उल्हासनगर दि.१३: उल्हासनगर येथील जनसेवक, मुंबई माळी समाज मंडळाचे अध्यक्ष व जायंटस वेल्फेअर फौंडेशन वन सीचे कौन्सिल सदस्य तसेच ठाणे येथील विद्या प्रसारक मंडळाच्या बांदोडकर विज्ञान(स्वायत्त) महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्रा.डॉ.प्रकाश माळी सर यांना राज्यस्तरीय लोकसेवा गौरव पुरस्कार २०२५ देण्यात आला आहे.
लोकगौरव राष्ट्रीय एकात्मता परिषद यांच्या वतीने साहित्य मंदिर नवी मुंबई येथील सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला. या राष्ट्रीय एकता सन्मान महागौरव सोहळ्यात सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील उत्तुंग, समाजाभिमुख, रचनात्मक, विधायक, अतुलनीय व अनुकरणीय कार्याचा गौरव म्हणून उल्हासनगर येथील जनसेवक, मुंबई माळी समाज मंडळाचे अध्यक्ष व जायंटस वेल्फेअर फौंडेशन वन सीचे कौन्सिल सदस्य तसेच ठाणे येथील विद्या प्रसारक मंडळाच्या बांदोडकर विज्ञान(स्वायत्त) महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्रा.डॉ.प्रकाश माळी सर यांना राज्यस्तरीय लोकसेवा गौरव पुरस्कार २०२५ लेफ्टनंट कमांडर मा.निलेश झोपे, अभिनेत्री कु.केतकी गावडे व डॉ.पूर्णिमा सुर्वे यांच्या शुभहस्ते आणि सुप्रसिद्ध सिनेअभिनेत्री अदिती सारंगधर,जेष्ठ गझलकार ए.के.शेख,सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र नागरगोजे,चित्रपट दिग्दर्शक अल्ताफ शेख यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.याप्रसंगी एन.डी.खान,सलमा एन.खान व स्नेहा चांदोरकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.





























