Homeशहरउल्हासनगरात पूर्व वैमनस्यातून तरुणाची धारदार चाकूने सपासप वार करून निर्घृण हत्या :...

उल्हासनगरात पूर्व वैमनस्यातून तरुणाची धारदार चाकूने सपासप वार करून निर्घृण हत्या : मारेकरी अटकेत

उल्हासनगर दि. ७ ( प्रमोद दळवी ) : मागील भांडणाचे व एकमेकांच्या विरोधात केलेल्या केसच्या वादातून मनात राग धरून तरुणाला भर रस्त्यात अडवून त्याच्यावर धारदार चाकूने सपासप वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. याप्रकरणी हिललाईन पोलिसांनी तातडीने त्या मारेकर्‍याचा  शोध घेऊन त्याला अटक केली आहे

पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार उल्हासनगरातील कॅम्प नंबर -४  परिसरातील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी रात्री अकराच्या सुमारास कुर्ला कॅम्प रोड, कालीमाता मंदिरच्या मागे भर रस्त्यात व सुरू असलेल्या पावसात एका तरुणाने दुसऱ्या तरुणांवर धारदार चाकूने सपासप वार करून त्याला गंभीर जखमी करून त्या ठिकाणाहून पलायन केले. या घटनेची माहिती विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रहार गोडसे यांना मिळताच त्यांनी पोलीस पथकासह घटना घडलेल्या ठिकाणी धाव घेतली. त्यावेळी त्या ठिकाणी रक्ताच्या ठरवण्यात एक तरुण जखमी अवस्थेत पडलेला होता. त्याच्या जवळच एक धारदार चाकू रक्ताने माखलेल्या अवस्थेत पडलेला होता. पोलिसांनी सर्वप्रथम त्या जखमी तरुणाला जवळच असलेल्या बालाजी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण त्याची प्रकृती खूपच गंभीर असल्याने त्याला उल्हासनगरातील सेंट्रल हॉस्पिटलमध्ये घेण्यात आले. पण डॉक्टरांनी उपचार सुरू करण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्या मयत झालेल्या तरुणाचे नाव सतनामसिंग लबाना असल्याचे व तो उल्हासनगरातील कॅम्प नंबर – ५  परिसरातील सेक्शन ३९  वीर तानाजी नगर या परिसरातला राहणारा असल्याचे समजले.

सतनामसिंग याला जीव ठार मारून पळून गेलेल्या मारेकराचे नाव गुरप्रीतसिंग उर्फ अनिस करतारसिंग लबाना (१९ ) असून तो देखील वीर तानाजी नगर परिसरातली राहणार असल्याचे पोलिसांना समजले. त्याच दरम्यान हिल्लाईन पोलिसांनी अनिस लबाना याचा शोध घेऊन त्याला त्वरित ताब्यात घेऊन विठ्ठलवाडी पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी घटनास्थळावरून रक्ताने माखलेला धारदार चाकू व इतर वस्तू पंचनामा करून ताब्यात घेतल्या. याशिवाय या थरारक हत्याचा व्हिडिओ काही नागरिकांनी मोबाईल मध्ये चित्रीत केला असून तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे घटना घडलेल्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सतनामसिंग लबाना याची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याने त्याचा भाऊ कुलदीप सिंग लभाना यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुरुप्रीतसिंग उर्फ अनिस लबाना याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

या घटने संदर्भात विठ्ठलवाडी पोलिसांनी केलेल्या चौकशीत अधिक माहिती मिळाली मयत सतनामसिंग व यातील आरोपी अनिस यांचे एकमेकांच्या कुटुंबीयांच्या विरोधात पूर्वीपासून वाद आहेत. आणि त्याच्या नातेवाईकांनी मयत सतनामसिंग याच्या विरोधात हिललाईन पोलीस ठाण्यात जबरी चोरीची फिर्याद दाखल केली होती. त्यात त्याला अटक करण्यात आली होती. सध्या तो त्या केसमधून जामिनावर बाहेर आलेला होता. तेव्हापासून आरोपी व मयत यांच्या कुटुंबांमध्ये वाद सुरू होता. अनिस लबाना याने मयत सतनामसिंग याच्यासोबत असलेल्या मागील भांडणाचे व एकमेकांचे विरोधात केलेल्या केसच्या वादाचे कारणावरून मनात राग धरून सतनामसिंग लबाना याच्यावर धारदार चाकूने त्याच्या मानेवर छातीवर पोटावर व शरीरावर सापासाप वार करून त्याला जीवे ठार मारले आहे अशी माहिती तपासात पोलिसांना मिळाली आहे. अधिक तपास विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रहार गोडसे करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ठाणे जिल्ह्यात आठवडाभरात ८३८ मिमी पाऊस; बारवी धरणातील पाणीसाठा ३६ टक्क्यांवर

ठाणे दि. ७ ( प्रमोद दळवी ) : ठाणे जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून समाधानकारक पाऊस सुरू असून नद्या आणि धरणांतील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे....

ऑफसाइड: बेल्जियमने यूएसएचे ट्रम्प कार्ड रद्द केल्यामुळे स्पेनने ख्रिस्तियानो रोनाल्डोला रिॲलिटी चेक दिला

पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो (7) सोमवार, 6 जुलै, 2026 रोजी डॅलसजवळ, टेक्सासमधील आर्लिंग्टन येथे पोर्तुगाल आणि स्पेन यांच्यातील विश्वचषक फेरीच्या 16 फुटबॉल सामन्यानंतर प्रतिक्रिया...

भरती-ओहोटी + मुसळधार पावसाचा सापळा: मुंबई बंदसाठी योग्य सूत्र

प्रत्येक पावसाळ्यात, मुंबईतील रहिवाशांना भारतीय हवामान विभाग (IMD) आणि बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) कडून समान चेतावणी ऐकू येते: उच्च समुद्राची भरतीओहोटी अपेक्षित आहे....

सोमवारच्या भूस्खलनानंतर पुणे-लोणावळा रेल्वे मार्ग पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे

पुणे : मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, पुणे आणि लोणावळा दरम्यानच्या दोन मार्गांपैकी किमान एक मार्ग मंगळवारी संध्याकाळी उशिरापर्यंत कार्यान्वित होणे...

जेव्हा तुमचे मूल म्हणते “मी हे करू शकत नाही,” तेव्हा “तुम्ही करू शकता” असे...

जेव्हा तुमचे मूल म्हणते “मी हे करू शकत नाही,” तेव्हा “तुम्ही करू शकता” असे म्हणणे टाळा; त्याऐवजी काय म्हणायचे ते मानसशास्त्रज्ञ स्पष्ट करतात...

error: Content is protected !!