Homeशहरउल्हासनगरात एचपी गॅस सिलेंडरचा तुटवडा : डिलिव्हरी बॉयही नाही, याशिवाय स्टॉकही नाही...

उल्हासनगरात एचपी गॅस सिलेंडरचा तुटवडा : डिलिव्हरी बॉयही नाही, याशिवाय स्टॉकही नाही ग्राहक संताप्त

उल्हासनगर दि.१५ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर शहरातील कॅम्प  नंबर -४ परिसरात ग्राहकांना एचपी गॅस वेळेवर मिळत नसल्याने त्यांच्यात संतापाचे वातावरण पसरले आहे. याशिवाय गॅस एजन्सीकडे डिलिव्हरी बॉय नसल्याने व स्टॉकचाही तुटवडा असल्याने ग्राहकांना कामाला दांड्या मारून चक्क गॅस एजन्सीच्या कार्यालयात तासून तास रांगेत उभे राहूनही गॅस मिळत नसल्याने एचपी गॅसच्या विरोधात नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

उल्हासनगरतील कॅम्प नंबर -४  परिसरातील विनेस टॉकीज जवळ एचपी गॅसचे कार्यालय आहे. मोबाईल द्वारे गॅस बुकिंग केल्यावर गॅस सिलेंडर वितरण करण्यासाठी येणाऱ्या डिलिव्हरी बॉयला तो ओटीपी दिल्यावर ग्राहकांना गॅस सिलेंडर दिले जातात. पण तब्बल १५  ते २०  दिवसाआधी गॅस बुकिंग करूनही ग्राहकांना गॅस सिलेंडर वितरण केले जात नाही. गॅस बुक केल्यावर स्वतः ग्राहकाला गॅसचे पासबुक व ओटीपी घेऊन एचपी गॅसच्या कार्यालयात जावे लागते. त्यानंतर त्याला कार्यालयातून एक पावती देऊन ती उल्हासनगरातील कॅम्प  नंबर -५  येतील समतानगर येथे असणाऱ्या एचपी गॅसच्या गोडाऊन मध्ये जाण्यास सांगतात. पण त्या ठिकाणी गोडाऊन मध्ये पोहोचल्यावर तिथे देखील गॅसचे स्टॉक नाहीये असे सांगण्यात येते. त्यामुळे ग्राहकांना नाहक पायपीट करावी लागते. एचपी गॅस एजन्सीकडे यापूर्वी ग्राहकांना गॅस सिलेंडर देण्यासाठी डिलिव्हरी बॉय होते. पण काही कारणास्तव त्यांना कामावरून काढून टाकण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे बरेच दिवस झाले एचपी गॅस वितरण करणारे डिलिव्हरी बॉय नसल्यामुळे ग्राहकांचे हाल होत आहेत. स्वतः ग्राहकांना एखाद्या वाहनावरून गॅस सिलेंडरची टाकी घेऊन यावी लागत आहे. कॅम्प  नंबर -४ परिसरातील एचपी गॅस कार्यालयाच्या या अनागोंदी कारभारामुळे ग्राहकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. नेहमीच कार्यालयाबाहेर स्टॉक नाही आहे डिलिव्हरी बंद आहे असे लिहून ठेवण्यात येत असते. शासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी या समस्या कडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे. कॅम्प नंबर -४ परिसरातील एचपी गॅसच्या कार्यालयाची सखोल चौकशी करण्यात यावी. त्या ठिकाणी गॅसचा काळाबाजार होत असल्याची ओरड नागरिकांमध्ये केली जात आहे. ग्राहकांना भेडसावणाऱ्या समस्या बाबत एचपी गॅस च्या कार्यालयातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘माझ्या कुटुंबाशी सामना करण्यापेक्षा केतनला मारणे सोपे होते’: सिया गोयलचा पुणे पोलिसांना धक्कादायक खुलासा

लोहगड किल्ला हत्याकांडात एक धक्कादायक खुलासा झाला कारण आरोपी सिया गोयलने पोलिसांना सांगितले की तिला तिचा मंगेतर केतन अग्रवाल त्याच्या केसांच्या पॅचमुळे आवडत...

एनबीएचा पुढील शोध सुपरस्टारसाठी नाही. हे पुढील मोठ्या कल्पनेसाठी आहे

डेव्हिड ली, एनबीए इन्व्हेस्टमेंटचे प्रमुख. (फोटो क्रेडिट: एनबीए रायझिंग स्टार्स इनव्हिटेशनल) सिंगापूरमधील TimesofIndia.com: सिंगापूरमधील OCBC एरिना येथे NBA Rising Stars Invitational 2026 च्या...

दोन दुर्मिळ तांबे प्लेट्स एलिफंटाचा सागरी भूतकाळ उघडतात

या वर्षी एलिफंटा येथे उत्खनन केलेल्या दोन मोठ्या स्टोरेज जारपैकी एका खोलवर, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) ने 17 एप्रिल रोजी दुहेरी खजिना अडखळला.पश्चिम भारतातील...

‘केतनने मला सांगितले की लग्न मोडण्यास उशीर झाला आहे’: पोलिस म्हणतात की सिया गोयलने...

चॅट्स सिया गोयलच्या विधानांच्या विरोधात आहेत, लोणावळा पोलिस म्हणतात लोणावळा: रियाल्टर केतन अग्रवालच्या कथित हत्येच्या तपासाला नवे वळण मिळाले आहे, पोलिसांनी दावा केला...

स्वीडिश मंत्री तिच्या 3 महिन्यांच्या बाळाला EU बैठकीत घेऊन आले; व्हायरल व्हिडिओ देशातील उदार...

या क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. गुरुवारी संपूर्ण युरोपमधील मंत्री हवामान धोरणांवर चर्चा करण्यासाठी लक्झेंबर्गमध्ये एकत्र आले तेव्हा एका क्षणाने पटकन स्पॉटलाइट...

error: Content is protected !!