Homeशहरउल्हासनगरात ज्वेलर्स दुकानातून सोन्याचे मणी चोरून पळालेल्या चोरट्यावर विठ्ठलवाडी पोलिसांची तीन तासात...

उल्हासनगरात ज्वेलर्स दुकानातून सोन्याचे मणी चोरून पळालेल्या चोरट्यावर विठ्ठलवाडी पोलिसांची तीन तासात झडप

  • विठ्ठलवाडी पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी
  • ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मणी हस्तगत

उल्हासनगर दि.५ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर मधील विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या एका ज्वेलर्स दुकानांमध्ये ग्राहक म्हणून आलेल्या एका चोरट्याने दुकानदाराची नजर चुकून १५  ग्राम सोन्याचे मणी सुमारे ९०  हजार रुपये किमतीचे लंपास केले होते. हा चोरीचा प्रकार दुकानात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला होता. विठ्ठलवाडी पोलिसांनी अवघ्या तीन तासातच या गुन्ह्याचा तपास करत त्या गुन्ह्यातील आरोपीला शोधून काढण्याची व त्याचाकडून चोरी केलेले सोन्याचे मणी जप्त  करण्याची उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

उल्हासनगरातील कॅम्प नंबर -४  परिसरातील लालचक्की येथे पूजा ज्वेलर्स नावाचे सोन्या चांदीचे दुकान आहे. त्या दुकानात एक अज्ञात चोरटा ग्राहक म्हणून आला होता. त्यावेळी दुकानात गर्दी असल्याने त्या चोरट्याने संधीचा फायदा घेत दुकानातील १५  ग्रॅम सोन्याचे मणी चोरी करून त्या ठिकाणाहून पलायन केले होते. ही संपूर्ण घटना दुकानात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली होती. हा प्रकार दुकानदाराच्या लक्षात येताच त्यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात आज्ञाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी, व पोलीस निरीक्षक( गुन्हे ) चंद्रहार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलकर्णी यांनी या चोरीच्या तपास सुरू केला.

तपासादरम्यान गुन्हे प्रकटीकरण पथकाचे स पो नि कुलकर्णी, पो हवा. दीपक पाटील, पो हवा  हरिश्चंद्र घाणे, पो शि मंगेश वीर,  पो शि प्रदीप बुरकुल, पो शि सुनील गावित यांनी प्राप्त झालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून व तांत्रिक विश्लेषणच्या पद्धतीने त्या अज्ञात चोरट्याचा शोध घेऊन तीन तासाच्या आतच त्याची माहिती काढली. पोलीस पथकांनी सोनिया कॉलनी, विठ्ठल मंदिराजवळ खडेगोलवली कल्याण पूर्व येथून आरोपी मोहम्मद हुसेन इनायत अली खान (४० ) वर्षे याला ताब्यात घेतले. त्याचे अंगझडती घेतली असता त्याच्याकडे त्यांनी चोरी केलेले सोन्याचे मणी मिळून आले. सुमारे ९०  हजार रुपये किमतीचे १५  ग्रॅम वजनाचे ऐकून १८४  नग सोन्याचे मणी मिळून आले आहे (१००  % चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत) करण्यात आला आहे. या प्रकरणी विठ्ठलवाडी मोहम्मद हुसेन इनायत अली खान याला अटक केली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत. अवघ्या तीन तासात हा चोरीचा गुन्हा उघडकीस आणल्याने विठ्ठलवाडी पोलिसांच्या या कामगिरीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विरोधकांना आणि शेतकऱ्यांना आता शेती कर्जमाफी हवी आहे, मुख्यमंत्र्यांच्या चर्चेला डोळेझाक म्हणा

आमदार अंबादास दानवे आणि इतर शिवसेनेचे (UBT) पदाधिकारी कांद्याच्या भाववाढीच्या निषेधार्थ शेतकऱ्यांमध्ये सामील झाले. पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३० जूनपूर्वी शेतकऱ्यांची...

कोल्ड्रिंक, चहा ,कॉफी व पेढ्यांमध्ये गुंगीच्या औषध मिसळून लुटमारी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांवर विठ्ठलवाडी...

उल्हासनगर दि.१९ ( प्रमोद दळवी ) : कोल्ड्रिंक, चहा, कॉफी व पेढ्यामध्ये गुंगीचे औषध मिसळून नागरिकांना बेशुद्ध करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन व रोख...

ऋषभ पंतने कसोटी उपकर्णधारपद गमावले, प्रिन्स यादवला ODI कॉल-अप – अफगाणिस्तान मालिकेसाठी भारताच्या संघाच्या...

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मंगळवारी भारतामध्ये जून महिन्यात खेळल्या जाणाऱ्या अफगाणिस्तान विरुद्ध एकदिवसीय कसोटी आणि तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी...

नागरिक चळवळीने 300 आठवड्यांत महाराष्ट्रातील खारफुटीतून 1,200 टन कचरा साफ केला

कोविड-19 लॉकडाऊन दरम्यान तीन नागरिकांपासून जे सुरू झाले ते महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या समुदायाच्या नेतृत्वाखालील पर्यावरण चळवळीत बहरले आहे. मॅन्ग्रोव्ह क्लीनअप ड्राइव्हने अलीकडेच सलग...

कोरेगाव पार्क येथे वकिलाने कारमध्ये विनयभंग केल्याची तक्रार केल्यानंतर चार जणांना अटक

पुणे : एका वकिलाने सोमवारी सकाळी पोलिसात तक्रार दाखल केली की, रविवारी रात्री 11.30 च्या सुमारास कोरेगाव पार्कमध्ये एका कारमध्ये त्यांच्या दोन...

error: Content is protected !!