वचषक गट एच सॉकर सामन्यानंतर सौदी अरेबियासोबत ०-० अशी बरोबरी साधली. (एपी फोटो/डेव्हिड...

बदलाचे स्टीयरिंग व्हील: मुंबई अग्निशमन दलाला पहिली महिला चालक-ऑपरेटर मिळाली

मुंबई अग्निशमन दलाने 29 वर्षीय पल्लवी पाटील यांची पहिली महिला चालक-सह-ऑपरेटर म्हणून नियुक्ती करून इतिहास रचला आहे. मुंबई: पुढच्या वेळी सायरन वाजवून मुंबईच्या...

सिया गोयलला चेतन हवा होता पण कुटुंबाने केतनला फिक्स केले: पालकांनी तिच्या भावनांकडे दुर्लक्ष...

केतन अग्रवाल, सिया गोयल यांची सहआरोपी चेतन चौधरी (एल)शी जवळीक काही कुटुंबीयांना माहीत होती. पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालच्या हत्येच्या तपासात गुप्त नातेसंबंध...

“हे खरंच वाटलं…” तिने तिच्या लग्नात तिच्या दिवंगत वडिलांचा जुना कॅमेरा आणला; फोटोंमध्ये जे...

अशी काही अनुपस्थिती आहेत जी आपल्याला कधीही सोडत नाहीत. ते शांतपणे आयुष्यातील सर्वात मोठे टप्पे पाळतात, उत्सवाच्या क्षणांना त्या लोकांच्या आठवणींमध्ये बदलतात जे तिथे...

लष्कराच्या QMTI ने अपंग सैनिकांना सक्षम करण्यासाठी ड्रोन आणि EV दुरुस्ती अभ्यासक्रम सुरू केले...

लष्कराच्या QMTI ने अपंग सैनिकांसाठी अभ्यासक्रम सुरू केले आहेत पुणे : क्वीन मेरीज टेक्निकल इन्स्टिट्यूट (QMTI) ने अपंग सैनिकांसाठी ड्रोन तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रिक...

error: Content is protected !!